अखेर 600 पोती तांदळाची तस्कारी करणार्‍यांवर गुन्हा दाखल, संगमनेरचे दोघे व नगरचा एक अशा तिघांवर गुन्हा.!


सार्वभौम (संगमनेर) : 
                         कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा विभागाकडून अकोले तालुक्यासाठी प्रशासनाने 600 पोते तांदुळ पाठविण्यात आले होते. त्या पोत्यांचा मध्येच गाळा करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकार उघड झाला असून आज याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात रशिद फकीर पठाण (रा. वडगाव गुप्ता. नगर तालुका), योगेश चंद्रभान भडांगे (रा. अकोले रोड, देवाचा मळा, संगमनेर), विजय कचेश्वर सोनार (रा. राहणे मळा, संगमनेर) या तिघांना आरोपी करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर पोलिसांना गोपनिय माहिती मिळाली होती की, मंगळवार दि. 14 एप्रिल रोजी पहाटे नगरहुन रेशनचे तांदुळ असणारा ट्रक अकोल्याकडे जाणार आहे. मात्र, त्यातील काही धान्य काढून घेण्याचे प्रयोजन काही आरोपींनी केले आहे. त्यानंतर पोलीस निरीक्षक अभय परमार व सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी पंचायत समिती परिसरात सापळा रचला. दरम्यान सकाळी एम. एच 16 एफवाय 6525 ही ट्रक त्यांना दिसून आली. त्यांनी काही वेळ थांबून वाट पाहिली असता त्यावेळी अणखी एक ट्रक (एम.एच 12 एचसी 2137) तेथे आला. त्यांनी पाहिले की, रेशनिंगच्या गाडीतून खाजगी गाडीत काही व्यक्ती तांदळाचे पोते खाली करीत होते. आपल्याला कोणी पाहणार नाही. असे त्यांचे प्रयोजन लक्षात येताच पोलिसांनी त्यांना तांदळाची तस्कार करताना रंगेहात पकडले. यावेळी त्यांनी पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांचा पाटलाग करून तिघांना ताब्यात घेतले. त्याची नावे विचारली असता त्यांनी रशिद पठाण, योगेश भडांगे व विजय सोनार असे सांगितले.
यावेळी गाडी चालक पठाण यास या धान्याविषयी विचारले असता त्याने सांगितले की, ही गाडी रेशनिंगची असून ती नगर तालुक्यातील नागापूर गोडावून येथून अकोले तालुक्यासाठी आणली होती. त्याच्याकडील बिल्टीवर जिल्हा पुरवठा विभागाचा शिक्का असून एकूण वजन 422 क्विंटल 70 किलो असे आहे. अशी माहिती पोलिसांना कागदोपत्री मिळाली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी त्या दुसर्‍या गाडीविषयी विचारणा केली असता चालकाना अगदी उडवाउडविची उत्तरे दिली. त्यामुळे, एका गाडीतून दुसर्‍या गाडीत धान्य उतरविलेला माल व रेशनची गाडी अशी दोन्ही वाहने पोलिसांनी जमा करुन घेतली होती. याप्रकारणी आज गणेश सुभाष भालेराव (पुरवठा निरीक्षक, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी गुन्हा दाखल होतो की नाही अशी शंका असताना रोखठोक सार्वभौमने याबाबत वृत्त प्रकाशीत केले होते. त्यानंतर डॉ. किरण लहामटे, वैभव पिचड, मधुकार तळपाडे, भानुदास तिकांडे, विजय वाकचौरे, स्वप्नील धांडे, यांच्यासह अकोल्यातील अन्य समाजसेवकांनी सखोल चौकशी करत पाठपुरावा केला. त्यामुळे, प्रशासनाने तत्काळ गुन्हा दाखल करण्याचा मुहूर्त काढला. मात्र, डॉ. किरण लहामटे यांनी याबाबत प्रशासनाची चांगलीच कान उघडणी करून या घटनेच्या मुळापर्यंत जाण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
सागर  शिंदे
============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे २३ लाख वाचक)