पुन्हा १४ दिवस म्हणजे ७ मे पर्यंत संगमनेर पुन्हा हॉट्स्पॉट, २२ हजार संशयीत होमक्वारंटाईन.!

 संगमनेर :-
             २२ फेब्रुवारी रोजी नेपाळहुन रहेमतनगर येथे १४ जण संगमनेरला आले होते. त्यापैकी ४ जण कोरोना पॉ  रहेमत नगर, अलका नगर, कोल्हेवाडी रोड, शिंदे नगर या पुर्वीचे १३ हजार २०० होते. तर आता ८ हजार ६९० लोक व १ हजार ७२६ कुटुंब होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. 
          तर आता आणखी १४ दिवस हॉटस्पॉट पॉकेट म्हणून असणार आहे. तर १०० टक्के लोकांचे आरोग्य तपासणी करणार आहोत.  यात एक पथक तयार करणार असून त्यात स्थानिक डॉक्टर असणार आहे. हे पथक घरोघरी जाईल. त्यामुळे, नवीन रुग्ण या पथकाच्या नजरेतून सुटणार नाही. पुढे रमजान महिना आहे. त्यात प्रत्येक कुटुंबाला होम डिलेवरी मिळणार आहे. तस नियोजन झाले आहे. त्यासाठी निरिक्षक म्हणून सरकारी अधिकारी असणार आहे. या संदर्भात मुस्लिम बांधवांची बैठक घेतली असून प्रत्येकाने आपला नमाज घरीच करायचा आहे. फक्त एक व्यक्ती मश्चिदीत जावून नमाज पठण केले जाईल.
        गेला काही दिवसांपुर्वी शासनाने लॉकडाऊन संदर्भात  काही नियम शिथिल केले होते. मात्र, त्याचा गैरफायदा काही नागरिक घेत आहे. हे थांबले पाहिजे. थोडं गांभिर्य घ्यावे. कारण १४ दिवस घरात बसून देखील कोरोना होऊ शकतो. हे उदा. आपण पाहिले आहे. त्यामुळे संचारबंदीचे गांभिर्य घ्यावे. त्यामुळे, उद्यापासून कडक कारवाईला सुरुवात होईल. अशी माहिती प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी दिली. यावेळी डिवायएसपी रोशन पंडीत, तहसिलदार अमोल निकम, पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्यासह अन्य अधिकारी  उपस्थित होते.

काय असतील नियम व अटी
विनाकारण कोणी बाहेर दिसला तर 188 नुसार कारवाई.
चार पेक्षा जास्त लोकांची गर्दी दिसले तर 144 चा गुन्हा.
घरातून बाहेर पडताना तोंडाला मास्क असणे आवश्यक.
कोणत्याही कारणास्तव गर्दी करता येणार नाही.
अत्यावश्यक सेवा व ठरवून दिलेलेच उद्योग चालु राहतील.
तालुका व जिल्हाबाह्यसंचार कोणालाही करता येणार नाही.
सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे धोक्याचे असेल.
डिझेल विक्री वेळ सकाळी 5 ते सायंकाळी 5 पर्यंत चालु राहील
पेट्रोल विक्रि सकाळी 5 ते सकाळी 9 पर्यंत चालु राहील.


- सागर शिंदे

- सुशांत पावसे