कोरोनाच्या भितीने त्याने केला मुंबई ते अकोले लपत छपत १५० किमीचा पायी प्रवास.! त्याच्या संपर्कातील ते कोरोनाग्रस्त.! हा तरुण ताब्यात.!

          
राजूर (प्रतिनिधी)
      मुंबईतील केईएम रुगालयातील वार्डबाॅय याने दांडी मारुन कोरोना व्हायरसमुळे तालुक्यातील घोटी येथे दिडशे कि. मिटर पायपीट करत थेट अकोले गाठले. त्यामुळे, तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी कि, कोराना विषाणूने सध्या संपूर्ण जगात थैमान घातले असून महाराष्ट्रात देखील या आजाराची मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे. मुंबईमध्ये दिवसेंदिवस कोरोना ग्रस्तांची वाढ होत असून मुंबई, पुणे, नाशिक परिसरातुन अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात नागरिक आले आहेत. तर मुंबईच्या केईएम रुग्णालयात काही वर्षापासून हा वार्डबाॅय म्हणून कार्यरत आहेेत.
           कोरोनाच्या व्हायरसमुळे केेईएम रुग्णालयातील स्टाफ नर्स (परिचारिका) कोरोना पाॅझिटिवच्या सानिध्यात हा वार्ड बाॅय काही काळ आल्याने कोरोना व्हाॅयरसला हा वार्ड बाॅय घाबरला. आणि केईएम रुग्णालयातुुन त्यानेे धारावी जवळील घर गाठुन कपडे घेऊन बेस्टने सकाळीचं टिटवळा गाठला. पोलिसाच्या रस्ता नाका बंदीला घाबरून दि.१० एप्रिलला सकाळीचं ११ वाजता निघाला होता. तर रस्त्यावर गाड्या बंद असल्याने मालवाहतूक करणाऱ्या वाहनाने गाडीत घेेण्यास नकार दिल्याने त्यानेे टिटवळ्यातुुुन शहापूर, चौढे, कुमशेतच्या डोंगराच्या कडेेेने पायी प्रवास करत रात्री ११ वाजता घोटीला पोहचलो. तर दुुुस-या दिवशी जवळपास असलेली सासुरवाडी शेलदला जाऊन आल्याचे सागितले. तर ही माहिती घोटी आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य सेवक भाऊसाहेब डगळे, श्रीमती सुरेखा कोके यांंना कळताचं त्यांनी आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधुन माहिती दिली. तत्काळ तालुका आरोग्य अधिकारी इंद्रजित गंभीरे याच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी गोविंद लोहकरे, डॉ.अर्चना बांबळे, आरोग्य पर्यवेक्षक मोहन पथवे, आरोग्य सेवक सजय नवले आदिनी घोटीमध्ये वार्ड बाॅयच्या घरी जाऊन समुउपदेशन करून कोतुळ मधील १०८ रुग्णवाहिकेला बोलावून घेतले. नंतर तिच्यामार्फत त्यास नगर शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेचं घोटी व शेलद गावात फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. परंतु मुंबईच्या केईएम रुग्णालयातील वार्डबाॅय  मुंबईमधुन पायपीट करत गावी आल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.  मुंबई केईएम रुग्णालयातील आलेला वार्डबाॅय गावातुन नगर शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी १०८ रुगवाहिकेतुन पाठविले. त्यानंतर घोटी, आंभोळ उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी व आरोग्य पर्यवेक्षक मोहन पथवे,आरोग्य सेवक सजय नवले, आरोग्य कर्मचारी यांनी जनतेला धिर दिला आहे. तर घोटी, आंभोळ प्रा.आरोग्य उपकेंद्राचे कर्मचारी घोटी यांनी गावात फवारणी करुन निर्जंतुक कोणी घाबरु नये असे आवाहन केले आहे.
आकाश देशमुख

============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे २३ लाख वाचक)