संगमनेरात 108 वाहनांवर 188 ची कारवाई; लोक वाहने सोडून निघून गेले.! करा काय कारयचे ते.!


संगमनेर (प्रतिनिधी) :
                             सागून शिकवून लोक घरात बसायला तयार नाहीत. त्यामुळे आता पोलिसांनी घरोघरी जाऊन समजून सांगणे बंद केले असून आत जो रस्त्यावर उतरेल त्याच्यावर कारवाई करणे सुरू केले आहे. आज बुधवार दि.8 रोजी संगमनेर पोलिसांनी शहरात 150 वाहनांवर कारवाई केली. ज्यांची योग्य कारणे वाटली त्यांना सोडून दिल्यानंतर 108 वाहनांवर 188 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असून आता या महाशयांना न्यायालयीन प्रक्रिया पुर्ण केल्यानंतर वाहने ताब्यात मिळणार आहे. त्यामुळे, पोलीस उपाधिक्षक रोशन पंडित, पोलीस निरीक्षक अभय परमार, सहायक पोलीस निरीक्षक प्पपू कादरी, पीएसआय संजय कवडे यांच्यासह अनेक अधिकार्‍यांनी दिवसभर रस्त्यावरील मोहिम फत्ये केली आहे. त्यांच्या हा कारवाईनंतर शहरात गर्दीचे प्रमाण कमी झाल्याचे पहायला मिळाले. तर उद्या मात्र तुलनात्मक फारच कमी गर्दी पहायला मिळणार आहे.
                   देशात व राज्यात कोरोनाची चिंताजनक परिस्थिती असताना संगमनेर शहरात तीन कोरोनाबाधीत रुग्ण आढळले. कोरोनाचा प्रदुर्भाव कमी करण्यासाठी संगमनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद होते. तीन दिवसानंतर अत्यावश्यक सेवा सुरळीत करण्यासाठी 12 ते 3 ही वेळ देण्यात आली. परंतु लॉकडाऊन नंतर काही महाभागांना, संगमनेर शहरामध्ये कोरोना विषाणूचा विसरच पडला की काय?असे वाटु लागले. पोलीस प्रशासन दिवस-रात्र एक करून या विषाणूचा प्रदुर्भाव कमी होण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण, अनेक जण अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली शहरात फेरफटका मारण्यासाठी येतात. हे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास दिल्ली नाका येथे पोलीस प्रशासनाने धडक कारवाई करत 150 दुचाकी स्वारांवर कलम कारवाई केली. यावेळी डीवायएसपी रोशन पंडीत, पोलीस निरीक्षक अभय परमार, पोलीस उपनिरीक्षक संजय कवडे, श्री. केदार, श्री. भाटेवाल, श्री. परदेशी व राज्य राखीव दल यांनी ही कारवाई केली. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे लॉक डाऊन सुरू आहे. मंगळवारी दुपारी 12 ते 3 या वेळेत संचारबंदीत नागरिकांना अत्यावश्यक कामासाठी शिथिलता देण्यात आली. या दरम्यान हजारो संगमनेरकर दुचाकी-चारचाकी वाहने घेऊन रस्त्यावर उतरल्याचे आढळून आले. कोरोनाचे गांभीर्य लोक विसरले की काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला होता. या धडक कारवाईने मोठ्या प्रमाणात विनाकारण मोकाट फिरणार्यांना चांगलाच चाफ बसेल.

व्यापारी असो.चा कर्मचार्‍यांनी केला निषेध.!
खरंतर कोरोनाची इतकी भयानक परिस्थिती असल्यामुळे सामान्य माणूस रस्त्यावर यायला तयार नाही. मात्र, हे व्यापारी त्यांची दुकाने चालु ठेवतात व कर्मचार्‍यांची इच्छा नसताना कामावर बोलवतात. आज हेच विदारक चित्र पहायला मिळाले. कर्मचारी दुकानावर जात असतांना पोलिसांनी त्यांच्या गाड्या अडविल्या. मात्र, जेव्हा कर्मचार्‍यांनी मालकांना फोन करुन घडलेला प्रकार सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मात्र काहींचे फोन बंद झाले तर काहींचे आऊट ऑफ रेंज गेले. त्यामुळे, हे मालक गल्ल्यावर बसतात आणि गोरगरीबावर वेळ आली की संपर्कक्षेत्राच्या बाहेर जातात. हा कोणता न्याय. त्यामुळे, अनेकांनी स्वार्थी भावना बाळगणार्‍यांचा निषेध केला. तर, काही व्यापारी आसो.च्या व्यक्तींनी कर्मचार्‍यांसाठी पोलिसांपुढे हात देखील जोडले. त्यामुळे, आपल्या मालकाची कृतज्ञता पाहुन कर्मचार्‍यांच्या डोळ्यात पाणी आल्याचे पहायला मिळाले.

50 पेक्षा जास्त वाहने सोडून दिली.!
पोलीस देखील माणूस आहे. तो नेहमी टिकेचा धनी ठरत असतो. मात्र, त्यांच्या आत देखील एक जबाबदारी व आत्मियता दडलेली असतेे. मात्र, त्यांना समजून घेतांना अनेकजण कमी पडतात. पोलिसांनी काही वाहने पकडली खरी, त्यांच्याकडे सबळ कारणे देखील होती. मात्र, तरी देखील त्यांना काही वेळ बसवून ठेवण्यात आले. जेणे करुन पुढील वेळी बाहेर पडतांना ते हजारदा विचार करतील. काही वेळानंतर पोलिसांनी त्यांना सोडून दिले. मात्र, हे सर्व कोणासाठी सुरू आहे. याची जाणीव करुन दिली. विशेष म्हणजे कोणी आमदारांची नावे सांगितली तर कोणी खासदारांची फान छान-छान कारणे आणि वशील्यांची मैफील पोलिसांच्या भोवती रंगताना दिसली. मात्र, नाही म्हणजे नाही असे म्हणत अखेर 80 गाड्या ताब्यात उरल्या.


सागर शिंदे
सुशांत पावसे
============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे 22 लाख वाचक)