प्रवरामाईतील मटनाच्या गोण्या उचलायच्या कोणी! गावकरी आक्रमक, पोलीस तपास सुरू, नगरपालिकेचा वेट अॅण्ड वॉच.!
सार्वभौम (संगमनेर):-
अमृततुल्य प्रवरमाईच्या पाण्यात काही आज्ञतांनी हजारो किलोचे गोमांस फेकले होते. याचे छायाचित्र काढून दै. रोखठोक सार्वभौमने प्रवरामाईच्या पाण्यात फेकलं हजारो किलो मटन! या मथळ्याखाली पिण्याच्या पाण्याचा विषय मांडला होता. त्यावर प्रशासन व गाव देखील खडबडून जागे झाले आहे. रायते-वाघापुर, निंबाळे या गावांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन त्या आज्ञतांवर गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करावी. अशी मागणी केली. यावर पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी समक्ष घटनास्थळी पाहणी करून पुढील कार्यवाही करिता संगमनेर नगरपालिकेचे मुख्यअधिकारी यांना कळविण्यात आले आहे. अशी माहिती पोलीस पाटील ऍड. नानासाहेब शिंदे यांनी दिली.
प्रवरामाईत काही समाजकंठकांनी गोमांसाची योग्य विल्हेवाट न लावता ते नदीत फेकून दिले होते. ही समाजविघात कृती नेमकी कोणी केली. हे अद्याप लक्षात आले नाही. मात्र, या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी दिले आहे. लॉकडाऊनच्या काळात हा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. नागरिकांनी सोशल मीडियावर शेकडो प्रतिक्रिया देत घडलेल्या प्रकारचा निषेध केला. संगमनेरातील बेकायदा कत्तलखाने बंद असल्याचा संगमनेर पोलिसांचा दावा खोटा असल्याचे चित्र रायते-वाघापुर-निंबाळे या ग्रामपंचायतीनी उघडे पाडले आहे.
एक महिनाभरापुर्वी रायते गावात संगमनेर बेकायदा कत्तलखान्यातील टाकावू रक्ताळलेले अवशेष अनधिकृतपणे गाडले जात होते. याच प्रवरानदीच्या परिसरात हे गोमांस चौथ्यांदा आढळल्याने या भागाचा रस्ता अज्ञातांना चटावला आहे की काय? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संगमनेर शहरातील गेली अनेक वर्षांपासून सांडपाणी, मैला इतकेच काय तर कत्तलखान्यातुन निघणारे रक्तमिश्रित पाणी याच प्रवरा नदीपात्रात सोडत आहे. नदीला पाणी नसले तरी हे लाल-काळ पाणी मात्र निश्चित असते. त्यातच ह्या परिसरात थेट गोमांस टाकून रायते-वाघापुर-निंबाळे या परिसरातील लोकाच्या भावनेचा अंतच केला आहे. अद्याप कारवाईवर फक्त आश्वासन दिले जात आहे. त्यावर प्रशासनाने कुठली ठोस पावले उचलली नाही. खरंतर नदीत पडलेल्या या गोमासाची विल्हेवाट प्रशासन लावते की नाही हे पाहणे आता गरजेचे आहे.
जगातील कोरोनाचे संकट हे संगमनेरात येवून पोेहचले आहे. तरी देखील येथील काही व्यवसायिक या महामारीला गांभिर्याने घ्यायला तयार नाही. शासनाने जे काही निमय ठरवून दिले होते. त्याचा देखील फायदा घेत पालेभाज्यांमध्ये लोक मटन वाहु लागले आहे. म्हणजे येथे प्रत्येकाला देशाच्या सुरक्षेचा प्रश्न पडलेला असताना काही व्यक्तींचा फक्त मटन खाण्यासाठी आटापिटा सुरू आहे. तर काही व्यापारी फक्त रग्गड पैसा कमविण्याच्या मागे लागले आहेत. जेव्हा प्रशासनाने हे मटन पकडले तेव्हा त्याची विल्हेवाट कोठे लावायची म्हणून ते कारवाईच्या भितीपोटी हे पुलाहून या मटनाच्या गोण्या खाली फेकल्या असाव्यात असे बोेलले जाते. पण, यात नेमका कोणाचा हात आहे. हे आपच्या हाती आले असून पोलीस काय कारवाई करतात हे काही तास पाहणे महत्वाचे आहे.
नदीत पडलेले ते मटन कोणी उचलायचे? त्याची विल्हेवाट कोणी व कशी लावायची? याबाबत प्रशासन संभ्रमात आहे. मात्र, हे नगरपालिकेच्या सफाई कर्मचार्यांचे नाव पुढे येण्यापुर्वी एखादा जेसीबी पाहुन ते उचलले तर योग्य ठरेल. कारण, ते कर्मचारी देखील मानसे आहेत. हे विसरुन चालणार नाही. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे हा प्रकार कोणी केला. याचा तपास करणे फार काही अवघड नाही. ज्यांनी ते टाकले आहे. त्या व्यक्तींना ते ऊचलण्यास सांगितले तर प्रवरामाईला तो योग्य न्याय मिळाल्यासारखे होईल.