टॉन्सिल झालेल्या वकीलास कोरोना झालाय.! डॉक्टरांचा अजब बोभाटा तपासण्यास नाकार, वाद प्रांताधिकार्‍यांच्या कोर्टात

ए बाबो.! मला कोरोना.!


सार्वभौम (संगमनेर) : 
                        कोव्हीड 19 चा सामना करण्यासाठी प्रशासन समर्थपणे मैदानात उतरले आहे. प्रत्येक नागरिकांचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी शासनाने घेतली आहे. मात्र, त्यांना डॉक्टरांची साथ मिळत नसल्याचे दिसत आहे. नेमकी युद्धाची तयारी सुरू असतांना घोड्याला सर्दी झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. कारण, एकीकडे कोरोनाशी झुंज देण्यासाठी काही डॉक्टर, नर्स व कर्मचारी जीव तळहातावर घेऊन रुग्णांना तपासत आहे. त्यांची काळजी घेत आहेत. तर दुसरीकडे काही स्वार्थी डॉक्टर मात्र स्वत:ची जीव वाचविण्यासाठी दवाखान्यात आलेल्या पेशंटला चक्क हाकलवून लावत असल्याचे चित्र दिसत आहे. असे अनेक प्रकार संगमनेर तालुक्यात घडत असून काही डॉक्टरांचा मनमानी व अनागोंदी कारभार चव्हाट्यावर येऊ लागला आहे. एकेकाळी ज्यांना लोक देवाची उपमा देत होते. तेच आता कसायासारखी वागणूक देऊ लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे, जर असे होत असेल तर जिल्हाधिकार्‍यांनी काढलेल्या आदेशान्वये अशा डॉक्टरांचे परवाने रद्द झाले पाहिजे. 
याबाबत सविस्तर महिती अशी की, एक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय काम करणारी व्यक्ती संगमनेर शहरातील बस स्टॅण्ड समोरच्या परिसरात स्वत:ची तपासणी करण्यासाठी गेली होती. बराच वेळ ओपीडीत बसल्यानंतर डॉक्टर आले. लांबूनच विचारणा केली. तुम्हाला काय होत आहे. येथे काही तपासणी होत नाही. येथून निघून जा. त्यावर हे पेशन्ट उत्तरले. सर मला सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी असा कोणताही आजार नाही. फक्त, टॉन्सिल दुखत आहे. मात्र, डॉक्टर महाशय ऐकतील ते सज्जन कसले. ते थेट पेशन्टवर चालून गेले. तुम्हाला म्हटलं ना! चालते व्हा. ‘तुम्हाला कोरोना झाला आहे’. आमच्या हॉस्पिटालमधून लगेच निघा. आम्हाला उद्धव साहेबांचे आदेश आहेत. कोरोना पेशन्टची तुम्ही तपासणी करायची नाही. असे म्हणत गैरवर्तन केले. इतकेच काय कोणतीही तपासणी न करता हॉस्पिटलच्या बाहेर हुसकावून दिले.
                   हे डॉक्टर महाशय येथेच थांबले नाही. तर यांनी या पेशन्टची बदनामी करण्यासाठी एक व्हिडिओ व लेखी तक्रार मेडिकल असोसिएशन आणि प्रशासनाकडे तक्रार केली. मात्र, हे पेशन्ट महाशय देखील कमी नव्हते. दोन समान व्यक्तींची कुस्ती जशी समांतर होते. तसेच येथे पहायला मिळाले. हे पेशन्ट पेशाने वकील होते. त्यांनी देखील घडलेल्या प्रकाराचा व्हिडिओ काढला होता. इतकेच काय! हा सर्व प्रकार लेखी घेऊन त्यांनी थेट प्रांताधिकारी कार्यालय गाठले.  ही घटना निंदनिय असून चोराच्या उलट्या बोंबा असा प्रकार आहे. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, जिल्हाशल्यचिकित्सक, भारतीय मेडिकल असो. व महाराष्ट्र मेडिकल असो. यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या डॉक्टरांच्या हॉस्पिटलची चौकशी करुन घडलेला प्रकार जबाबदारी झटकणारा आहे. तसेच जिल्हाधिकारी यांनी दि. 5 एप्रिल 2020 रोजी काढलेला आदेश देखील तक्रारीसाठी जोडला आहे.
दरम्यान सध्या तरी हा वाद प्रांताधिकार्‍यांच्या कोर्टात गेला असून त्यांनी दोन्हा व्यक्तींना समोरासमोर बोलविण्याचा तोडगा आखला आहे. त्यामुळे, आता काळा कोट मागे हाटतो की टेथस्कोप याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.क