संगमनेरच्या साकुरमध्ये रात्री नंग्या तलवारी नाचल्या.! शाहरुख खानचा वाद पुन्हा उफाळला.! पोलिसांचा हस्तक्षेप, अनर्थ टळला.!


सार्वभौम (साकूर) : 
                      गेल्या महिन्यात साकुर येथे शाहरुख खान या सिने अभिनेत्याच्या दानशुरतेहुन दोन गटात वांदग झाले होते. तर त्याच वेळी फवारणी मारण्याहुन देखील मारामार्‍या झाल्या होत्या. त्यामुळे, साकूर हायअलर्ट झाले होते. याच वादाची किनार घेत खान प्रकरणाचा उद्रेख झाला आहे. काल सोमवारी दि.20 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास काही तरुणांनी आरडाओरड करीत नंग्या तलवारी बाहेर काढून साकुरमध्ये दहशत निर्माण केल्याचे पहायला मिळाले. यात एकास मारहाण देखील झाली. पण, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि गावात पुन्हा शुकशुकाट झाला. अर्थात यापुर्वी देखील हा वाद घडला होता. तेव्हा पोलीस ठाण्यात साधी एक देखील एनसी दाखल झाली नाही. त्यामुळे, येथील दंगेखोर सोकावले असून पोलीस राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी पडत असेल. तर, त्यांच्याकडून कायदा व सुव्यवस्था राखण्याची अपेक्षा काय करावी. या प्रकारामुळे, एक दिवस साकुरमध्ये अराजकता माजेल आणि पोलीस काहीच करु शकत नाही. त्यामुळे, काल जो प्रकार घडला. त्याबाबत पोलीस फिर्यादी होऊन अशा गुन्हेगारांवर चाप बसविणे गरजेचे आहे. 
                 संगमनेर तालुक्यातील साकुर पठारभागावर कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. एकीकडे संगमनेर शहरात फिरणारे हौशे-नवशे-गवशे यांच्या वर 188 प्रमाणे कारवाई करून कायद्याचा धाक दाखवला जातो. तर साकुर पठारभागावर कायदा सुव्यवस्था हातात घेणार्‍यांना याच लॉकडाऊनचा पोलीस प्रशासनाकडून आश्रय दिला जातोय. किरकोळ वादातून झालेल्या दोन गटातील हाणामारीत ठीनगी पडली होती. ती आता आग बनवुन साकुर पठारभागात थैमान घालत आहे. आता या आगीत कितीजण होरपळतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दि.20 एप्रिल रोजी रात्री 9 च्या सुमारास साकुर ग्रामपंचायती समोरील चौकात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात एक जण जखमी झाला असल्याचे समजते.
                       हा वाद पूर्वीच्या वादातून उफळा असल्याचे समजते. वादाचे रुपांतर मोठे होत चालल्याने घटनास्थळी पोलीस प्रशासनाने धाव घेतली. यामुळे विघ्नसंतोषी कृत्य जरी टळले असले तरी पोलीस स्टेशनमध्ये साधी एनसी देखील नोंदविली नव्हती. त्यामुळे, तेथे वारंवार कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासन मात्र राजकीय व्यक्तीच्या दबावाला बळी पडून निव्वळ बघ्याची भुमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे प्रशासन कोरोना संकटात दोन हात करीत रात्रंदिवस एक करून रस्त्यावर उतरले आहे. बेशिस्त फिरणारे व बेजबाबदार लोकांवर कारवाई करून नागरिकांना शिस्त लावण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाच्या धडक कारवाई नंतर शहरातील रस्त्यांना शुकशुकाट पहायला मिळाली. पण, साकुर भागात अशी कुठली धडक कारवाई करून शिस्त लावण्यात आली नाही. पर्यायी कायदा हातात घेऊन आपली दहशत बनवायचे काम येथे सुरू आहे.
                                    खरतर पोलीस महानिरीक्षकांनी साकुर भागात एच-एम सारखे गुन्हे असतील तर त्याचा तपास थेट अधिकार्‍यांनी करावा असे आदेश काढले होते. परंतु, साकुर भागातील टोळीयुद्धवर गुन्हे दाखल असते तर आज कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नसता. संगमनेर तालुक्यातील साकुर पठार भाग हा आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे. यामुळे, रिकाम्या हाती शैतानाचे घर मनामध्ये करून चौका-चौकात टोळी युद्ध सुरू आहे. त्यांच्यावर साधी अदखलपात्र नोंद झाली तरी किमान पीएसआय दर्जाच्या अधिकार्‍याने त्यात लक्ष घालावे. मात्र, घारगाव हद्दीत या नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे.
                                देशात आणीबाणीसारखी परिस्थितीत ओढवलेली असताना एखाद्या तालुक्यात जातीय वादंग उभे राहतात व ते दडपले जातात. ही दुर्दैवाची बाब आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांने याकडे लक्ष देऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. याची जबाबदारी घ्यायला हवी. त्यांनी स्वतः या प्रकरणांमध्ये लक्ष घालायला हवे. नाहीतर येणार्‍या काळात या घटनेचा उद्रेख कधीही रौद्ररूप धारण करू शकतो.