मुंबईचे अखिलेश कुमार सिंह नगरचे नवे पोलीस अधिक्षक


अकोले (प्रतिनिधी) :
                      गेल्या अनेक दिवसांपासून नगर जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक पदाचा प्रश्न प्रलंबित होता. तो आता मार्गी लागला असून मुंबई झोन सात विभागाचे पोलीस आयुक्त अखिलेश कुमार सिंग यांची नगरच्या पोलीस अधिक्षक पदावर वर्णी लागली आहे. तब्बल पाच ते सहा महिन्यानंतर नगरला पोलीस अधिक्षक मिळाल्याने आता कुमार साहेब नेमकी काय नवे पाऊले उचलतील. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या पाच महिन्यापुर्वी पोलीस अधिक्षक ईशु सिंधूू यांनी नगर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक पद सोडले होते. त्यानंतर अप्पर पोलीस अधिक्षक सागर पाटील यांनी जिल्ह्याचा पदभार घेतला होता. एका अप्पर पोलीस अधिक्षकांनी नगर जिल्ह्यासारख्या मोठ्या व स्पोटक जिल्ह्याचा पदभार तब्बल अर्धे वर्ष सांभाळावा हे जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे. इतकेच काय, त्यांच्या काळात जिल्ह्यात कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. त्यामुळे, त्यांच्यावर गृहमंत्री देखील खूश होते. मात्र, आज पाच महिन्यानंतर पोलीस अधिक्षक खर्चीव बसण्याचे भाग्य कुमार साहेबांना लागणार आहे.
दरम्यान या पाच महिन्याच्या कालावधीत अनेक पोलीस अधिक्षकांची नावे चर्चेत आली होती. तर, जिल्ह्यातील पोलीस अधिक्षक कोणाच्या मर्जीतला आणायचा.? याबाबत बड्या नेत्यांमध्ये चढाओढ सुरू होती. त्यामुळे, हा प्रश्न प्रलंबित असल्याचे बोलले जात होते. अर्थात सागर पाटील यांनी पोलीस अधिक्षकांची कमी नेहमी भरुन काढली. मात्र, त्यांना काही निर्णय घेताना अधिकाराच्या मर्यादा पडत होत्या. त्यामुळे, कोणत्याही पोलीस अधिकार्‍यांच्या व कर्मचार्‍यांच्या बदल्या होऊ शकल्या नाही. आज जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठे व कोणत्याही क्षणी कायदा सुव्यवस्था निर्माण होईल असे पोलीस ठाणे आहेत. त्यामुळे, अनेक पोलीस अधिकारी वेगवेगळ्या ठिकाणी इन्चार्जशीप करण्यास इच्छिुक आहेत. त्यामुळे कुमार साहेबांच्या काळात प्रथमत: बदल्यांचे वारे वाहतील. त्यामुळे, आता पोलीस दलात साहेबांची मर्जी राखण्यासाठी मोठमोठ्या कारवाया आणि कडक सॉल्युट पहायला मिळणार आहे.
         हे पोलीस अधिक्षक थेट आयपीएस असून त्यांना कोणाची शिफारस चालत नाही. हे एक डॅशींग अधिकारी असून एसपी लखमी गौतम यांच्यानंतर नगर जिल्ह्याला हे तडफदार एसपी लाभले आहेत. या अधिकाऱ्यास पांढऱ्या कपड्यावाल्यांचा द्वेष असून कामापुरते काम असा स्वभाव आहे. त्यांनी पुर्वी बीड, धुळे व यवतमाळ येथे काम केले असून ते सद्या मुंबई झोन सातला होते. 
त्यांच्या जाग्यावर परमजित दहिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सागर शिंदे

संपादक
दै.रोखठोक सार्वभौम
===========



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे १९ लाख वाचक)