तो कसाई म्हणजे झाकली मुठ सव्वा लाखीची.! ती गाडी, तो परवाना, ती जनावरे आणि ते भाईजान.!

                   
अकोले (प्रतिनिधी) :
                    अकोले तालुक्यात नाईट ड्युटी करणार्‍या समाजसेवकांनी दोन दिवसांपुर्वी एक कत्तलखान्याची गाडी पकडली होती. मात्र, ती नंतर कोठे गायब झाली आणि त्यातील छोटे-छोटे वासरे कोणत्या कसायाच्या दावणीला गेले याबाबत सगळेच अनभिज्ञ आहेत. पण, यात प्रशासनातील काही व्यक्तींचा हात असून जे गोवंशाचे रक्षक म्हणून स्वत:ला मिरवितात. तेच या गोमातेचे भक्षक आहेत. हाच वास्तव आहे. विशेष म्हणजे, या रक्षकांची भूमिका म्हणजे तु मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करेल. असे म्हणून प्रशासन, कसाई आणि तोतया रक्षक यांच्यात चालते. हे काही पत्रकारांनी रंगेहाथ पकडले आहेत. त्यामुळे, एक दिवस त्यांचा धर्मांधतेचा बुरखा लावकरच उघडा होणार आहे. मात्र, अशा प्रकरणात दलाली करण्यापेक्षा त्यांनी कसायाचा धंदा मांडला तरी त्यांना कोणी वाईट म्हणणार नाही. अशी प्रतिक्रिया त्यांच्याशी हातमिळवणी न केलेल्या प्रशासनातील जबाबदार व्यक्तीने दिली आहे.
याबाबत काही गोष्टी तुमच्या लक्षात आणून देऊ वाटतात की, आज सगळा देश कोरोनाशी झुंज देत आहे. अशा परिस्थितीत संगमनेरच्या व्यक्तीला अकोल्यात प्रवेश करताना हजारदा प्रश्न पडतो. मात्र, या व्यक्तीची पीकअप रात्री 1 ते 3 च्या सुमारास कोंबड्यांची वाहतुक करते. दुसरी गोष्ट म्हणजे, एक माणूस, होय.! अगर एका मानसाला दुसर्‍या ठिकाणी जायचे असेल तर त्याला पोलीस जाऊ देत नाही. हजारो, लाखो नागरिक आज राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी अडकले आहेत. अशा परिस्थितीत हा व्यक्ती चक्क नुकतेच जन्माला आलेले वासरं जमा करत फिरतो. ते ही पहाटे 3 वाजता आणि उत्तर देतो. मी पाळण्यासाठी आणले होते. इतकेच काय! हा प्रकार पोलीस ठाण्यात गेल्यानंतर ना गुन्हा दाखल होतो. ना गाडी जप्त होते. ना 188 ची कारवाई होते. ना वासरांचा पत्ता लागतो. हा बहाद्दर आगदी सहज घरी निघून जातो. जर एखाद्या सामान्य नागरिकास पोलिसांनी आडविले तर तब्बल तीन तास त्याला खाकीच्या हातापाया पडायची वेळ येते. तेव्हा कोठे तडजोडीअंती आपण घरी जातो. त्यामुळे, या कासायाने गाडीवर फुकट नाही लिहीले की, हा खेळ सोप्पा नाही भाऊ.! आणि होय.! खरोखर हा खेळ सोप्पा नाही.
तुमच्या माहितीस्तव असावे की, गाडी एकच आहे. मात्र, याच गाडीच्या नंबरप्लेट वेगवेगळ्या आहेत. इतकेच काय.! या गाडीवर अगस्ति कृपा, महालक्ष्मी कृपा अशी वेगवेगळी नावे लावता येतील अशी वरची केबीन आहे. त्यामुळे, या वाहनावर कधीही गुन्हा दाखल होत नाही. झाला तरी तीचे लायसन रद्द होऊ शकत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ही शक्कल खात्यातील एक व्यक्तीने या महाशयाला दिल्याचे बोलेले जाते. अशा व्यक्तींचा वरदहस्त आहे. म्हणून तर यांचे फावते आहे. अन्यथा याच्यावर इतक्या कडूकाळ काळात गुन्हा दाखल झाला नसता का? हा सर्वसामान्य व्यक्तीला पडलेला प्रश्न आहे.
आता यातील महत्वाची गोष्ट म्हणजे या व्यक्तीकडे खरेदी विक्री करण्याचा परवाना आहे. त्यामुळे, त्यास पोलिसांनी पकडले तरी तो हा परवाना पुढे करतो आणि ही गुरे मी पाळण्यासाठी चालविली होती. असा कांगावा करतो. अर्थात तो कायद्याच्या दृष्टीने पोलिसांना बांधून घेतो. तर अर्थपुर्ण तडजोडीने हाताशी धरतो. त्यामुळे, त्याचा कोणी बाल बाका करु शकत नाही. मात्र, जे धर्माचा बुरखा घालून बसले आहेत. त्यांच्यापैकी कोणी हे म्हणत नाही. की, त्याचे वाहन व त्याचा परवाना रद्द करा. कारण यांच्यातील काही महाभाग त्याचे मित्र आहेत. त्यामुळे, वर टिळा लावायचा आणि आतून गोळा खायचा. हा धंदा काहींचा सुरू आहे. पण, यांच्यातर काही प्रामाणिक भाईजान आहेत. यात तिळमात्र शंका नाही.
एकंदर पहाता नगरपंचायत व पोलिसांना या परिसरात काय चालते हे माहित नाही. असे म्हटले तर आश्चर्य वाटेल. पण, कोणी मतांचे राजकारण करतय तर कोणी धर्माचे, कोणी प्रामाणिक काम करतय तर कोणी झाकली मुठ सव्वा लाखाची अशीच भूमिका घेतय. पण, मुळावर घाव घालायला कोणीच तयार काही.