होय.! मीच माझ्या पत्नीचा खून केला अकोल्यातील चैतन्यपुरच्या पतीची कबुली.!
सार्वभौम (अकोले) :
अकोले तालुक्यातील चैतन्यपूर येथे पतीनेच पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली होती. मात्र, पत्नीचा मृत्यु गाईने लाथ मारल्यामुळे झाल्याचे सागण्यात आले होते. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी अकोले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. माझ्या मुलीची हत्या करण्यात आली असून तिच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागणीनंतर पोलिसांनी आरोपी भगवान भाऊ हुलवळे (रा. चैतन्यपूर, ता. अकोले) यांच्यावर कलम 302 कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याची सत्यता पडताळुन पाहताना तपासी अधिकारी दिपक ढोमने यांनी घटनेच्या मुळापर्यंत तपास केला. त्यानंतर कालपर्यंत नाही-नाही म्हणणार्या आरोपीने काल आपल्या गुन्ह्याची कबुली देत होय! मीच माझ्या पत्नीचा खून केल्याची हकीकत सांगितली आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा अकोले पोलिसांनी पीडित व्यक्तीला न्याय देण्याचा पायंडा कायम ठेवला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सन 1995 साली मयत सविताचा विवाह चैत्यन्यपूर येथील भगवान भाऊ हुलवळे याच्यासोबत झाला होता. काही दिवस दोघांचा संसार चांगला चालला. मात्र, कालांतराने दोघांमध्ये मतभेद होत राहिले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोघांचा वाद फारच विकोप्याला जात होता.
दरम्यान गुढीपाडव्याच्या दिवशी (25 मार्च) सकाळी सविता गाईच्या गोठ्यात गेल्यानंतर तिला गाईने लाथ मारल्याने तिचा मृत्यु झाला आहे. तुम्ही तत्काळ चैतन्यपुरला यावे, अशी माहिती मयत मुलीचे वडील पुंजा आवारी (रा. धामनगाव आवारी) यांना सांगण्यात आली. त्यानंतर आवारी यांनी मोठा आक्रमक पवित्रा घेतला. माझ्या मुलीचा मृत्यु गाईच्या लाथ मारण्याने नाही. तर डोक्यात काहीतरी टणक हत्यार मारल्याने झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान वैद्यकीय अहवाल येईपर्यंत पोलिसांनी सविताची आकस्मात मृत्यु झाल्याची नोंद केली होती. त्यानंतर आवारी यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी संबंधित गुन्हा दाखल करण्याचेे आदेश दिले. पोलीस निरीक्षक जोंधळे यांनी या प्रकरणात वैयक्तीत लक्ष घालून सखोल तपास होण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक दिपक ढोमणे यांना मार्गदर्शन केले. त्यांतर आरोपी भगवान हुलवळे याला अटक करण्यात आली होती.
दरम्यान, आरोपीस न्यायालयात हजर केले असता पुढील तपासासाठी न्यायालयाने त्यास सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. खर्या अर्थाने येथून पोलिसांचा तपास सुरू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक ढोमने यांनी त्यांचे एक पथक तयार केले. त्यात बन्सी टोपले, कैलास शिपनकर, धनंजय गुडवाल, चालक मोरे यांनी या गुन्ह्याची उकल करण्यासाठी अथक परिश्रम सुरू केली. हा गुन्हा घडण्यापुर्वी आरोपी भगवानचे लोकेशन काय होते. त्याच्या संशयीत हलचाली काय होत्या, त्याचे सकाळपासूनचे वागणे, त्याचा पुर्वाग्रही इतिहास, नियमीत कौटुंबिक वागणे, त्याचे साथिदार, नातेवाईक यांच्याकडे जाऊन सखोल माहिती जमा केली.या दरम्यान त्याला प्रेमाणे विचारले असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले नाही. मात्र, काही संशयीत घटनाक्रम त्यास विचारला असता उत्तरे देताना त्यात संदिग्धता आढळून आली. त्यामुळे पोलिसांचा संशय त्याच्यावर आधिक बळावला. नंतर जेव्हा काही सबळ पुरावे हाती आले. तेव्हा पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखविताच भगवानाला वाचा फुटली. तो पोपटासारखा बोलू लागला. होय.! मीच माझ्या पत्नीच्या डोक्यात दंडा मारुन तिची हत्या केली आहे. हा प्रकार दडविण्यासाठी असा बनाव केला की, ती गाईच्या गोठ्यात दुध काढण्यासाठी गेली असता गाईने लाथ मारल्यानंतर ती मयत झाली. खरतर आमच्यात रोज वाद होत होते. वैचारिक मतभेद होेत असल्यामुळे मी वैतागलो होतो. त्यामुळे मी प्रकार केल्याची कबुली आरोपीने दिली. त्यामुळे या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान हा गुन्हा उघड करण्यासाठी अप्पर पोलीस अधिक्षक सागर पाटील, दिपाली काळे, पोलीस उपाधिक्षक रोशन पंडीत, पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याचे पोलीस उपनिरीक्षक दिपक ढोमने यांनी सांगितले.
अकोले पोलिसांचे तालुक्यातून कौतुक
अकोले पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे यांच्या काळात सध्या तीन मोठ्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. गर्दनीत ज्या पिंपळगाव निपाणीच्या तरुणाचा खून झाला होता. त्यातील दाने आरोपी त्यांनी अटक केलेे. त्या गुन्ह्यात कोणताही सबळ पुरावा नसतांना या गुन्ह्याची निर्गती करण्यात त्यांना यश आले. तर खानापूर परिसरात झालेल्या आदिवासी मुलीवरील अत्याचार उघड करुन खर्या आरोपींना बेड्या ठोकण्यात अकोले पोलिसांचे सिंहाचा वाटा आहे. तर आज चैतन्यपुरच्या आरोपीस बेड्य ठोकून तीसरा गुन्हा त्यांची तडीस नेला आहे. त्यामुळे, त्यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले जात आहे.
पीडितेस खर्या अर्थाने न्याय मिळाला!
एखाद्या खुनाच्या गुन्ह्यात अकस्मात मृत्युची नोंद होते व नंतर तिच्या गुन्हेगारास अटक होऊन त्याला शासन मिळते. यापेक्षा चांगला न्याय काय असू शकतो. गुन्हा करुन देखील त्याचा बनाव करणार्यास खरतर फाशीची शिक्षा दिली पाहिजे. त्यामुळे, पोलिसांनी सखोल तपास करुन सबळ दोषारोपपत्र दाखल करावे व आरोपीस मृत्युदंड मिळावा. हीच आमची आपेक्षा आहे. तेव्हाच खरा न्याय आम्हाला मिळेला.
सागर शिंदे
============
"सार्वभाैम संपादक"
सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे 22 लाख वाचक)