संगनेरात 9 परिसर सिल, 12 हजार 203 होमक्वारंटाईन, 44 जणांचे विलगीकरण; 34 जणांवर गुन्हे, चार रिपोर्ट पेंडींग
संगमनेर (प्रतिनिधी) :
संगमनेरमध्ये कोरोना दाखल झाला आहे. अशा कठीण परिस्थितीत प्रशासनाचे पाय जमिनीवर टेकायला तयार नाही. त्यामुळे गेल्या 48 तासापासून तालुक्यात लॉकडाऊन सुरू आहे. या निर्णयाला जनतेने चांगलेच मनावर घेतले असून रस्त्यावर वाहन दिसायला तयार नाही. विशेष म्हणजे पोलीस प्रशासनाने देखील आता कारवाईसाठी कंबर कसली असून आजवर कोरोनामुळे एकूण 34 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सद्या तालुक्यात चार कोरोना बाधित, असून त्यांच्यामुळे संगनेरात 9 गल्ल्या सिल करण्यात आलेल्या आहेत. शहरातील 12 हजार 203 संशयीतांना होमक्वारंटाईन करण्यात आले असून एकूण 44 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे. तर चार संशयीतांचा रिपोर्ट पेंडींग असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
जगात कोरोना विषाणुने थैमान घातलेले असतांना महाराष्ट्रत त्याची लस पसरली आहे. त्यातच दुर्दैवाने संगमनेर तालुक्यातही चार नागरिकांना लागण झाली आहे. त्यानंतर संगमनेर प्रशासनाने युद्ध पातळीवर निर्णय घेत संगमनेर वैद्यकीय सेवा वगळता लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संगमनेर मध्ये तीन दिवस लॉकडाऊन काटेकोर पद्धतीने अंमलबजावणीकरत प्रशासनाच्या सतर्कतेमुळे पाळण्यात आला.तालुक्यात चार रुग्ण आढळुन असले तरी त्यांच्या संपर्कात आलेल्या 44 जणांवर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे.त्यांचे विलगीकरन करून संगमनेर खुर्द येथे 15 जण तर चंदनापुरी घाटात 29 जण ठेवण्यात आले आहे. तर, संपूर्ण तालुक्यात 12 हजार 203 संशीयतांना प्रशासनाने होमक्वारंटाईन मध्ये ठेवले आहे. मात्र तालुक्यातील जनतेने घाबरण्याचे कारण नसुन प्रत्येकाने काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. संगमनेर तालुक्यात चार रुग्णांपैकी तीन रुग्ण हे शहरातील असल्याने शहरातील काही भाग सील करण्यात आले आहेत. त्यात अलकानगर, रहेमतनगर, अमरधाम परिसर, पुणे नाका, परदेशपुरा, घासबाजार, मोमीनपुरा, सय्यदबाबा चौक, देवीगल्ली असे भाग सील केले आहेत. त्यात एकूण 2 हजार 512 घरे आहेत तर त्यात 13 हजार 227 व्यक्ती आहेत. या व्यकींचीही तपासणी करण्यात येणार आहे. या करीता 13 पथक निर्माण केले आहेत. एक रुग्ण आश्विबुद्रुकचा असल्याने तोही भाग सील करून सहा वैद्यकीय पथक नेमण्यात आले आहे.
यांच्यावर गुन्हे दाखल
ए.पी.जोर्वेकर (रा. फादरवाडी), वाय.सी. कासार (रा. रहेमतनगर), पी. एम. खान (रा. मदिनानगर), एस. एन शेख (रा. खळी), व्ही. पी. बीग (रा. इंदिरानगर), एस. आर. शेख (रा. लखमीपुरा), एस. ई. खान (रा. एकतानगर), एम. एफ. पठाण (रा. मुगलपुरा), वाय. व्ही. त्रिभूवन (रा. खांडगाव), व्ही. सी. वैराळ (रा. मंगळापूर), एम. एम. शेख (मोलगपुरा), सरदारखान पठाण, फिरोज पठाण, अमिरखान पठाण (रा. मोमीनपुरा), अमोल डेंगाळे, शंकर डमाळे, सागर वामन, वसंत राऊत, दशरथ जौसवाल, गुड्डा जयस्वाल (घुलेवाडी), अशा 27 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
तर परदेशी नागरिकांना आश्रय दिल्याप्रकरणी हाजी जलीमखान कासमखान पठाण, हाजी शेख जियाउद्दीम आमीन, जैनुद्दीन हुसेन परावे, हाजी इमाम जैनुद्दीन मोमीन, शेख रिजवान गुलाबमनी मोमीन (रा. मोमीनपुरा) यांना आरोपी केले आहे. त्याच बरोबर गोमांस व कोंबड्यांची वाहतुक करणार्या मोबील शेख, अरबाज कुरेशी, जहीर कुरेशी, बुंदी कुरेशी अशा चौघांना आरोपी केले आहे. या सर्वांवर देशात कोरोनाचे संकट ओढावलेले असतांना यांनी कायद्याचा भंग केल्याचे गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहे.
सद्या 3 ते 5 तारखेचा लॉकडाऊन सुरू असतांना प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. की, दि. 6 एप्रिल ते 14 एप्रिल पर्यंत शहरात सबळ कारण वगळता एकही दुचाकी दिसणार नाही. अशा नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
सागर शिंदे
सुशांत पावसे
============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे १९ लाख वाचक)