अनैतीक संबंधातून स्त्री जातीचे अर्भक जंगलात फेकले.! देवगावची घटना; राजूर पोलिसांचा तपास सुरू, गुन्हा दाखल
सार्वभौम (देवगाव) :
अकोले तालुक्यातील देवगाव परिसरात एका तास ते आठ महिन्यांचे स्त्री जातीचे अर्भक जंगलात फेकून दिलेल्याचे आढळले आहे. हे अर्भक मृत आवस्थेत सापडले असून ते मारले की मेल्यानंतर फेकून दिले. हे अद्याप समजले नसून या बालकाचा बहुतांशी भाग पक्षांनी खाल्याचे निदर्शनास आले. देवगावच्या परिसरात कावळ्यांनी जास्त कालवाकालव सुरू केल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर राजूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला व त्याचा पंचनामा करुन अज्ञात व्यक्तीवर 318 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही खून की पालकत्व नाकारणे तसेच अनैतीक संबंधाचा प्रकार आहे. की, अन्य प्रकार हे लवकरच उघड होईल. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवगाव परिसरात गेल्या दोन दिवसांमध्ये एका दाट जंगलाच्या परिसरात कावळ्यांची जास्तच कावकाव सुरू झाली होती. त्यामुळे, तेथील पोलीस पाटील बालाजी भांगरे, सरपंच सचिन भांगरे यांना संशय आला होता. त्यांनी घटनेची शाहनिशा करण्यासाठी थेट जंगल गाठले असता त्यांना तेथे एक अर्भक दिसून आले. त्यांनी सदरची बाब राजूर पोलीस ठाण्याचे अधिकारी नितीन पाटील यांना कळविली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट घटनास्थळ गाठले. काट्याकुट्याची वाट तुडवत प्रचंड वास येत असतांना त्यांच्या पथकाने ते पक्षांनी चोची मारुन खाल्लेले निम्मे अर्भक ताब्यात घेतले. डॉक्टरांच्या समक्ष त्याचा पंचनामा झाला. यावेळी पोलिसांना बाकी फार मोठी कसरत करावी लागली. याप्रकरणी पोलिसांनी अनैतीन संबंधाचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे जर एखादी व्यक्ती एखाद्या मुलाचा जन्म लपवून त्यास नष्ट करण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यावर कलम 318 प्रमाणे कारवाई केली जाते. ही कायदेशीर कारवाई पोलिसांनी केली आहे.
दरम्यान अशी माहिती समजली की, हे स्त्री जातीचे अर्भक जीवंतपणे या झाडीत टाकलेले असावे. त्यामुळे, बालकाच्या मृत्युस त्याचे पालकच कारणीभूत ठरणार आहे. ते जिवंत असो वा मृत्यु पण त्याच्या मृत्युस आई किंवा पालक जबाबदार असू शकतात. त्यामुळे या गुन्ह्यात तपासाअंती खुनाचा गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. असे वकीलांचे मत आहे. तर पोलिसांनी या गुन्ह्याच्या तळाशी जाण्याचा निर्णय घेतला असून पाटील साहेब यांच्यासाठी हे एक प्रकारे चॅलेंज असल्याचे बोलले जात आहे.संकेत सामेरे
देवगाव (प्रतिनिधी)