14 दिवसानंतरही संगमनेर तालुक्याचे हॉट्स्पॉट पॉकेट कायम! पण, संगमनेरात आणखी चार रुग्ण


सार्वभौम (संगमनेर) : 
                         संगमनेर तालुक्यात कोरोनाचे चार रुग्ण मिळून आल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी शुक्रवार दि. 10 एप्रिल रात्री अगदी कडक भुमिका घेत काही निर्णय घेतले होते. त्यात जिल्ह्यातील चार ठिकाणे हॉट्स्पॉट पॉकेट म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यात मुकुंदनगर, आलमगिर (अ. नगर), नाईकवाडापुरा (संगमनेर) व जामखेड शहर अशा चार ठिकाणांचा सामावेश आहे. आज मुकूंदनगर येथील हॉट्स्पॉट पॉकेट उठविण्यात आले आहे. तर संगमनेर तालुक्यातील हॉट्स्पॉट पॉकेट वाढविण्यात आले आहे.कारण संगमनेरात आता आणखी चार नवे रुग्ण असल्याचा अहवाल आज प्राप्त झाले आहे. त्यामुळे आणखी काही दिवस प्रशासनाने काही अटी व नियम कायम ठेवले आहे. त्याचे पालन झाले नाही. तर प्रशासन पुन्हा कठोर भूमिका घेऊ शकते. 
           प्रशासनाने संगमनेरमधील काही भाग हॉट्स्पॉट पॉकेट म्हणून घोषित केला होता. तर हॉट्स्पॉट पॉकेटच्या मध्यबिंदुपासून दोन किलोमिटरच्या परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरात 14 एप्रिल रोजी हॉट्स्पॉट पॉकेट संपल्यानंतर ते पुन्हा नऊ दिवस त्याची मर्यादा वाढविण्यात आली होती. या 14 दिवसांच्या दरम्यान येथे सर्व सुविधा शासनाने पुरविल्या. या परिसरात तब्बल संगमनेरात 1 हजार 854 कुटूंबातील 9 हजार 555 नागरिक पुन्हा होमक्वारंटाईन करण्याता आले होते.
दरम्यान 14 दिवसांच्या हॉट्स्पॉट पॉकेटचा कालावधी आज गुरूवार दि.23 रोजी संध्याकाळी संपत आहे. या दिवसांमध्ये संगमनेर तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण मिळून आला नाही. मात्र आज अचानक ती संख्या चारवर जाऊन पोहचली आहे. यापुर्वी संगमनेरचे चारही कोरोना बाधित रुग्ण अगदी ठणठणीत होऊन त्यांना घरी पाठविण्यात आले. त्यामुळे, येथे हॉट्स्पॉट पॉकेट ठेवण्याची शक्यता फार कमी होती. मात्र, काही प्रशासकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार आज हॉट्स्पॉट पॉकेट शिथिल होण्याची शक्यता होती. मात्र,  ती आशा मावळली आहे. असे असले तरी प्रशासनाकडून काही नियम व अटी कायम राहणार आहे.


काय असतील नियम व अटी
विनाकारण कोणी बाहेर दिसला तर 188 नुसार कारवाई.
चार पेक्षा जास्त लोकांची गर्दी दिसले तर 144 चा गुन्हा.
घरातून बाहेर पडताना तोंडाला मास्क असणे आवश्यक.
कोणत्याही कारणास्तव गर्दी करता येणार नाही.
अत्यावश्यक सेवा व ठरवून दिलेलेच उद्योग चालु राहतील.
तालुका व जिल्हाबाह्यसंचार कोणालाही करता येणार नाही.
सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे धोक्याचे असेल.
डिझेल विक्री वेळ सकाळी 5 ते सायंकाळी 5 पर्यंत चालु राहील
पेट्रोल विक्रि सकाळी 5 ते सकाळी 9 पर्यंत चालु राहील.

sagar shinde