...अखेर संगमनेर हॉट्स्पॉट पॅकेज म्हणून घोषीत.! पाच दिवस घराचे दरवाजे बंद, उंबरठा ओलांडाल तर गुन्हा.!


सार्वभौम (संगमनेर) : संगमनेर तालुक्यात कोरोनाचे चार रुग्ण आढळल्यामुळे प्रशासनाने आज रात्री अगदी कडक पाऊले उचलली आहे. जिल्ह्यतील चार ठिकाणे हॉट्स्पॉट पॅकेज म्हणून घोषीत केले आहेत. आता कोणतीही अत्यावश्यक सेवा देखील या ठिकाणी सुरू राहणार नाही. कितीही महत्वाचे काम निघाले तरी नागरिकांनी घराच्या बाहेर निघायचे नाही. यात मुकुंदनगर, आलमगिर (अ. नगर), नाईकवाडापुरा (संगमनेर) व जामखेड शहर अशा चार ठिकाणांचा सामावेश आहे. विशेष म्हणजे या ठिकाणांपासून दोन किलोमिटरचा परिसर सिल करण्यात आला असून येथे सर्व सुविधा शासन पुरविणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना आपल्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे आता जो रस्त्यावर दिसेल त्याच्यावर थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा निर्णय आज शुक्रवार दि.10 एप्रिल सकाळी 6 वाजल्यापासून तर मंगळवार दि. 14 एप्रिल रोजी रात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे.
नगर जिल्ह्यात प्रशाकीय यंत्रणेने 24 तास काम करुन देखील 24 रुग्ण जिल्हा रूग्णालयात दाखल झाले. यासाठी प्रशासन व शासन कमी पडले असे कोणी म्हणत असेल तर त्याचे नक्कीच कान पकडले पाहिजे. पण, या सर्वात सर्वाधिक बेजबाबदार कोणी असेल तर ते नागरिक आहेत. कारण, यांना सांगून शिकून देखील यांनी प्रशासनाच्या नियमांची पायमल्ली केली. इतकेच काय तर उलट शासकीय नियम आणि रस्त्यावर उभे राहून ड्युटी करणार्‍यांच्या चुका काढण्यात यांना धन्यता वाटली. तर दुसरी गोष्ट म्हणजे जे परदेशी बाबु भारतात येऊन एखाद्या उंदरासारखे बिळात लपून बसले. त्यांनी तर हद्दच पार केली. जर हे बाबू स्वयंप्रेरणेने तपासणीसाठी पुढे आले असते तर आज राज्यात शेकडा पार झाला नसता. पण, या बेजबाबदारीला पर्याय नाही. त्यामुळे, आज प्रशासन खरोखर अशा नागरिकांपुढे हतबल झाले आहे.
जनतेला सांगून, शिकवून व विनंती करुन त्यांच्यात गांभीर्य निर्माण होत नाही. त्यामुळे, जिल्हाधिकार्‍यांनी संगमनेरसह चार ठिकाणी मोठा निर्णय घेतला आहे. आता संगमनेर शहरातील नाईकवाडापुरा हा हॉट्स्पॉट पॅकेज म्हणून घोषीत केले आहेत. तर त्याच्या अजुबाजूचा दोन किलोमिटरचा परिसर कोर एरिया म्हणून घोषीत केला आहे. आता या क्षेत्रात कोणी बाहेर दिसणार नाही. कोणत्याही वाहनाला परवानगी नाही. कोणतेही मेडिकल, दवाखाने, पालेभाजा विकणारे विक्रेते, फळविक्रेते, किराणा वैगरे कोणतेही चोचले पुरविले जाणार नाही. जे हिंडफिरे शहरात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली शहरात हालहवाल पाहण्यासाठी येतात. त्यांनी घरातच बसून आपला विरंगुळा शोधावा अन्यथा कोणतीही सबब न एकता थेट गुन्हा दाखल करण्यात येईल. त्यामुळे, संगमनेर आता शंभर टक्के बंद राहणार असून केवळ प्रशासन रस्त्यावर दिसणार आहे. त्यामुळे, आता तरी नागरिकांनी सहकार्य करावे.
             हे तुमच्या आरोग्यासाठीच आहे. याची जाणीव असावी. त्यामुळे नागरिकांनी सुचनांचे पालन करावे. असे आवाहन प्रांताधिकारी शशिकांत मंगरूळे, पोलीस उपाधिक्षक रोशन पंडीत, आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, डॉ. कचेरीया, पोलीस निरीक्षक अभय परमार, सहा. पोलीस निरीक्षक पप्पू कादरी यांनी केले आहे.
उद्याचे स्पेशलगोष्ट एका पठारावरील दानशूर व्यक्तीची..जो पेटवितो शेकडो घरातल्या चुल्ही, खर्च करतो 20 लाख रुपये.!

सागर शिंदे

संपादक

दै.रोखठोक सार्वभौम

===========



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------



  • (देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे 23 लाख वाचक)