म्हळादेवीत सरपंचाच्या मुलीवर धारधार हत्याराने वार, गुन्हा दाखल, राजू मधेस अटक
सावभौम (अकोले) :
अकोले तालुक्यातील म्हाळादेवी परिसरात अवैध धंद्यांची माहिती देणार्या प्रिया मधे या महिलेस पतीने धारधार हत्याराने भोकसल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, माझ्या नवर्यानेच माझ्यावर वार केले आहेेत. म्हणून मी जखमी झाले आहे. गेल्या पाच दिवसानंतर प्रिया यांची प्रकृती स्थिर असून या घटनेप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी राजू मधे यास अटक केली असून उद्या पोलीस कोठडीसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अशी माहिती पोलीस अधिकार्यांनी दिली.
दरम्यान एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोरोनाच्या काळात काही आदिवासी बांधवांना दोन वेळचे अन्न मिळणे कठीण आहे. मात्र, यांच्याकडे हजारो किलो काळा गुळ येतो कोठून? यांच्याकडे नवसागर येते कोठून, द्राक्षांचे पेटारे यांना पोहच करते कोण?, मोठमोठे ड्रम देते कोण? अशा विविध साधनांचा पुरवठा करण्यासाठी भांडवल देते कोण? कारण यातील काही लोक आजकाल बिडी पिण्यासाठी महाग असतात मग यांच्या पाठीवर हात कोणाचा असतो. याचा सखोल तपास करणे गरजेचे आहे. पोलिसांनी जर या गुन्ह्याचे मुळ शोधले तर गावातील बड्या व्यक्तींची नावे पुढे येतील. खरं पाहिले तर गुन्ह्यात सामान्य माणूस भरडून जातो. मात्र, खरे आरोपी गजाआड जात नाहीत. हेच खरे प्रशासनाचे आणि न्यायाचे दुर्दैव आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, म्हाळादेवी परिसरात राजू मधे याचे आदिवासी कुटूंब आहे. तो गावठी हातभट्टी चालवत असल्याची माहिती गावातील काही जागरुक तरुणांनी पोलिसांना पाच दिवसांपुर्वी दिली होती. मात्र, कोरोना बंदोबस्ताचा भुंगा त्यांच्यामागे असल्यामुळे पाच दिवसानंतर अकोले पोलिसांचे पथक थेट म्हाळादेवीत दाखल झाले. गावकर्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस कारवाईसाठी गेले असता काही महिलांनी मोठे धाडस करुन यावर आवाज ऊठविण्याचा प्रयत्न केला. त्यात प्रिया देखील असल्याचे तिच्या पती समजले. त्यामुळे, त्यांच्यात किरकोळ वाद झाला. दरम्यान दोघांच्या बाचाबाचीचे रुपांतर मोठ्या वादात झाले आणि पतीपत्नीचा वाद विकोप्याला गेला. त्यानंतर राजुने थेट पत्नीला धारधार हत्याराने भोकसून मारण्याचा प्रयत्न केला. आज (मंगळवार दि.28) याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे यांनी दिली.
एक आणखी दुर्दैव म्हणजे अकोल्यात दारु बंदीवर अनेकांनी भाष्य केले आहे. मात्र, या महिलेसाठी कोणी अद्याप पुढे आले नाही. याप्रकरणी मोठी कलमे लागली का? आरोपीस सहाय्य करणारे गावातील ते दलाल कोण आहेत.? संबंधित महिलेच्या पाठीशी कोणी सामाजिक संघटना उभी राहिली का? असे अनेक प्रश्न या पुरोगामी तालुक्यातून पुढे येतात. मात्र, वास्तवात प्रसंग घडल्यानंतर कोणी कोणाचे नसते. हेच वास्तव पुढे येऊ लागले आहे.
दरम्यान पोलिसांनी म्हळदेवी परिसरात दारु अड्ड्यावर छापा टाकून तो अड्डा उध्वस्त केला. याप्रकरणी पोलीस अधिक्षकांनी आदेश दिलेले आहेत. अशा प्रकरणात 328 प्रमाणे कायवाई करावी. ही कारवाई झाली का? म्हाळादेवी आणि अन्य परिसरात आदिवासी लोकांना भांडवल पुरवून काही बडे लोक त्यांच्याकडून टक्केवारीत नफा घेत असल्याचे बोलले जात आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आरोपीवर 307 प्रमाणे कडक कारवाई होवून सहआरोपींचा शोध घेतला पाहिजे. या अशा मागण्यांसाठी कोणीच पुढे यायला तयार नाही. मात्र, दारुबंदी. महिला सबलीकरण आणि मागासवर्गीयांची उन्नती यासाठी अनेकजण बोंबलताना दिसतात. मात्र, प्रस्तापित व्यक्ती या समाजास वाम मार्गाला लावतात आणि बघ्याची भूमिका घेतात. या मुळावर कोणी घाव घालायला तयार नाही. हेच तालुक्याचे मोठे दुर्दैव आहे.सागर शिंदे
============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 300 दिवसात 360 लेखांचे 27 लाख वाचक)