पोलीस संरक्षणातून अकोल्याचे बोकड पोहचले संगमनेरला.! ...तर ही पाच गावे प्रशासनाच्या विरोधात असहकार पुकारणार.!


सार्वभाौम (अकोले) :
                         गावांचे संरक्षण करण्यासाठी गावोगावी काही दक्षता पथके तयार करण्यात आले आहे. असेच पथक डोंगरगाव, गणोरे, हिवरगाव, पिंपळगाव निपाणी व विरगाव अशा पाच गावांनी तयार केले आहे. या पथकाने काल रविवार दि.12 रोजी काही खटकांना पकडले होते. त्यांनी याच परिसरातून पाच बोकड खरेदी करुन संगमनेराला चालविले होते. ते या पथकाने जप्त केले असता दुसर्‍या दिवशी पोलीस प्रशासनाने स्वत: येऊन ते पोलीस संरक्षणात रवाना केले. खाकीच्या जोरावर गावकर्‍यांना दमबजी करत बोकड खाटकांच्या ताब्यात दिले. त्यामुळे, पाच गावच्या ग्रामस्थांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. जर प्रशासन अशी धिटाई करीत असतील तर पाच गावे अहकार पुकारतील अशी माहिती अक्षय बोेंबले यांनी दिली. तर जर गावात कोरोना विषाणूची लागन कोणाला झाली. तर त्यास प्रशासन जबाबदार राहील असे त्यांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रशासन नेमक कोणासाठी हिवरगाव मधील धामोडी फाटा येथे झालेल्या घटनेनुसार पाचगाव सरपंच यांनी सापळा रचून संगमनेर मधील व्यापारी पाच बकरे गाडीवर घेऊन जात असताना पकडली स्थानिक गावातील व्यापार्यांचा व्यापार बंद आहे अशा परिस्थितीत ही कारवाई पाच गावातील सरपंचांनी सामूहिकरीत्या केली व्यापार्‍यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले मुळात यांना पकडण्याचे कारण असे की, हे व्यापारी संगमनेर बंद असताना देखील बाहेरील तालुक्यात घेऊन गावोगावी फिरून बकरे गोळा करून त्यांची विक्री करतात. मुळात या मोकाट फिरणार्‍या लोकांना आळा बसवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. पण, मुळात दुसर्‍या दिवशी पोलीस प्रशासन गावातील संबंधित व्यापार्‍यांना सोबत घेऊन आले व बकरे परत घेऊन गेले. पोलीस प्रशासनाने त्यांच्या नियमानुसार कारवाई करावी पण ज्या व्यक्तींना आरोपी म्हणून त्यांच्या ताब्यात दिले आहे. त्यांना सोबत घेऊन बकरी घेऊन  जाणे हे कितपत योग्य आहे. कदाचित संबंधित व्यक्ती हे कोरोणाच्या पार्श्वभूमीवर सोबत घेऊन फिरणे कितपत योग्य आहे.
                              प्रशासन अधिकारी आव्हान करत आहे की, नियमांचे पालन व्हावे. पण, आज त्यांनीच नियमाची अवहेलना केली. गावातील प्रशासनाला सहाय्यभूत यंत्रणा मग काय उपयोगाची? गावातील प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा उपयोग काय? गावातील स्थानिक व्यापार्‍यांचा व्यापार बंद करून उपयोग काय? जर बाहेरील गावातील लोक व्यापार करतात आणि पोलीस प्रशासन त्यांना पाठीशी घालते हे नागरिकांनी खटकण्यासारखे आहे. मा. पंतप्रधान मुख्यमंत्री जनतेला आव्हान करत आहे की, प्रशासनाला सहाय्य करा, स्वतः सैनिक बना, दक्षता दलाची स्थापना करा. तेच डोळ्यासमोर ठेवून ही यंत्रणा उभी करून प्रशासनाला सहाय्य करत आहोत. तरी पोलीस प्रशासन हा राजाश्रय त्या व्यापार्‍यांना कोणाच्या आशीर्वादाने देतात. याचा शोध घेणे महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर साह्यभूत ठरणार्‍या सरपंचांना पोलीस ग्रामस्थांना समोर आर्वाच्या भाषेत बोलून सरपंच गावचे डॉन आहे का? त्यामुळे, यांवर नेमका कोणाचा अंकुश आहे की नाही हा आपचा प्रामाणिक प्रश्न आहे. पोलीस प्रशासन कोणाच्याही आशीर्वादाने त्या व्यापार्‍यांना राजाश्रय देत असतील तरी त्याची आम्हाला फिकीर नाही. पण, संगमनेर मधील बंद भागातील व्यापार्‍यांना आमच्या गावात फिरू नये.
                              आमचे गाव ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित राहावे, आमचे पथक ‘आमचं गाव आमचं सरकार’ या पातळीवर काम करत असताना जर प्रशासन बाहेरील तालुक्यातील रेड अलर्ट असणार्‍या भागातील लोकांना संरक्षण देऊन सोबत घेऊन फिरत असतील तर जर उद्या आमच्या भागात ह्या कोरोनाची लागण झाली तरी याला जबाबदार कोण? हा प्रश्न आम्ही त्यांना नक्की विचारु. संबंधित पोलिस अधिकारी जेव्हा व्यापार्‍यांना गावांमध्ये घेऊन आले तेव्हा स्थानिक लोकांच्या प्रतिक्रिया अशा होत्या की आणलेले हे व्यक्ती रेड झोन मधील असून त्यांना आमच्या गावात व आमच्या भागात आणलेच का? असा सरळ प्रश्न नागरिकांनी पोलिसांना केला. तरी सरपंचांनी त्यांना त्वरित गावातून बाहेर काढून दिले. या प्रसंगाला गावातील सरपंच व नागरिक साक्षीदार आहेत जर प्रशासन अशा चुका करत असेल तर आम्ही गाव पातळीवर प्रशासनाला असहकार करू असा थेट इशारा डोंगरगाव, गणोरे, हिवरगाव, पिंपळगाव, विरगाव या गावातील सरपंचांनी केला आहे. यापुढे गावातील आरोग्यविषयक सुरक्षिततेबाबत काही समस्या निर्माण झाली याला जबाबदार प्रशासन राहील.
दरम्यान हा प्रकार म्हणजे स्थानिक ग्रामस्थांची तळमळ आहे. संचारबंदी असतांना अकोल्यात वासरांच्या गाड्या सुटतात काय!, गौणखनिजांची वाहतुक गुप्तपणे चालते काय!, ग्रामस्थांनी पकडलेले बोकड पोलीस संरक्षणात शेजारील तालुक्यात जातात काय! हे फार चिंतन करायला लावणारे प्रकार आहे. यात स्वत: पोलीस उपाधिक्षक व पोलीस अधिक्षक साहेबांनी लक्ष घालणे गरजेचे आहे. कारण, अकोल्यात आज सकाळीच सामान्य नागरिकांवर अमाणुषपणे लाठीहल्ले झाले, तर काही वाहने पकडून त्यांना वेठीस धरले गेले. याचे दु:ख तेव्हाचे होते. जेव्हा शहरातून खुलेआम अवैध धंदे चालतात, जनावरांची तस्करी होते, पोलीस संरक्षणात बोकडे संगमनेरला पाठविले जातात आणि नागरिकांवर खाकीचा वचक दाखविला जातो. हे कोठेतरी बोचनारे आहे. त्यामुळे, डॉ. किरण लहामटे साहेबांनी देखील यात लक्ष घालणे गरजेचे झाले आहे. कारण, त्यांच्या हस्तक्षेपानंतर देखील त्या वासरु वाहनार्‍यांवर कोणतीही कारवाई झाली नाही. म्हणजे, हा खेळ भाऊ खरोखर सोपा नाही. हेच लक्षात येऊ लागले आहे.
============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे २३ लाख वाचक)