अखेर ते हजारो किलोचे मांस गाडले.! आरोग्याच्या प्रश्नाबाबत टाळाटाळ नको - ना. बाळासाहेब थोरातांचे
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेर तालुक्यापासुन एक किलोमीटर अंतरावर असलेले रायते-निंबाळे पुलाखाली नदीपात्रातील मुख्य प्रवाहामध्ये हजारो किलोचे गोमांस काही अज्ञातांनी फेकले होते. यावर दैनिक रोखठोक सार्वभौमने या प्रश्नाला वाचा फोडली होती. त्यानंतर निंबाळे, रायते व वाघापुर या गावचा पाणी पिण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता. हे ना. बाळासाहेब थोरात यांना कळताच त्यांनी प्रशासनाला धारेवर धरत त्यांची चांगलीच कान उघडणी केली. हे गोमांस लवकरात लवकर उचलून याची योग्य ती विल्हेवाट लावा. असे खडेबोल त्यांनी प्रशासनला सुनावले. त्यानंतर आज 20 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता नगरपालिकेने जेसीबीच्या सहायाने खड्डे घेऊन याची विल्हेवाट लावली आहे.
गेली पाच दिवसांपासुन हे गोमांस नदीपात्रात पडुन होते. या प्रकारामुळे परिसरातील वातावरणात प्रचंड दुर्गंधी निर्माण झाली होती. घोंगावनार्या माशा, मांस तोडणार्या कुत्र्यांसह वेगवेगळ्या कीटकांचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे निंबाळे, रायते-वाघापुर शिवारातील पाच हजार ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले होते. यावर दै. रोखठोक सार्वभौमने आवाज उठवला होता. त्यानंतर, स्थानिक प्रशासनासह गावही खडबडून जागे झाले. यावर निंबाळे, रायते-वाघापुर या गावांनी तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, नगरपालिकेचे मुख्याधिकारी गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले होते. यावर पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी समक्ष घटनास्थळी पाहणी करून पुढील कार्यवाही करीता संगमनेर मुख्याधिकारी यांना कळविण्यात आले होते. परंतु, गेली दोन ते तीन दिवस जेसीबी चालक उपलब्ध नसल्याने याकडे सर्वांनी काना-डोळा केला होता. प्रशासन सुस्त असले तरी या परिसरातील लोकांच्या भावनेचा अंतच झाला होता. सामान्य जनता करणार तरी काय? परंतु, सामाजिक नेते अॅड. नानासाहेब शिंदे यांना ही गोष्ट खटकली व त्यांनी थेट नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांना फोन करून घटनेचे गांभीर्य सांगितले. अॅड. शिंदे यांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करून याची दखल घेण्यास भाग पाडले. त्यानंतर थेट नामदार साहेबांनी यात हस्तक्षेप केेल्यानंतर परिसरातील लोकांच्या आरोग्यने नि:श्वास सोडला. आज 20एप्रिल रोजी सकाळी 11 वा. पोलीस प्रशासन व नगरपालिकेच्या सहाय्याने नदीपात्रातील गोमांसची विल्हेवाट लावली. यावेळी सामाजिक नेते अॅड. नानासाहेब शिंदे, पोलीस सहाय्यक संजय कवडे, बाळासाहेब यादव सरपंच शिवाजी शिंदे, बाबासाहेब शिंदे, विनोद घोलप , ग्रामसेवक पर्बत, वाघापुर ग्रामसेवक उत्तम नवले आदी. उपस्थित होते.
प्रवरा नदीपात्रात कुठली दुर्गंधी होणार नाही. याची काळजी प्रशासनाने वेळो-वेळी घ्यायला हवी. कुठला माथेफिरू हे विघ्नसंतोषी काम करत असेल तर त्याच्या वेळीच मुसक्या पोलीस प्रशासनाने आवळल्या पाहिजे. स्थानिक नागरिकांनीही प्रवरामाईबद्दल आस्था ठेऊन कुठले प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.सामाजिक नेते अॅड. नानासाहेब शिंदे.
रोखठोक सार्वभौमने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर वाघापुर ग्रामपंचायतीत तातडीने बैठक घेतली. प्रशासनास या घटनेचे गांभीर्य कळवले. त्या नंतर नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने योग्य ती विल्हेवाट लावली. त्याबद्दल रोखठोक सार्वभौम, नगरपालिका व पोलीस प्रशासनाचे आभार.....प्रवरा नदी पात्र वारंवार प्रदुषित करून रायते परिसरातील लोकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. यावर लवकरच 8-10नागरिकांची समिती नेमवुन प्रवरमाई प्रदुषण मुक्त कसे करता येईल. यावर उपाय योजना करू...
-शिवाजी शिंदे (सरपंच वाघापुर)
रवींद्र पर्बत(रायते ग्रामसेवक)
हिवरगाव पठार येथे गोहत्या; चौकशीची मागणी
संगमनेर तालुक्यातील साकुर पठार भागापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेले हिवरगाव पठार येथे राजरोस गोहत्या केली जात आहे. त्यावर प्रशासनाने कारवाई करावी. असे प्रकार ग्रामीण भागात खपून घेतले जाणार नाही. असे निवेदन एका शिवसैनिकाना पोलीस ठाण्यात दिले आहे. त्यामुळे, संगमनेर शहरातील गोमांस अवैधधंद्याची लस आता ग्रामीण भागातही जाऊन पोहोचले की काय? असा प्रश्न जनतेच्या मनात भेडसावत आहे.
दरम्यान या परिसरात कत्तल होत असल्याची माहिती या शिवसैनिकाने स्थानिक गावातील लोकांना कॉल करून कळवली. त्यानंतर काही समाजसेवकांनी लॉकडाऊनच्या काळातही शहानिशा करण्यासाठी थेट हिवरगाव पठार गाठले. स्थानिक लोक व शिवसैनिक यांनी स्पॉटवर पाहणी केली असता त्यांना सुकलेले रक्त, जनावराच्या पोटातील चारट सभोवतालच्या परिसरात दिसून आले. हे सर्व त्यांना खटकले व त्यांनी घरगाव पोलिस्टशनला धाव घेत निवेदन दिले. लॉकडाऊनच्या काळातही गोहत्या सारखे विघ्नसंतोशी काम चालु असल्याने हिवरगाव पठार भागातील परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. संगमनेर तालुक्यातील गोमासचे नेटवर्क दिवसागणिक वाढतच चाले आहे. संगमनेर तालुक्यातील गोमासचे अवैध धंद्यामध्ये अव्वल स्थान मिळवतो की काय असे चित्र दिसू लागले आहे. लॉकडाऊनच्या काळात गोरख धंद्यामध्ये सर्वाधिक कारवाई गोमांस वरच झाली आहे. एकीकडे हिंदुत्ववादी संघटना या गोष्टीचा निषेध करत आहेत. तर, शहरातील बेकायदेशीर कत्तलखाने बंद करून कारवाई करा अशी मागणी विश्वहिंदू परिषद व बजरंग दल यांनी केली आहे. त्यातच हिवरगाव पठार भागात गोहत्याची घटना घडली. याच गोष्टीचा निषेध करून या घटनेची योग्य ती चौकशी व्हावी अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे.
- सुशांत पावसे