त्या वाटसरुकडे पाहुन अप्पर पोलीस अधिक्षकांचा उर भरुन आला! डॉ. दिपाली काळे मॅडम यांचा एक ह्यदय हेलावून टाकणारा प्रसंग, खाकीतल्या मातृत्वाचे दर्शन

डॉ. दिपाली काळे,


रोखठोक सार्वभौम (अकोले) : 
                                पोलीस म्हटलं की अनेकांचे तोंड सळसळून जाते. काय बोलावे आणि काय नको. असेच काहीसे हावभाव अनेकांच्या चेहर्‍यावर दिसून येतात. परंतु, अर्थात हाताची पाचही बोटे जशी सारखी नसतात. अगदी तसेच खाकीतला प्रत्येक व्यक्ती टिकेचा धनी नसतो हे विसरुन चालणार नाही. जरी त्या कपड्यावर कायदा व सुव्यवस्था राखताना कधी कठोरता दिसून येते असली तरी त्याच्या आत मात्र, फार हळवं काळीज दडलेले असतं. फक्त त्याच्याकडे पाहणार्‍या नजरा भावनिक हव्या. अन्यथा तसाही पोलीस कोणाला कळलाच नाही.! अशाच एका महिला अधिकार्‍याची अनदेखी कहाणी मी आपल्यासमोर मांडणार आहे. त्या म्हणजे अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. दिपाली काळे, नेमणूक उत्तर नगर कार्यालय श्रीरामपूर.!
                     
   फार दिवस नाही झाले. अगदी आज पाचवा दिवस असेल. कोरोनाने सामान्य मानसांचा जीव घेतला आणि सामान्य मानसांनी पोलिसांचा जीव घेतला. आहो.! कितीदा सांगितले की बाबाहो, बाहेर पडू नका. पण एकतील ती मानवजात कसली.? म्हणून तर पोलिसांना रस्त्यावर उतरावे लागले. त्याच दिवशी दिपाली मॅडम घरातून बाहेर पडल्या होत्या. मनात काय दु:ख असेल नसेल देव जाणे, पण कदाचित गोरगरिबांच्या भुकेची दाहकता पाहुन रोज काळजात कालवाकालव होत असावी. म्हणून आज त्यांनी स्वत:च्या घरातील एक गाठोडं सोबत घेतले होते. त्यात काय होतं हे देवाला माहित. पण, त्या दिवशी नेमकी आम्ही घारगाव बोटा परिसरात वृत्तांकन करता-करता काही मदतीच्या भावनेने फिरत होतो. तेव्हढ्यात मॅडमची गाडी अगदी जवळून गेली. म्हटलं चारदोन काठ्या आणि शब्दशस्त्रांचा वार होण्यापेक्षा चालतं व्हावं. कारण, समोरुन पुणे ते थेट मध्यप्रदेश जाणारे कोरोना भयभित वाटसरू येत होते. तसेही व्हाट्सअ‍ॅपवर पोलिसांच्या फार छान-छान क्लिपा व्हायरल होत होत्या. जनावरं कुटावी अशी मानसं कुटली जात होती. त्यामुळे, त्याची शिकार होण्यापेक्षा दुर्घटनासे देर भली हे वाचून आम्ही सावध झालो.
                        दुपारची वेळ होती. उन मी म्हणत होते. स्वत:ची सावली डोक्यावरील तप्त उन्हामुळे पायाखाली आलेली होती. लांबवर मृगजळाचा भास होत होत. त्यालाच जणू मध्यप्रदेश समजून ते भयाचे पीडित मजल दरमजल करीत गावाकडे निघाले होते. ते समोरचे चेहरे पाहिले आणि शासकीय वाहनाचा वेग मंदावला. कदाचित गाडीच्या काचा खालीच होत्या. मॅडमने त्या टोळक्यावर लक्ष टाकले. त्या थकलेल्या स्त्रीया, अंगावर अकुंचन पावलेले कपडे, पुरूषांच्या चेहर्‍यावरील यक्ष प्रश्न आणि अंगा खांद्यावर जबाबदारीचे ओझे. या सगळ्यांमध्ये त्या चिमुरड्या मुलांचे रखरखत्या उन्हात चालणारे अनवाणी पाय आणि तरी देखील आई-वडीलांच्या मागे तुरूतरू चालण्याची जिद्द.! त्या दिवशी मॅडम मधील अधिकारी कदाचित पुर्णपणे संपलेला असावा. त्यांनी तत्काळ दरवाजा उघडत सर्वांना हात केला. मोठ्या मायेनं विचारपूस केली. त्या मुलांच्या घाबरलेल्या नजरा, भयभित झालेला देह आणि भुकेलेल्या भावना पाहुन त्यांचे डोळे स्वत:ला आवरू शकले नाही. त्या खाकीच्या अंत:करणातून पोलिसातला माणूस जागा झाला.
     
                           भरल्या डोळ्यांनी त्यांनी गाडीतील गाठोडं सोडलं आणि ते त्या माय माऊलीच्या हातावर टेकविलं. त्यांना जेवू घातले, मुलांना बिस्कूट पाणी दिले. त्यांची शेल्टरला सोय केली. हा लॉकडाऊन तुम्हाला छळायला नाही. तुमचे रक्षण करायला होता. इतके मोठे पाऊल उचलुन तुम्ही हजारो मैल निघालात. ते ही अनवानी आणि या चिमुकल्या लेकरांना घेऊन.! त्यांच्या डोळ्यातील आश्रुंचा बांध फुटला होता. आपण एक अधिकारी आहोत याचा लवलेश देखील त्या काही क्षण विसरून गेल्या होत्या. यांना समजून सांगावं तरी किती? अशा असंख्य प्रश्नांनी त्यांनी त्या वाटसरुंकडे हतबलतेने पाहिले. आपला रुमाला डोळ्याला लावत त्यांनी मनातील आखं दु:ख त्यात ओतलं. स्वत:चे आयुष्य स्टेबल असतांना त्यांनी दुसर्‍याच्या आयुष्याची गोळाबेरीज केली. हीच तर खाकीतल्या मानसाची किंमत आहे. ‘जेथे विषय गंभीर तेथे खाकी खंबीर’ अन्यथा खाकीच्या नावाखाली काही गैरफायदा घेतात, म्हणून एकामुळे चांगल्या खाकीला दाग लागतो. अन्यथा आज डॉक्टर आणि पोलीस यांची किंमत काय! हे नव्याने सांगायला नको. म्हणून दिवशी मॅडमला त्यांच्या भावना कदाचित व्यक्त करता आल्या नाही. मात्र, त्या आमच्या लेखणीतून टिपल्या गेल्या आहेत.

- सागर शिंदे
============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 300  दिवसात 335 लेखांचे 26 लाख वाचक)