संगमनेरचे हॉट्स्पॉट पॉकेट पुन्हा ९ दिवसांनी वाढले.! १ हजार ८५४ कुटूंबातील ९ हजार ९५५ संशयीत पुन्हा होमक्वारंटाईन.! ११ जणांचे रिपोर्ट उद्या मिळणार.!

सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेर तालुक्यात कोरोनाचे चार रुग्ण आढळल्यामुळे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यानी आज मंगळवार दि. १४ एप्रिल रात्री अगदी कडक भुमिका घेत काही निर्णय घेतले आहेत. जिल्ह्यतील चार ठिकाणे हॉट्स्पॉट पॉकेट म्हणून घोषीत केले होते. त्यांची मर्यादा आज संपत होती. मात्र, येथील गर्दी, नागरिकांची बेजबाबदार पणाची वागणूक व सुरक्षा लक्षात घेता. आणखी नऊ दिवस अत्यावश्यक सेवा देखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कितीही महत्वाचे काम निघाले तरी नागरिकांनी घराच्या बाहेर पडायचे नाही. यात मुकुंदनगर, आलमगिर (अ. नगर), नाईकवाडापुरा (संगमनेर) व जामखेड शहर अशा चार ठिकाणांचा सामावेश आहे. विशेष म्हणजे या ठिकाणांपासून दोन किलोमिटरचा परिसर सिल करण्यात आला होता. तो आणखी नऊ दिवस येथे सर्व सुविधा शासन पुरविणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना आपल्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे या परिसरात जो रस्त्यावर दिसेल त्याच्यावर थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुर्वी हा हा निर्णय शुक्रवार दि.10 एप्रिल सकाळी 6 वाजल्यापासून तर मंगळवार दि. 14 एप्रिल रोजी रात्री 12 वाजेपर्यंत होता. आता हा कालावधी आज १२ नंतर ते गुरुवार दि. २३ एप्रिल पर्यंत असणार आहे. त्यामुळे संगमनेरात १ हजार ८५४ कुटूंबातील ९ हजार ५५५ नागरिक पुन्हा होमक्वारंटाईन करण्याता आले आहेत.
कोरोनावर मात करताना प्रशासन सर्वोतपरी प्रयत्न करीत असले तरी, सर्वाधिक बेजबाबदार कोण वागत असेल तर ते नागरिक आहेत. कारण, यांना सांगून शिकून देखील यांनी प्रशासनाच्या नियमांची पायमल्ली केली. इतकेच काय तर उलट शासकीय नियम आणि रस्त्यावर उभे राहून ड्युटी करणार्यांच्या चुका काढण्यात यांना धन्यता वाटली. तर दुसरी गोष्ट म्हणजे जे परदेशी बाबु भारतात येऊन एखाद्या उंदरासारखे बिळात लपून बसले. त्यांनी तर हद्दच पार केली. जर हे बाबू स्वयंप्रेरणेने तपासणीसाठी पुढे आले असते तर आज राज्यात हजार पार झाला नसता. पण, या बेजबाबदारीला पर्याय नाही. त्यामुळे, आज प्रशासन खरोखर अशा नागरिकांपुढे हतबल झाले आहे. तेच चित्र संगमनेरात आहे. लोकांना प्रशासन विनती करुन थकले आहे. तरी देखील दुपारी १२ ते ३ संगमनेर अगदी ओसंडून वाहते. शासनाने दिलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेत घरतून बाहेर पडत आहे. त्यामुळे, जनतेला सांगून, शिकवून व विनंती करुन त्यांच्यात गांभीर्य नाही. हेच चित्र दिसत आहे. त्यामुळे, जिल्हाधिकार्यांनी संगमनेरसह चार ठिकाणी पुन्हा मोठा निर्णय घेतला आहे. आता संगमनेर शहरातील नाईकवाडापुरा हा "हॉट्स्पॉट पॉकेट" म्हणून घोषीत केले आहेत. तर त्याच्या अजुबाजूचा दोन किलोमिटरचा परिसर "कोर एरिया" म्हणून घोषीत केला आहे. आता या क्षेत्रात कोणी बाहेर दिसणार नाही. कोणत्याही वाहनाला परवानगी नाही. कोणतेही मेडिकल, दवाखाने, पालेभाजा विकणारे विक्रेते, फळविक्रेते, किराणा वैगरे कोणतेही चोचले पुरविले जाणार नाही. जे हिंडफिरे शहरात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली शहरात हालहवाल पाहण्यासाठी येतात. त्यांनी घरातच बसून आपला विरंगुळा शोधावा अन्यथा कोणतीही सबब न एकता थेट गुन्हा दाखल करण्यात येईल. त्यामुळे, संगमनेरला प्रशसनाने गांभीर्याने घेतले असून जनता का त्याचे महत्व समजून घेत नाही. या महीमारीला वेळीच आवर घालण्यासाठी आता तरी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी शशिकांत मंगरूळे, पोलीस उपाधिक्षक रोशन पंडीत, आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, डॉ. कचेरीया, पोलीस निरीक्षक अभय परमार, सहा. पोलीस निरीक्षक पप्पू कादरी यांनी केले आहे.
तर लॉक डाऊन कालावधी वाढविल्याने प्रशासनाने नवीन आदेश जारी केले आहेत. यात आता किराणा दुकानाचे वेळापत्रक दिले असून, अत्यावश्यक सेवा वगळता इतरांसाठी इंधन बंदी करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता लॉक डाऊन कालावधी ३ मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी जमावबंदीचा नव्याने आदेश काढला आहे. खाजगी वाहनांसाठी पेट्रोल व डिझेल विक्री पूर्ण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक सेवांना ओळखपत्राची खात्री केल्याशिवाय सकाळी ५ ते १२ वाजेपर्यंत इंधन देण्यात येईल.
किराणा दुकानाची वेळ सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत राहील. दूध वाटपाची वेळही सकाळी ५ तेे ८ व सायंकाळी 5 ते 7 या दरम्यान राहिल.
शेती मालाच्या निगडित दुकाने सुरू राहतील. जनावरांचे खाद्य दुकानही उघडी राहतील असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर गोरगरिबाला मदत करताना कोणीही फोटो काढल्यास व ते सोशल मीडियावर टाकल्यास किंवा कोणत्याही माध्यमाद्वारे वाटप करताना चे फोटो प्रसारित केल्यास फोटोमध्ये असणारे संबंधितावर गुन्हा दाखल करू असे जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी स्पष्ट केले आहे