संगमनेरमध्ये आणखी दोन कोराना बाधित.! संख्या झाली चार, अकोले देखील लॉकडाऊन


संगमनेर (प्रतिनिधी):-
                         आज दुपारी संगमनेर शहरात दोन रुग्ण कोरोना बाधित असल्याचे लक्षात आले होते. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने दखल घेत 40 जणांची यादी तयार केली होती. ही धावपळ सुरू असतानाच आज संगमनेर शहरातील अणखी दोघे कोरोना बाधित असल्याची खळबळजनक माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 17 वर गेली असून संगमनेरमध्ये 4 झाली आहे. त्यामुळे, ही साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला फार मोठी कसरत करावी लागणार आहे. तर याहुन महत्वाचे म्हणजे नागरिकांनी स्वयंस्पुर्तीने यात सहभागी होणे गरजेेचे आहे. असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान संगमनेर तालुक्यानंतर अकोले तालुका देखील तीन दिवस लॅकडाऊन करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. उद्यापासून रस्तेफिरस्तींवर कडक करावाई करण्यात येणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज संगमनेरमध्ये दोन रूग्ण आढळल्याचे समजताच प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी उद्यापासुन तीन दिवसात (3 ते 5) संगमनेर पुर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन बाधित असतांना हे संकट रोखण्यासाठी प्रशासन सज्ज झाले होते. मात्र, आजच सायंकाळी जामखेड व संगमनेर अशा दोन तालुक्यांचे रिपोर्ट आरोग्य विभागाला प्राप्त झाले. त्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की, जामखेडच्या 20 वर्षीय तरूणाला याची बाधा झाली असून संगमनेरच्या वय वर्षे 41 व 68 वर्षाच्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. या माहितीमुळे आता प्रशासनाच्या पायाखालची जमीन सरकली असून त्यांनी काही कठोर निर्णय घेण्याची भुमीका घेतली आहे. उद्यापासून जो कोणी घरातून बाहेर पडेल त्याच्यावर 188 प्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे. इतकेच काय! जो व्यक्ती वाहन घेऊन विनाकरण रस्त्यावर दिसेल. त्याचे वाहन जप्त करण्यात येणार आहे. असे अनेक निर्णय घेण्यात आले असून हाच एक उपाय कोरोनाला रोखू शकतो. असे प्रशासनाचे मत आहे.
त्यामुळे, आज त्यांनी जो निर्णय घेतला आहे. तो जनतेच्या हिताचा असून त्याचे नागरिकांनी स्वयंप्रेरणेने पालन करणे गरजेचे आहे. असे झाले तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही. अन्यथा येणार्‍या काळात संगमनेरात हे रुग्ण मोठ्या प्रमाणावर पहायला मिळतील. त्यामुळे, प्रशासनाने नागरिकांना हात जोडून विनंती केली आहे. की, किमान तीन दिवस तरी घरी बसावे. अन्यथा प्रेमाची भाषा कळत नसल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
जनतेच्या माहितीसाठी व देशाच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने यात पुढाकार घेऊन फक्त घरी बसण्याचे सहकार्य प्रत्येकाकडून अपेक्षित आहे. ज्यांना मेडिकल औषधे, किराणा, दुध, भाजीपाला यांच्यासह अत्यावश्यक सेवा हवी आहे. त्यांना घरपोच सुविधा मिळणार आहे. शक्यतो प्रत्येकाने आपले मानसिक मनोबल वाढवावे. म्हणजे आरोग्य आणि आजारपण येणार नाही. त्यासाठी किमान तीन दिवस तरी योगा करुन चांगला आहार घ्यावा. फारच गरज भासली तर हॉस्पिटलशी संपर्क करुनच बाहेर पडावे.
यासाठी प्रांताधिकारी शशिकांत मंगरूळ, पोलीस उपाधिक्षक रोशन पंडीत, तहसिलदार अमोल निकम, पोलीस निरीक्षक अभय परमार, तहसिलदार मुकेश कांबळे, पोलीस निरीक्षक आरवींद जोंधळे, मुख्याधिकारी पटेल, सहायक पोलीस निरीक्षण पप्पू कादरी,  सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील , आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, डॉ. कचेरीया यांच्यासह नगरपंचायत व सर्व कर्मचारी यांची मोलाची भूमिका असणार आहे. त्यांना सर्वांना सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

02425 225353 तहसिल कार्यालय
02425 225308 नगर पालिका

02425 221265 ग्रामीण रुग्णालय

सागर शिंदे
सुशांत पावसे
============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे १९ लाख वाचक)