...अखेर नगर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी? दुसरा अहवाल स्पष्ट करणार कारण.!


सार्वभौम (संगमनेर) :
                       नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालूक्यातील गोवर्धनपुर येथील तरुणाचा कोरोना विषाणुने मृत्यु झाल्याचा संशय असल्याची माहिती हाती आली आहे. याबाबत डॉक्टरांकडे विचारणा केली असता त्यांनी या घटनेचा दुजोरा दिला आहे. त्यामुळे, सद्या जिल्ह्यात एकूण 26 रुग्ण असून त्यापैकी 3 रूग्ण घरी गेलेले आहेत. या बातमीनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून हा तरुण मतिमंद असल्याने तो अन्य अजारांनी देखील ग्रासलेला होता. त्यामुळे, तो पॉझिटीव्ह असला तरी त्याचे मृत्युचे गुढ हे कोरोनाच असू शकते असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
                   याबाबत सविस्तर माहिती अशी की, हा तरुण श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धनपुर येथील रहिवासी आहे. हा मतिमंद असल्यामुळे तो नहेमी आजारी पडत होता. मात्र, गेल्या दोन-तीन आठवड्यापासून तो वारंवार आजारी पडत असल्यामुळे त्याला फिट आली म्हणून त्यास हरेगाव येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दरम्यात त्यास कोविड 19 ची काही लक्षणे जाणून आल्यामुळे त्यास लोणी येथील रूग्णालयात पाठविण्यात आले. तेथे त्याची प्रकृती अधिकच गंभीर झाल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यास जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता त्याची कोरोना टेस्ट घेण्यात आली. दरम्यान त्याची प्रकृती अधिक गंभीर झाल्यामुळे त्यास पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर लक्षात आले की, हा कोरोना बाधित असून तो अन्य व्यधींनी ग्रासलेला आहे. हे समजताच तो ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आला होता. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या तपासण्या केल्या. मात्र, सर्वजणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले.
दरम्यानच्या काळात त्याला 14 दिवसांचे होमक्वारंटाईन करण्यात आले होते. त्यामुळे एकदा त्याचा अहवाल निगेटीव्ह आला होता. मात्र, दुसरा एक रिपोर्ट येणे बाकी होता. तो येण्याच्या आत त्याचा मृत्यु झाला आहे. आता हा दुसरा अहवाल काय येतोय, यात त्याच्या मृत्युचे गुढ दडलेले आहे. त्याच्या हाय ब्लडप्रेशर व अन्य आजार असून त्याची रोग प्रतिकारशक्ती कमी होती. त्यामुळे, त्याच्या मृत्युचे गुड अद्याप उलगडले नाही. मात्र, त्याला कोरानाची बाधा झाली होती. हे समजल्यानंतर त्याची मानसिकता खचली होती. त्यामुळे, आज सकाळी त्याने पुण्याच्या ससून रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे.