संगमनेर झाले शंभर टक्के कोरोनामुक्त! त्या चौघांचे अहवाल निगेटीव्ह, पण...


सार्वभौम (संगमनेर) : 
                       संगमनेरकरांसाठी एका आनंदाची बातमी प्रशासनाने दिली आहे. की, गेल्या 15 ते 20 दिवसापासून कोरानामुळे शहरात दहशत निर्माण झाले होते. कारण नाईकवाडीपुरा येथे चार कोरोना बाधित रूग्ण मिळून आले होते. आज त्यांच्यावरील उपचार पुर्ण झाले असून ते पुन्हा निगेटीव्ह आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. परंतु, या चौघांना विलगीकरणासाठी संगमनेर रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. यांना आणखी 14 दिवस निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. आता हे चारही व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक, प्रांताधिकारी शशिकांत मंगरूळे व तहसिलदार अमोल निकम यांनी दिली आहे.
नगर जिल्ह्यात चार ठिकाणी कोरोनाचे प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून आला होता. नगर शहर व जामखेड नंतर संगमनेर देखील कोरोनाच्या अजेंड्यावर होते. मात्र, स्थानिक प्रशासनाने त्यास चांगली टक्कर देत कोरोनावर विजय मिळविला आहे. कारण, अवघ्या 20 दिवसानंतर संगमनेर तालुक्यात एकही कोरोना बाधित रूग्ण आढळून आला नाही. शहरात तीन व आश्वी येथे एक असे चार रूग्ण आढळल्यानंतर तब्बल 10 हजार लोक प्रशासनाने होमक्वारंटाईन केले होते. तर शहरातील पाच ते सहा परिसरांना सील करण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शहराला हॉटस्पॉट घोषित करण्यात आले होते. खरंतर प्रशासनाचे आभार मानले पाहिजे. की, चार कोरोना नंतर त्यांनी संगमनेर शहराच्या वेशी बंद करुन गो-कोरोनाचा नारा दिला. आज खर्‍या अर्थाने सर्व प्रशासनाची मेहनत फळाला लागली आहे. म्हणून तर संगमनेर कोरोनामुक्त झाले आहे. पोलीस प्रशासन, महसुल, नगरपालिका आणि समाजसेवक यांच्या अथक प्रयत्नाचे हे फलित असल्याचे मान्य करण्यात कोणाचे दुमत नसावे. आता शहरात सद्या सर्व 15 हजारांच्या जवळपास जनता ही घरात बसून ठेवण्यात प्रशासनाला यश आले आहे. कदाचित मधल्या काळात काही नियम शिथिल केले असते तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असता. मात्र, प्रांताधिकार्‍यांनी घेतलेला तीन दिवस स्वयंस्पुर्तीने बंदचा निर्णय, शहर वाहतुक शाखा, शहर पोलीस ठाणे, पोलीस उपाधिक्षकांनी केलेली धडक कारवाई आणि ग्रामीण पोलिसांनी सिमारेषांवर ठोकलेला तळ हा संगमनेरला तारुन गेला.
दरम्यान अकोलेकरांनी संगमनेरचा फारच धसका घेतला होता. कोणी संगमनेरहुन येऊ नये यासाठी काही समाजसेवक रस्त्यावर उतरत होते. कोरोनाने सख्खा भाऊ पक्का वैरी केला होता. मात्र, आता अकोलेकरांचा जीव देखील भांड्यात पडला आहे. विशेष म्हणजे अकोल्यात कोरोनाचा एकही रूग्ण मिळून आला नाही. त्यामुळे, तेथील प्रशासनाचे देखील करावे तितके कौतुक कमीच आहे.
या आनंदाच्या बातमीनंतर तहसिलदार अमोल निकम यांनी जनतेला आवाहन केले आहे की, 3 मे पर्यंत आपण लॉकडाऊनचे काटेकोर पालन करावे. अत्यावश्यक सेवेशिवाय घराच्या बाहेर पडू नये. आजवर आपण खूप संयम बाळगला आहे. तो कायम ठेवावा. आपल्या वर्तणूकीत शिथिलता येता कामा नये. सर्वांनी प्रशासनास मदत करावी.

sagar shinde