उंचखडक येथे चुलता पुतणी प्रवरेत बुडाले, अभियंत्याचा मृत्यु, संस्कृतीचे दैव बलोत्तर.!
अकोले तालुक्यातील उंचखडक खुर्द येथे पाण्यात बुडणाऱ्या पुतणीला वाचविताना इंजिनियर राजू मुरलीधर घोडके यांचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना आज शुक्रवार दि. २४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. यात पुतणी संस्कृती घोडके (वय ७). हीला डॉ. भांडकोळी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिच्यावर योग्यवेळी उपचार केल्याने ती बचावली. मात्र, राजू घोडके यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजू घोडके हे पेशाने उत्तम अभियंते होते. त्यांनी चंद्रपुर, अकोले, संगमनेर अशा विविध ठिकाणी इंजिनियर म्हणून काम केले होते. सद्या ते संगमनेर येथे स्थायीक होते. मात्र, कोरोनामुळे त्यांच्या दोन्ही मुलांना सुट्ट्या असल्यामुळे ते गावी आले होते. आज रोजी सायंकाळी ते पुतणी व एका मुलास घेऊन प्रवरा नदिवर आले होते. त्यांची सहा वर्षीची पुतणी नदीकाठी माशांना पाहत होती. या दरम्यान तीचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडली. हे पाहताच राजू यांनी तिला हात देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती खाली वाहु लागली. डोळ्यासमोर लेकरु गटांगळ्या खात असल्याचे पाहुन त्यांनी पाण्यात उडी मारली. परंतु, त्यांना पोहता येत नसल्यामुळे ते देखील बुडू लागले. मात्र, त्यांनी मुलीस नदिच्या काठाकडे ढकलण्याचा प्रयत्न केला. ती काठाकडे आली. मात्र, राजू यांना नदिच्या खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्यांच्या नाकातोंडात पाणी गेले. हा सर्व प्रकार त्यांच्यासोबत आलेल्या लहान मुलाने पाहिला असता तो गावाकडे पळत सुटला. ओरडून ओरडून त्याने गावातील काही लोक जमविले. त्यांनी नदीत उडी मारुन दोघांना बाहेर काढले. यावेळी राजू हे पुर्वीच पाण्यावर तरंगत होते तर मुलीच्या पोत पाणी गेल्याने ती बेशुद्ध झाली होती.दरम्यान अकोले तालुक्यातील ही याच महिन्यातील तिसरी घटना आहे. यापुर्वा पिंपळदरी येथे एक शिक्षक व दोन अभियंते अशा तिघांचा मृत्यु तर टाकळी ढोकरी परिसरात अर्जुनने वाचविलेला तो पोहणारा व्यक्ती आणि आज राजू घोडके. त्यामुळे, कोरोनाच्या काळात घरी बसा. अन्यथा मरण आले ठायी तर चालून जाई पायी असे म्हणतात. ते खोटे नव्हे.!
दरम्यान हा प्रकार पलिकडील उंचखडक बु!! येथे नदीकाठी बसणाऱ्या गणेश मंडलिक या निसर्गप्रेमीने पाहिला असता त्याने इशारे करत गावकऱ्यांना आवाज देत खुनवाखूनव केली. त्यामुळे खरा प्रकार लक्षात आला. त्यानंतर दोघांना अकोल्यातील भांडकोळी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र, राजू यांनी तेथेच प्राण सोडला होता. मात्र, मुलगी वाचविण्यात डॉक्टरांना यश आले.
टिप: 24 तास ही पोष्ट कोणी जास्त फॉर्वड करू नये विनंती.
सागर शिंदे.
शंकर संगारे
============
"सार्वभाैम संपादक"
सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे २३ लाख वाचक)