मा. आ. वैभव पिचड यांना राजकारणापलिकडे सर्वपक्षीय शुभेच्छा.! विरोधकांचे उदात्त अंत:करणाचे दर्शन.! पण, राष्ट्रवादी काही दिलदार काही...


सागर शिंदे
रोखठोक सार्वभौम
                       अकोले तालुक्याला एक संस्कृतीक आणि चळवळीचा वारसा लाभला आहे. त्यामुळे, एकेकाळी देशात आणि राज्यात पुरोगामी चळवळी लोप पावत चालल्या होत्या. अशा परिस्थितीत अकोले तालुक्यात या चळवळींचा पाया अगदी भक्कमपणे उभाच होता. हीच तर खासियत सह्याद्रीच्या कुशीत नांदणार्‍या सामान्य बांधवांची आहे. वेळ पडली की जात, पात, धर्म, पंथ सर्व सोडून एकमेकांच्या पाठीशी उभे रहायचे. अशीच काहीशी परंपरा आजही तालुक्यात नांदते आहे. त्याचे उत्तम उदा. म्हणजे वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपत प्रवेश केला. तेव्हा त्यांच्या खाद्याला खांदा लावून बंड पुकारलेल्या नेत्यांनी आज त्यांना मनभरुन शुभेच्छा देण्यात कोणताही आकस मनी बाळगला नाही. कोणी कट्टर विरोधक म्हणून उर तानले देखील. पण, राजकारण आणि आनंदी व दु:खी आयुष्य यात जर फरक करता आला नाही. तर ते राजकारण कसले? असे असते तर ना. थोरात आणि आ. विखे यांच्यातील वाद किती विकोप्याला गेेले असते. मात्र, ते एका कार्यक्रमात आल्यानंतर पहिला हातात हात त्यांचा असतो. हे खरे राजकारण आहे. मात्र, कार्यकर्ते उगच फुगून फुटून जातात. हातात हात घालण्यापेक्षा पायात पाय घालून दुसर्‍यांना पडतात. हे असेल आकस बुद्धीचे राजकारण केले तर कसा विकास आणि कसला सलोखा. त्यामुळे, कालपर्यंत रोज कटू बोलून वाभाडे ओढणार्‍या अशोक भांगरे साहेबांनी देखील दोन शब्द का होईना. वैभव पिचड यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यामुळे, त्यांच्या उदार अंत:करणाचे दर्शन तालुक्याला पुन्हा पहायला मिळाले. एकंदार ज्या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी विधानसभेेत विरोध दर्शवून राष्ट्रवादीचा गड कायम राखला. त्यांनी जो मनाचा मोठेपणा दाखवून रोखठोक सार्वभौमला साद दिली. येणार्‍या काळत त्यांच्या कर्तुत्वाला नक्कच दाद दिली चेयात तिळमात्र शंका नाही.

मा. आ. वैभव पिचड यांचे राजकीय जीवण फार चांगले आहे. त्यांच्याकडे अद्याप फार अवधी आहे.  राजकारणात हार जीत सुरूच असते. त्याने खचून जायचे नसते. मात्र, पक्षबदलाच्या भुमिकेमुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. आता हे शल्य कमी करुन त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जनतेत जाऊन काम करायला हवे. अकोल्याच्या राजकारणाचा एक इतिहास आहे. येथे कोणीही कोणाला वैयक्तीक शत्रु मानत नाही. जर असे कोणाला वाटत असेल तर ते त्यांनी डोक्यातून काढून टाकावे. राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो. त्यामुळे, शुभेच्छा देताना संकुचितपणा वाटण्याचे काही एक कारण नाही. त्यांच्या पुढील वाटचालीस मन:पुर्वक शुभेच्छा. 
-  मिनानाथ पांडे (ज्येष्ठनेते)

माजी. आ. वैभव पिचड हे एक तरुण व्यक्तीमत्व आहे. त्यांनी राजकारणात चांगले आणि आता वाईट दिवस देखील पाहिले आहे. त्यांना येणार्‍या काळात चांगले राजकीय भविष्य असून त्यांच्याकडे वेळ देखील फार आहे. ते लढाऊ असल्यामुळे ते तालुक्याचा विकास करु शकतात. त्यांच्याकडे संकल्पना आहे. त्यामुळे त्यांनी खचून न जाता पुन्हा नव्याने उभारी घेणे गरजेचे आहे. त्यांनी केवळ पक्षांतर केले हा एकच निर्णय जनतेला आवडला नाही. बाकी व्यक्ती म्हणून त्यांची प्रतिमा आजही लोकप्रिय आहे. - विजय वाकचौरे (रिपाई राज्यसचिव)

आदरणीय वैभव पिचड व मोठ्या साहेबांनी राष्ट्रवादीत असताना आम्हा कार्यकत्यांवर खूप प्रेम केले. आमच्यात बळ भरले. तेच प्रेम आजही आमच्या मनात आहे. राजकारणाच्या पलिकडे आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो. पक्ष म्हणून नाही. तर व्यक्ती म्हणून ते आमच्या मनात कायम राहतील. माझ्या कुटुंबाच्या सुख दु:खात त्यांची साथ असते. त्यामुळे वैभव पिचड साहेबांना माझ्या परिवाराकडून कोटी कोटी शुभेच्छा. -  आर. के. उगले (ज्येष्ठ राष्ट्रवादी नेत)

राजकारण आणि त्यांचा व माझा फार जवळचा संबंध आहे. व्यक्ती म्हणून वैभव पिचड हे फार चांगले व्यक्तीमत्व आहे. त्यांची व माझी राजकीय भुमिका फार वेगळी आहे. ते त्यांच्या पद्धतीने व मी माझ्या पद्धतीने राजकारण करतो. मला त्यांचा यत्किंचितही राग नाही. मी त्यांच्यावर कधीही टिका टिप्पणी केली नाही. त्यामुळे, कोणाला शुभेच्छा देणे गैर काय आहे? तो एक संकुचित व अविचारीपणा ठरेल. त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा.      - प्रा. सुरेश खांडगे (ज्येष्ठ राष्ट्रवादी नेते)

गेली अनेक वर्षे मी माजी आमदार वैभव पिचड यांच्यासोबत काम केले आहे. दरम्यानच्या विधानसभेत काही वैचारिक मतभेद झाले आणि आमच्या वाटा वेगळ्या झाल्या. राजकारण म्हणजे वैर कधीच असू शकत नाही. त्यांना जे योग्य वाटले ते त्यांनी केले. उलट त्यांना तेव्हाही शुभेच्छा दिल्या होत्या. आजही त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहे. एक व्यक्ती म्हणून त्यांना कधी विरोध कोणी केला नाही. प्रश्न राजकरण व वैचारिक व्यासपिठाचा आला की मग खरा प्रश्न उभा राहतो.  - संपत नाईकवाडी (ज्येष्ठ राष्ट्रवादी नेत)

पुर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार वैभव पिचड यांना दिर्घायुष्य लाभो. आम्ही पुर्वीपासून राष्ट्रवादीत होतो व आहोत. त्यामुळे, राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असतात. मात्र, व्यक्ती म्हणून जर कोणी आकस धरत असेल तर तो चुक आहे. त्यामुळे, विद्यमान भाजपच्या नेतृत्वास वाढदिवसाच्या मन:पुर्वक शुभेच्छा. त्यांना दिर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना. 
- चंद्रभान नवले ( ज्येष्ठ राष्ट्रवादी नेत)
राजकारणाचा भाग सोडला तर मा. आ. वैभव पिचड यांच्यासोबत माझे संबंध फार चांगले आहेत. त्याहुन अधिक मा. मधुकार पिचड साहेबांसोबत आहे. ही दोघे माझ्यासाठी फार को-ऑपरेटीव्ह आहेत. आम्ही मैत्रीचे संबंध जपतो. त्यांना काँग्रेस पक्षाकडून मी राजकारणापलिकडे वाढदिवसाच्या मन:पुर्वक शुभेच्छा देतो. त्यांना दिर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना. 
- विलासराव आरोटे ( ज्येष्ठ नेते काँग्रेस)

माजी आमदार वैभव पिचड यांना दिर्घायुष्य लाभो. त्यांचे राजकीय जीवन खर्‍या अथाने वैभवसंपन्न होवो. त्यांना आर्थिक, सामाजिक तसेच राजकीय स्थैर्य लाभो. अकोले तालुक्याचा शिवसेनेचा तालुकाध्यक्ष या नात्यांने त्यांना आमच्याकडून भरभरुन शुभेच्छा. त्यांना आई तुळजा भवानी उदंड आयुष्य देवो हीच सदिच्छा.
-  मच्छिंद्र धुमाळ ( शिवसेना तालुकाध्यक्ष)
 भाजपचे माजी आमदरा मा. वैभव पिचड यांना मी यापुर्वीच शुभेच्छा दिल्या आहेत. मनात कोणताही संकुचित वृत्ती न बाळगता त्यांना सदिच्छा दिल्या आहेत. मी व माझे कुटूंब तसेच वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने साहेबांना वाढदिवसाच्या मन:पुर्वक शुभेच्छा. त्यांना दिर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना. 
- गणीभाई इनामदार ( वंचित बहुजन आघाडी अकोले )

अकोले तालुक्याचे युवा नेते वैभवराव पिचड हे भारतीय जनता पार्टीत शोभणारे व्यक्तीमत्व आहे. त्यांना असलेला आईचा धार्मिक वारसा व वडिलांचा सामाजिक व राजकीय वारसा हा गोर गरीब जनते विषयी असणारा कनवाळू पणा हाच पंडित दीनदयाळ उपाध्यक्ष यांना अपेक्षित असलेला मानवता वाद आहे. त्यांचे भाजप मध्ये भवितव्य उज्जवल आहे. त्यांचे खळखळून हसणे हेच त्यांच्या मोकळे स्वभावाची पावती असून जनतेच्या मनावर अधिराज्य करणारे युवानेते आहेत. भाजप हा दोन खासदार असणारा पक्ष ३०३ वर पोहचला तसेच नव्याने पुन्हा भरारी घेऊन तालुक्याचे नेतृत्व करतील ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
    -  भाऊसाहेब वाकचौरे (भाजप)
अकोले तालुक्यात कोणीही असतो. त्यांनी अकोल्यातील जनतेच्या समस्या सोडविणे गरजेचे आहे. यापुर्वी माजी मंत्री मधुकर पिचड साहेब यांनी पाटपाण्याचे, रस्त्याचे व अन्य प्रश्न सोडविले. त्यानंतर माजी आमदार वैभव पिचड यांनी पाच वर्षात जो विकासाचा आराखडा मांडला होता. तो उल्लेखनिय होता. मात्र, पुढे त्यांना संधी मिळाली नाही. पण ते येणार्‍या काळात पुन्हा जनतेच्या मनात जातील आणि त्यांच्या समस्या सोडवतील अशी आशा करुया. तालुक्याचे प्रतिनिधीत्व कोणीही करा. फक्त आदिवासी व आम जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे हीच मापक अपेक्षा. साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.! - योगेश लाड (समाजसेवक)
अकोले तालुक्याचे माजी आ.वैभवराव पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मला अपेक्षा आहे की, त्यांनी लवकरात लवकर पुरोगामी वातावरणात परतावे. तसेच येणार्‍या काळात अधिकाधिक जनतेची सेवा करावी. प्रशासनाशी हितगुज करुन शासकीय कामांची योग्य अंमलबजावणी आणि आदिवासी समाजाच्या तळागाळापर्यंत किमान मुलभूत गरजा पोहच होती. यासाठी प्रयत्न करावे. त्यांना वाढदिवसाच्या  मन:पुर्वक शुभेच्छा..! - स्वप्नील धांडे (समाजसेवक)





संपादकीय सडेतोेड

तालुक्यात राजकारण करताना फार कमी लोकांनी अगदी निर्भिडपणे ते केले आहे. अन्यथा ‘गोड बोलून खोड मोडण्याची सवय’ तालुक्याला नवी नाही. अर्थात आपण देशाचे आणि राज्याचे राजकारण पाहिले तर वरिष्ठ पातळीवर कितीही ‘निच पातळी’चे राजकारण झाले तरी ते निवडणुका संपल्यानंतर सगळे ‘कट्टर विरोधक’ अगदी ‘एका ताटात जेवण’ करताना आपण पाहतो. विशेष म्हणजे कालपर्यंत उद्धव ठाकरे साहेबांवर नाराज असणारे मोदीजी व अमित शहा देखील त्यांच्याशी फोनवर बोलुन भेटीगाठी घेतात. मग हा रोष ग्रामीण भागातील लोक का विसरत नाहीत? एकवेळी वैभव पिचड यांचा बॅनर एक व्यक्तीने फाडला तर लगेच आठवड्याभरात डॉ. किरण लहामटे यांचा बॅनर फाडला गेला. ही मानसिकता कोठेतरी बदलली पाहिजे. आज तालुक्यात पक्षाचे नाही तर मानसांच्या मनात गटतट पडले आहेत. आपण ‘परिवर्तन’ केले कि ‘गैरवर्तन’ हेच समजायला तयार नाही. म्हणून कधी नव्हे पण तालुक्यात ‘अंतर्गत अराजकता’ पसरत आहे. त्यावर ऐकोपा म्हणून ‘रोखठोक सार्वभौम’ने आज एक उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला होता. की, आज वैभव पिचड यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थक, विरोधक, पक्षनिष्ठ, विपक्ष अशा व्यक्तींच्या शुभेच्छा घेऊन प्रत्येकाची मानसिकता तपासावी. यात अशोक भांगरे यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे. कारण, त्यांनी सांगितले. ते राजकीय विरोधक अखेरच्या ‘श्वासापर्यंत’ राहतील. विचार, विकास व पक्ष याबाबत आमच्या सिमारेषा अगदी विरूद्ध टोकच्या असतील. त्यांना शुभेच्छा देण्याची मानसिकता असो वा नसो. पण एक ‘माणूस’ म्हणून आणि ‘पत्रकाराचा मान’ म्हणून मी त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा देतो. अर्थात विरोधक असावा तर असा. त्यांनी जे काही होते ते बोलून दाखविले. मात्र, आकस मनी बाळगला नाही. त्यामुळे, खरच त्यांचे कौतूक केले पाहिजे.
तर दुसरीकडे फार भयानक अनुभव आले. काहींना नुकतेच राष्ट्रवादीची पदे मिळाली आहेत. त्यांनी पहिल्यांदा मोठ्या दिमाखात प्रतिक्रीया दिल्या. फोटो दिले. मात्र, विरोधकांना शुभेच्छा दिल्यानंतर पदावर ‘गंडांतर’ तर येणार नाही नाही.? असा प्रश्न उभा राहिला आणि फोनवर फोन सुरू झाले. हे नका ते नका म्हणत शेवटी काहींनी प्रतिक्रीया काढून घेतल्या. त्यानंतर एक गोष्ट लक्षात आली. जर हे इतके भित्रे ससे आहेत. तर मग हे जनतेचे काय ‘खाक’ काम करणार का? निव्वळ पत्रकं काढायची आणि छापून आणायची. हे पदाला चिकटून बसणारे पदाधिकारी काय कामाचे? यात काही व्यक्तींनी अगदी प्रांजळपणे सांगितले. त्यांचे विचार पक्ष आणि तत्व हे आपल्याशी जुळत नाही. त्यामुळे, व्यक्ती म्हणून शुभेच्छा. अशा काही बड्या नेत्यांचे परखड बोल आपल्याला पटले. मात्र, राजकारणातील हे छुपारुस्तम ना डॉक्टरांसाठी चांगले आहेत ना माजी आमदारांसाठी!
एक विनम्र आवाहन आहे की, हा उपक्रम राबविताना कोणताही हेतू मनात नव्हता व नाही. मात्र, केवळ याचे राजकारण होऊ शकते. अशा अफवा एका राष्ट्रवादीच्या उताविळ पदाधिकार्‍याने पसविली आणि हा बहाद्दर गावभर फोन करीत सुटला. त्यामुळे, या प्रतिक्रीया ह्या राजकारणाच्या विरहीत घेण्यात आल्या आहेत. विरोधकांनी माझ्या प्रेमापोटी तर समर्थकांनी सहखुशीने मत मांडले आहे.  याचे राजकारण करणार्‍यांना तालुक्यातील अराजकता पसरविण्याचे काम करु नये म्हणजे झाले.