प्रवरामाईच्या पाण्यात फेकलं हजारो किलो मटन.! जवळच सार्वजानिक विहीर.! पाच हजार नागरिक पितात पाणी.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यात हॉटस्पॉट व लॉकडाऊन असताना देखील गोरख धंद्याना मात्र लगाम बसला नाही. संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक अवैध धंदा म्हणला की ‘गोमांस’ ने संगमनेर प्रसिद्ध झाले आहे. लॉकडाऊनमध्ये ही संगमनेरात सर्वाधिक कारवाई ही गोमांसवरच झाली आहे. शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या निंबाळे व रायते परिसरातील नदीपात्रात हजारो किलोंचे गोमांस गोणीत व उघड्यावर पडलेले आढळले. हे गोमांस नदीपात्रातील वाहत्या पाण्यात फेकल्याने दिसून आले नाही. परंतु पाणी आटताच त्याचा दुर्गंध लांबवर पसरला आहे. हा कारभार कोणी केला. याचा शोध घेणे पोलिसांना अशक्य नाही. पण, तरी सद्या हे पाणी वाहते असून तेथील परिसरात वास ऊठला आहे. अशा परिस्थितीत त्याची विल्हेवाट लावण्याचे काम नगरपालिकेने केले पाहिजे. विशेष म्हणजे या घाणीच्या जवळच संगमनेच्या नागरिकांना पाणी पुरवठा करणारी विहीर आहे. हे पाणी झिरपून त्या विहीत जाऊन नागरिकांचा आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे, या घाणीची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. अन्यथा कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन अॅडमिट होणार्यांची संख्या कमी, पण या दुषीत पाण्यामुळे आजारी होण्याचे प्रमाणे फार मोठे असू शकते. त्यामुळे, नगरपालिका प्रशासनाने यावर तत्काळ काहीतरी प्रतिबंध करणे गरजेचे आहे.

दरम्यान हा प्रकार ज्या कोणी व्यक्तीने केला आहे. त्यांनी सदसद विवेकबुद्धी गहाण ठेवली असावी यात शंका नाही. परंतु, हा सर्व प्रकार रायते-निंबाळे परिसरात करताना त्यांनी विचार करणे गरजेचे होते. कारण हे मांस जेथे आढळून आले. या स्पॉटपासुन अवघ्या 100 मीटर अंतरावर रायते-वाघापुरला सार्वजनिक पाणी पुरवठा करणारी विहीर आहे. ही विहीर रायते-वाघापुरातील 3 हजार 500 लोकांची ताहान भागवते. तर 500 मीटर अंतरावर निंबाळे गावला पाणी पुरवठा करणारी विहीर आहे. ही विहीर 1 हजार 357 लोकांची पाणी पुरवते. लॉकडाऊनच्या काळात कोणी बाहेर पडत नाही त्यामुळे सर्वजण दुर्गंधी सुटलेले पाणी लोक पीत आहेत की काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. असे असले तरी, गावच्या व शहरातील कोणत्याही लोकप्रतिनिधींना यांची काळजी नाही. स्थानिक पातळीवर कुठलाही शासकीय कर्मचारी व सरपंच याची दखल घ्यायला तयार नाहीत. खरंतर कर्मचारी शासकीय कार्यलयांना कुलुप ठोकुन याच रस्त्याने जातात. परंतु, या सर्व गोष्टीकडे ते दुर्लक्ष करतात. नदीपात्र परिसरात ही घटना एकच महिन्यात चौथ्यांदा घडल्याने गावामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपुर्वी रोखठोक सार्वभौमने प्रवरामाई रक्ताळली या मथळ्याखाली एक बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर प्रशासनाने त्याची दखल घेत नाही उपायोजना केल्या होत्या. कत्तलखान्यांतील रक्तमिश्रीत पाणी काही कालावधिसाठी बंद झाले होते. मात्र, आता काही समाजकंठकांनी संवेदनशीलतेचा अंतच केला आहे. तेव्हा रक्त सोडले जात होते. आता तर मटनच आणून टाकले आहे.
- सुशांत पावसे