होमक्वारंटाईन उतरले रस्त्यावर अकोल्यात पाच जणांवर गुन्हा दाखल, संगमनेराही कारवाई.!


राजूर (प्रतिनिधी) :
                             अकोले तालुक्यात प्रशासन भोंगे लावून ओरडून सांगत आहे. होम क्वारंटाईन असणार्‍यांनी घराच्या बाहेर पडू नका. तरी देखील तीन बेजबाबदार व्यक्ती घराच्या बाहेर पडल्यामुळे त्यांच्यावर अकोले पोलिसांनी तिघांवर 188 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. ही तिघे रुंभोडी शिवारातील असून ते नाशिकहुन अकोल्यात आले होते. शत्रुघ्न मालुजकर, वैभव मालुंजकर व भारत मालुंजकर (रा. रुंभोडी), किसन वाकचौरे (रा. वाशेरे), प्रमोद भांगरे (तांभोळ) अशी पाच जणांची नावे आहेत. तर संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात राहणार्‍या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. रविंद्र कांजरेकर, बाळकृष्ण डोंगरे (रा, अकलापूर), तापेश बर्मन (रा. माहोली) अशी तिघांची नावे आहेत. तर संगमनेर शहरात गेल्या दोन दिवसात  ए.पी.जोर्वेकर (रा. फादरवाडी), वाय.सी. कासार (रा. रहेमतनगर), पी. एम. खान (रा. मदिनानगर), एस. एन शेख (रा. खळी), व्ही. पी. बीग (रा. इंदिरानगर), एस. आर. शेख (रा. लखमीपुरा), एस. ई. खान (रा. एकतानगर), एम. एफ. पठाण (रा. मुगलपुरा), वाय. व्ही. त्रिभूवन (रा. खांडगाव), व्ही. सी. वैराळ (रा. मंगळापूर), एम. एम. शेख (मोलगपुरा), सरदारखान पठाण, फिरोज पठाण, अमिरखान पठाण (रा. मोमीनपुरा), अमोल डेंगाळे, शंकर डमाळे, सागर वामन, वसंत राऊत, दशरथ जौसवाल, गुड्डा जयस्वाल (घुलेवाडी), अशा 35 जणांवर कारवाई करण्यात आली आहे..   
सद्या देशात व राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. हे रोखण्यासाठी शासन व प्रशासनाच्या झोपा उडाल्या असून ते 24 तास काम करीत आहे. हाच प्रकार अकोले तालुक्यात पहायला मिळत आहे. तालुक्याचे तहसिलदार मुकेश कांबळे, पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे, दिपक ढोमने, मुख्याधिकारी सचिनकुमार पटेल व आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी डोळ्याची झोप ऊडविली आहे. 
                          कारण, अकोले तालुक्याच्या चारही बाजुंनी कोरोना वेशीवर येऊन उभा आहे. संगमनेर, नाशिक, मुंबई व पुणे अशा चारही दिशेला कोरानाने थैमाना घातले असून त्याच्या मध्यभागी असणार्‍या अकोले तालुक्यात अद्याप कोरोनाचा प्रादुर्भाव नाही. ही फार सुदैवाची गोष्ट आहे. अर्थात हे कोण्या दैवाची देण नाही. तर ते सर्वस्वी श्रेय्य प्रशासन व सामजसेवक म्हणून रोज जीव धोक्यात घालणार्‍या व्यक्तींना जाते.
दरम्यान अशा परिस्थितीत नागरिकांनी स्वत:चे कर्तव्य म्हणून घरात तरफडणे अपेक्षीत आहे. मात्र, जे बाहेर गावाहुन आले आहेत. त्यांना घरात बसवेनासे झाले आहे. कोणी दारूच्या शोधात बाहेर पडत आहे. तर कोणी अर्धाल्या चड्ड्या घालुन शहराचे मोठेपण गावात मिरविताना दिसत आहे. मात्र, यांना गावकर्‍यांनी गावात घेऊन चूक केली की काय! हाच कळायला तयार काही. असेच काही व्यक्ती घरात बसत नसतील तर त्यांच्यावर प्रशासन कारवाई करेल. असे पोलीस प्रशासनाने सांगितले होत. त्यामुळे, पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे यांच्या टिमने कठोर भुमिका घेत आज महात्मा फुले चौकात तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर 188 प्रमाणे कारवाई केली आहे.

ते समाजसेवक 24 तास हायअलर्ट
अकोेल्यात अद्याप कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही. त्यामुळे, 24 तास काम करणारे प्रशासन थकले तरी काही समाजसेवक मात्र, 24 तास हायआलर्ट आहेत. त्यात नितीन नाईकवाडी, संदिप भानुदास शेणकर, सचिन भालेराव, कौलास शरमाळे, संदीप मोरे, अमोल वाकचौरे यांच्यासह अनेक सामाजसेवक रोज स्वखर्चाने सेवा पुरवित आहेत. तर रात्रीचे नाकाबंदीसाठी मदत करताना दिसत आहेत.

सागर शिंदे
============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------



(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे 22 लाख वाचक)