दुधाच्या गाडीत मुंबईहुन प्रवाशांची वाहतूक, राजुरमध्ये गुन्हा दाखल, संगमनेरचे दुध, चालक अकोल्याचा प्रवासी मुंबईचे.!


सार्वभौम (अकोले) :  दुधाच्या टँकरमध्ये मुंबई ते राजूर अशी प्रवाशांची वाहतूक करणार्‍या अकोल्याच्या वाहन चालकास राजूर पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. हा तरुण संगमनेरच्या एका दुधसंघातून दुधाचा टँकर भरुन मुंबईला जातो. तर येताना प्रवाशांकडून बक्कळ रक्कम उकळवून त्यांची लुट करतो. तर शासनाने दिलेल्या अत्यावश्यक सेवाच्या परवान्याचा गैरफायदा करतो. ही बाब पोलिसांनी उघड करुन त्याच्यावर 188, 269 व 270 नुसार गुन्हा दाखल करुन वाहन जप्त केले आहे. रविंद्र काळु बर्वे (रा.23, वाळुंजशेत) असे चालकाचे नाव आहे. तर अविनाश किसन आवारी (धामनगाव आवारी) असे प्रवाशाचे नाव आहे.

याबाब सविस्तर माहिती अशी की, रविंद्र बर्वे याची एक पिकअप वाहन आहे. ती संगमनेर शहरातील एक दुधसंघावर लावलेली आहे. रोज सकाळी गाडी भरुन ठाण्याला जाते आणि तत्काळ माघारी फिरते. मात्र, हे महाशय अकोले तालुक्यात माघारी येताना कोरोनाचा संसर्ग आणण्याचा प्रयत्न करतात की काय? असा प्रश्न पडला आहे. बर्वे हे मुंबईहुन रोज येताना काही प्रवाशांना आपल्या गाडीत टाकतात. दुधाचे ट्रे एकावर एक रचून त्याच्या आड काही प्रवाशांना गाडीत बसवितात. थेट अकोले गाठवून त्यांच्याकडून 10 पटीने जास्त पैसे घेतात. हा प्रकार राजूर पोलिसांनी समजला असता सहा. पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी दक्षता बाळगत संबंधित वाहनाची चौकशी करण्यासाठी प्रविण थोरात खैरनार, निमसे, तळपे, मोरे व पटेकर अशा टिमची नियुक्ती केली.
दरम्यान रविवार दि.12 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हे वाहन राजूर हाद्दीत आले असता पोलिसांनी त्यास अडविले. रविंद्र बर्वे याच्याकडे विचारणा केली असता त्याने उडवाऊडविची उत्तरे दिली. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात ट्रेच्या बाजुला एक इसम दडलेला दिसून आला. त्यानंतर बर्वेच्या खर्‍या चेहर्‍यावर पाणी फिरले. त्यानंतर पोलिसांनी या दोघांसह वाहन ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
वाईट वाटत असले तरी चूक आहे.!
बर्वे याने एक मानुसकी म्हणून जरी प्रवाशास आणले असले. तरी देशात व राज्यात आरोग्याची आणिबाणी निर्माण झाली आहे. रोज कोरोना संदर्भात आकडा वाढता आहे. विशेष म्हणजे अद्याप अकोल्यात कोविड 19 चा एकही रुग्ण नाही. त्यामुळे, किमाण यावेळी तरी संचारबंदी आणि शासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. अन्यथा, एकाच्या चुकीमुळे सागळ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे, पोलिसांनी जी सतर्कता दाखविली. त्याबाबत त्यांचे कौतुक होत आहे. 

 आकाश देशमुख

============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे २३ लाख वाचक)