एक दानशूर बाबासाहेब.! बाप रे ! 2 1 लाखांचा किराणा, भाजीपाला वाटला!
सार्वभौम (संगमनेर) :
हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे, माणसाने, मानसाशी मानसासम वागणे हे गीत आपण एकल्यानंतर संवेदनशील मानसाच्या सगळ्या चेतापेशी जागरुक होतात. अर्थात ज्यांना भावना आहेत. त्यांच्याकडेच प्रचंड आत्मियता असते. तर या सर्वांमध्ये महत्वाचे म्हणजे की, कठीण परिस्थितीत जर माणूस मानसासाठी उभा राहिला नाही. तर तो माणूस कसला. म्हणून तर बुद्धिमत्ता, विचारशक्ती, भावना या मनुष्य प्राण्याला मिळालेल्या देणग्या आहेत. त्यांचा वापर त्याने योग्य तर्हेने, योग्य वेळी, योग्य ठिकाणी करणे अपेक्षित असते. नाहीतर इतर प्राणिमात्रा आणि मनुष्य यांच्यात फरकच उरणार नाही. याच सामाजीक बांधिलकीची भावना घेऊन संगमनेर तालुक्यातील मांडवे गावातील बाबासाहेब कुटे यांनी संपूर्ण गावाला दर शनिवारी प्रत्येक कुटुंबासाठी एक हजार रूपयांचा किराणा व भाजीपाला घरपोच देण्याचे ठरवले. जोपर्यंत कोरोना विषाणुचा प्रदुर्भाव कमी होत नाही. तो पर्यंत मांडवे गावचे दातृत्व श्री, कुटे करणार आहेत. त्यांमुळे, त्यांच्या कर्णासारख्या अंत:करणाला अनेकांनी आपले हात जोडले आहेत.
तुम्हाला एक गोष्ट माहित आहे. राजकारणात उधळपट्टी करायची म्हटल्यावर कोणीच कमी पडत नाही. अगदी आत्ताच्या विधानसभेला प्रस्तापितांच्या विरोधात उभे रहायचे म्हटले तर एकट्या संगमनेरातून एक ना दोन तब्बल 40 ईच्छूक उमेदवार मैदानात उतरले होते. आता विधानसभा म्हटल्यावर तो खेळ निव्वळ कोेटीत असतो. म्हणजे या तालुक्यात पैशाला कमी नाही. हे नक्की. मग जेव्हा निडणुकीत मतांसाठी पैसे फेकणारे अनेकजण पुढे येत होते. तर आज ते कोठे गेले. अर्थातच त्यासाठी दानशुराचं काळीज लागतं. केवळ राजकारणाचं अंग असून चालत नाही. त्यामुळे, एक कट्टर शिवसैनिक म्हणून येथे आदरणीय बाळासाहेबांची प्रकर्षाने आठवण होतेे. 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण आणि त्यांच्या या वाक्याची सार्थकता जेव्हा बाबासाहेब कुटे यांच्यासारखे व्यक्ती समोर येतात. तेव्हा ठाकरेंच्या विचारांचे प्रतिबिंब या तळागाळातील शिवसैनिकांमध्ये दिसून येते.
खरंतर कोरोना ह्या जीवघेण्या व्हायरसमुळे उदभवलेल्या परिस्थितीत अनेक लोकांच्या हाताला काही काम धंदा नाही. एक वेळच्या पोटाची खळगी भरण्यासाठी लोक व्याकुळ झालेले आहेत. याच कष्टकरी जनतेची हाल अपेष्टा पाहुन श्री. कुटे यांच्या भावना दुखावल्या गेल्या व त्यांनी संपूर्ण गावाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली. किती उदार अंत:करणाचा माणूस म्हणायचा हा. लोकांच्या भावना जाणून घेणारे व त्याचे भांडवल घेऊन राजकारण करणारे या तालुक्यात कमी नाही. किंवा चार आण्याचे देऊन दहा आण्याचा गवगवा करणारे महाभाग देखील येथे कमी नाही. मात्र, दानशुर कुटे हे त्यापैकी नाही. कारण, त्यांच्या गावातून अशा काही प्रतिक्रिया आल्या. की, रोखठोक सार्वभौमला या कर्मयोग्याची दखल घ्यावी लागली. अन्यथा फुकटची मीडियाबाजी करणारे आमच्याकडे कमी नाहीत.
वास्तवत: संगमनेर तालुक्यातील पठारभागावर एमआयडीसीसारखे रोजनदारीचे कुठले साधन नाही. अनेक कुशल कामगारांच्या हाताला काम नाही. तर अकुशल लोकांचे काय हाल होत असतील हे नव्याने सांगायला नको. त्यामुळे, काल मातीत राबनारे हेच हात डोके धरून घरी बसलेे होते. रोजची चूल कशी पेटणार हा त्यांच्यापुढे उभा राहिलेला प्रश्न त्यांना जीवघेणा ठरला होता. अशावेळी एक देव म्हणून बाबासाहेब कुटे हे त्यांच्यापुढे उभे राहिले आणि त्यांच्या डोक्यावरील ओझे आपल्या खांद्यावर घेत सहकार्याची भावना त्यांनी कृतीतून प्रतित केली. या गावातील ग्रामस्थांसाठी आपल्याला काय करता येईल असा विचार केला. केवळ हातावरील कुटूंबच नव्हे तर करायचे तर संपुर्ण गावासाठीच. या उद्देशाने साहेबांनी अनेक संकल्पना उभ्या केल्या. या दरम्यान कुटे फाउंडेशनच्या संचालिका प्रवीणा मोरे यांच्या डोक्यात एक संकल्पना आली. प्रत्येक कुटुंबास प्रत्येकी एक हजार रुपयांचा अत्यावश्यक किराणा व भाजीपाला दिला तर ह्या गावातील सर्व कुटुंबाला एक आधार देता येईल. हीच संकल्पना अमलात आणुन ती कुटे यांनी प्रत्यक्षात उतरवली. गावात 3 हजार 500 लोकसंख्या असून 672 उंबरे आहेत. या प्रत्येक घरात कुटे फाउंडेशनच्या माध्यमातून ही सेवा घरपोच दिली. तुम्हाला आश्चर्य वाटेल की 6 लाख 80 हजार रुपये इतका साप्ताहिक खर्चाने सद्या ते या गावासाठी दर हप्त्याला ते करत आहे. संचार बंदी उठत नाही तो पर्यंत हा गावाचा खर्च ते करणार आहेत. येत्या बुधवारी हा त्यांचा तिसरा हप्ता असणार आहे. म्हणजे 21 लाख रुपयांचे अभुतपुर्व दान त्यांनी गावासाठी केले आहे. त्यांनी आजवर अनेकांना मदतीचा हात दिला आहे. मात्र, एका हताची खबर दुसर्या हाताला माहित होत नाही. हीच त्यांच्या दानशुर वृत्तीची ओळख आहे. मांडवे गावचे कैवारी म्हणुन आज कुटे कुटुंबीयाकडे पाहिले जाते. सामाजिक क्षेत्र असो किंवा धार्मिक अथवा शैक्षणिक. यात बाबासाहेब कुटे यांनी केलेले कार्य हे विसर पडु देणारे नाही. मांडवे गावातील हनुमान मंदिरासाठी 85 लाखांची मदत, दुष्काळात स्वखर्चाने पठार भागात चालवलेली चारा छावणी व आता घरपोच अत्यावश्यक सेवा. खरोखर अशा व्यक्तींना शब्दात बांधण्याचे सामर्थ्य आमच्यात नाही. पण, अशा व्यक्तींना सामाजापर्यंत आम्ही नेवू शकलो नाही. तर हा नैतिकतेचा अपमान ठरेल. ज्यांनी कोणताही स्वार्थ अंगी बाळगला नाही. त्यांना निस्वार्थीपणाने प्रत्येक व्यक्तीने आपल्या ह्रदयात अगदी ध्रुवतार्यासारखे आढळ स्थान दिले पाहिजे. इतकेच नाही. तर अशा व्यक्तींचे ऋण फेडण्याची जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्याची उतराई होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अर्थात हा एक मानवी नैतिकतेचा भाग झाला. पण, खरोखर अशा व्यक्तींना ईश्वर उदंड आयुष्य लाभो.! हीच प्रार्थना.
इथे असंवेदनशीलतेचा अंत होतो आणि जन्म घेते माणुसकीचे उत्तरदायित्व! मांडवे गावासाठी बाबासाहेब कुटे साहेबांनी केलेले हे कार्य कधीच विसरता येणार नाही. ते आमच्या गावासाठी देव म्हणून अवतरले आहेत. वेळप्रसंगी कोणी कोणाला विचारत नाही. असे म्हणतात. पण, आज आमच्यातील गरीबांवर भुकेची वेळ आली तर साहेबांनी त्यांच्या चोचीत दाना भरला आहे. त्यांचे उपकार अधी न विसरण्यासारखे आहे. गावातील सगळ्यांचे पालकत्व त्यांनी घेऊन सगळ्यांना मदत केली अशी प्रतिक्रिया रुपेश धुळगंड, अनिल डुमाळे, सुभाष खेमनर, चांगदेव धुळगंड, अशोक आयनर, निलेश खेमनर, बाजिराव खेमनर, निलेश गुंजाळ अशा ग्रामस्थाना दिली.
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी प्रत्येक शिवसैनिकाला सांगितले आहे. 80 टक्के समाजकारण करायचे आणि 20 टक्के राजकारण. त्यामुळे, मी आजवर त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जगण्याचा प्रयत्न केला आहे. आयुष्यात मला जो धार्मिक व समाजिक सेवा करण्याचा योग आला. तो मी कधीही गमविला नाही. प्रत्येकवेळी एक आत्मिक समाधान लाभले की जिवण सत्कर्मी लागल्यासारख्ये वाटते. समाज परिवर्तनाची सुरूवात मी माझ्यापासून करतो. असा विचार प्रत्येकाने केला तर देशात कोणीच उपाशी राहणार नाही. - बाबासाहेब कुटेसुशांत पावसे
संगमनेर (प्रतिनिधी)
============
"सार्वभाैम संपादक"
सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे 22 लाख वाचक)