मुंबईचे डिआयजी लखमी गौतम यांना महासंचालक पदक; राज्य पोलीस दलाच्या सन्मानचिन्ह 2019 च्या यादीत पहीलेच नाव, गुणवत्तापुर्ण सेवाबद्दल पदक
रोखठोक सार्वभौम
- सागर शिंदे
अहमनदगर : पोलीस दलात सर्वोत्तम कामगिरी केल्यानंतर पोलीस महासंचालकांकडून अशा खाक्या वर्दीचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार होत असतो. या 2019 च्या यादीत पहीलेच नाव मुंबई पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त लखमी गौतम (आयपीएस) यांचे नाव आहे. विशेष म्हणजे त्यांनी आजवर पोलीस दलात ‘सर्वोत्तम गुणवत्तापुर्ण’ कामगिरी केली आहे. म्हणून त्यांना प्रथम सन्मानित करण्यात येत आहे. आज (दि. 30) राज्याचे पोलीस महासंचालक सु. कु. जायसवाल यांनी यादी जाहिर केली आहे. त्यात राज्यातील 800 पोलिसांना सन्मानित करण्यात येणार आहे.
लखमी गौतम हे 2004 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी ते 3 ऑगस्ट 2014 साली अ.नगर जिह्याचा पदभार घेतला होता. त्यांनी आल्याआल्या जिल्ह्यातील वाळुतस्कर आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यास सुरूवात केली होती. विशेष म्हणजे वाळुवर कारवाई करण्याचे अधिकार महसुल खात्याला आहे. हे लक्षात घेता 51 पोलीस दलाची तुकडी त्यांना देऊन जिल्हाभर छापे टाकण्याचे काम सुरू केले होते. ते असे पहिले पोलीस अधिक्षक होते. ज्यांनी अल्पकाळात वाळू तस्करांवर कारवाई करुन त्यांच्याकडून सर्वाधिक दंड वसूल केला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी वर्षानुवर्षे पोलीस खात्यात नोकरी करुन जे पोलीस निरीक्षक फारसे कार्यक्षम नव्हते त्यांना योग्य ते काम देऊन बहुतांशी ठिकाणी तरुण सहायक पोलीस निरीक्षकांची टीम उभी केली होती. अगदी काही एक अनुभव नसतांना अॅड. विनोद चव्हाण, सचिन सानप, प्रकाश पाटील अशा अनेकांना पोलीस ठाण्यात नियुक्त करुन केवळ पारदर्शी काम व रस्तालुट आणि दरोडे यांच्यावर नियंत्रण बसविण्याची अपेक्षा केली. तर हा यंग ब्रिगेड उपक्रम त्यांचा यशस्वी देखील झाला होता.
यात सर्वात महत्वाची बाब म्हणजे, त्यांचे आणि कोणत्याही राजकीय नेत्याचे हस्तांदोलन कधी झाले नाही. तुम्ही तुमचे राजकारण पहा आणि मी माझा कायदा व सुव्यवस्था पाहतो. एकमेकांच्या कामात ढवळाढवळ नको! अशी त्यांची सडेतोड भुमिका होती. याच तत्वांमुळे त्यांना राजकीय रोषाला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे लखमी गौतम यांचे खात्यावर विशेष प्रेम आहे. पोलिसांना हातात काठी दिली आहे ती कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी. त्यामुळे, तीचा वापर वारंवार झालाच पाहिजे. तर पोलीस अधिकार्यांच्या कंबरेला असलेला पिस्तुल हा स्व-संरक्षणासाठी असतो तसेच वेळ पडली तर कुख्यात गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी देखील वापरला जातो. हे ठामपणे सांगणारे ते पोलीस अधिक्षक होते. पोलीस दलावर कोणी आरोप-प्रत्यारोप केले तर त्याची सखोल चौकशी केल्याशिवाय ते कारवाई करत नाहीत. मात्र, त्यांच्या कचाट्यात कोणी दोषी सापडला तर त्याने कितीही दबाव आणला तरी त्याची सुट्टी नसे. हाच त्यांचा कडक स्वभावगुण. पोलीस दलात काम करताना त्यांना कोणाची शिफारस चालत नाही. जो असा प्रकार करेल त्याचा वशीला त्यांनी कधीच खपवून घेतला नाही. तर ज्याची अडचण असेल त्यांने प्रामाणिकपणे साहेबांना सामोरे जाणे व वास्तव कथन करणे. त्याच्यावर कधीही अन्याय होणार नाही. हे त्रिवार सत्य त्यांच्या लेखी होते.
लखमी साहेबांची काही ठरलेली तत्वे होती. त्या पलिकडे त्यांनी कधी पाहिले नाही. ते हजर झाल्यानंतर दुर्दैवाने जवखेडा तिहेरी हत्याकांड घडले. हा तपास फार जीकी२रीचा होता. त्यावेळी सर्व जातीय रंगबाजी सुरू झाली. काही संशयित नावे पुढे आली. मात्र, त्यांनी ठामपणे सांगितले. जनप्रक्षोभ थांबविण्यासाठी उगाच कोणाच्या हातात बेड्या ठोकायच्या नाही. उशिर झाला तरी चालेल. पण, खर्या आरोपींना अटक झाली पाहिजे. तसेच कोणत्याही आरोपीस मारहाण न करता त्याच्या गुन्ह्याचा सखोल तपास करुन सबळ पुरावे व प्रबळ दोषारोपपत्र तयार करणे. यावर ते ठाम होते. अखेर त्यांनी जवखेड्याचा गुन्हा तडीस नेला. तसेच शेवगाव तालुक्यात पोलीस कॉन्स्टेबल दिपक कोलते याची बापु विघ्ने यांनी हत्या केली होती. त्याच्या पत्नीचे शासनात पुनर्वसन करण्यात साहेबांनी पहिला पुढाकार घेतला होता व तो यशस्वी देखील झाला.
नगर जिल्ह्यात काम करताना त्यांनी बड्या राजकारण्यांच्या म्हणण्याप्रमाणे कधीही आपले घोडे दामटले नाही. त्यामुळे, त्यांच्या तक्रारी थेट मुख्यमंत्र्यांकडे अनेकदा झाल्या. तर स्थानिक आरोपींना पाठीशी घालण्याच्या दबावाला ते कधीही बळी पडले नाही. गुन्हेगार कोणीही असो. तो राजकीय पटलावरील नातेसंबंधी असला तरी त्याला पाठीशी घालणे नाही म्हणजे नाही. त्यामुळे, त्यांचे राजकीय दुष्मण वाढत गेले. ते इतके की राज्यपालांपर्यंत त्यांच्या बदलीची मागणी झाली. मात्र, मुख्यमंत्री महोदय त्यांच्या कामावर अगदी दिलखुलास खूश होते. तरी देखील 14 मे 2015 रोजी म्हणजे अवघ्या 9 महिन्यात त्यांची राजकीय दबावापोटी बदली करण्यात आली.
अर्थात सत्याला नैतिकतेची किनार असते. त्यामुळे, लखमी गौतम यांना बाजुच्या शाखेत देण्यात आले नाही. तर, तत्कालिन मुख्यमंत्री यांनी उलट त्यांचे कौतुक करत थेट अमरावती ग्रामीणला त्यांची बदली केली. त्यानंतर तेथे देखील साहेबांच्या कर्तुत्वाची धार कमी झाली नाही. त्यांनी विद्यमान मंत्री बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल केला. इतकेच काय त्यात शिक्षा देखील ठोठावण्यात आली. पण, कडू साहेबांनी कोणताही राजकीय आकस धरला नाही. अगदी पारदर्शी राजकारण सुरू ठेवले. इतकेच काय! तेथे आयुक्तालयावर दगडफेक झाली त्यात काही पोलीस जखमी झाले होते. तेव्हा, पोलिसांनी मीडियाला स्टेटमेंन्ट दिली होती. ‘जर इथे असते गौतम लखमी, तर नसतो झालो जखमी’ त्यामुळे त्यांच्या कर्तुत्वाला आणखी काय प्रमाण हवे होते ! अमरावती ग्रामीण येथे यशस्वी कार्यकाळ पुर्ण केल्यानंतर त्यांची थेट मुंबई पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त म्हणून बढतीवर बदली करण्यात आली.
विशेष म्हणजे कायद्यावर बोटे ठेऊन चालणार्या या अधिकार्यास सामोरे जाताना अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. कारण, चुकीला माफी नाही! हे वाक्य त्यांच्याबाबत अगदी तंतोतंत जुळते. उल्लेखनिय बाब म्हणजे आज पोलीस महासंचालकांच्या सन्मान यादीत पहिले नाव लखमी गौतम साहेबांचे असून ते गुणवत्ता आणि सर्वोत्तम कामगिरी केल्याबाबत त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. दुर्दैव असे की, नगर जिल्ह्याला या अधिकार्याची किंमत कळली नाही. इतकेच काय तर 800 पोलिसांच्या यादीत 10 पोलीस कर्मचारी सोडले तर एकाही अधिकार्याचे नाव या यादीत नाही. त्यामुळे, पुढे जास्त काही मांडण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही.
- लखमी गौतम साहेबांच्या काळात नगरला अप्पर पोलीस अधिक्षक म्हणून काम करणार्या शैलेश बलकवडे साहेबांनी गडचिरोलीत पोलीस अधिक्षक म्हणून दरोडेखोर व गुन्हेगारांच्या टोळ्यांवर कारवाई केली. त्यासाठी त्यांना देखील महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. बलकवडे नगरला असतांना त्यांनी एक विशेष पथक तयार केले होते. अरुण गांगुर्डे, योगेश घोडके, सुरज वाबळे, याकुब सय्यद यांच्यासह मोजके कर्मचारी यात होते. पण, त्यांच्यानंतर असे पथक झाले नाही. ना कोणी कारवाई करण्यात कार्यत्परता दाखविली. लखमी साहेबांच्या सोबतच बलकवडे साहेबांची बदली झाली. मात्र, या अधिकार्यांनी बाहेर आपल्या कार्याचा फार मोठा ठसा उमटविला. त्यामुळे, त्यांना पोस्टींगसाठी कधी कोणाच्या मध्यस्थिची गरज पडली नाही. बलकवडे साहेब म्हणजे एक आदर्श, अभ्यासू, कायदेतज्ञ व कार्यक्षम अधिकारी म्हणून राज्यात नावाजले आहेत.
- नगरचे कैलास सोनार, धंनजय देवकाते, अजित पटारे, काशिनाथ खराडे, रविंद्र कुलकर्णी, राजेंद्र सुपेकर, अनिल गाडेकर, अर्जुन बडे, मन्सुर सय्यद, तुकाराम सोनवणे या पोलिसांना देखील सन्मानित करण्यात येणार आहे.