*अकोल्यातील 600 पोते रेशनींग तांदुळची संगमनेरात तस्कारी.! तीन दिवस तांदुळ पडून, जनता अन्नधान्याची वाट पाहतेय..! आमदार साहेब.! जनता तुमच्याकडे फार आशेने पाहते आहे, पण भ्रमनिराश होतोेय का.?
सार्वभौम (अकोले) :
अकोले तालुका हा दुर्गम आणि आदिवासी असला तरी तो कुपोषीत देखील असल्याचे दिसून येते. येथील तीन ते चार लाख जनतेपैकी तीन ते चार हजार लोक देखील प्रशासकीय यंत्रणेबाबत समाधानी नाहीत. किंवा शासकीय योजना एखाद्या व्यक्तीपर्यंत अगदी तंतोतंत पोहचली असे पहायला मिळणार नाही. हेच सोडा पण आज एक फार धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. तो म्हणजे अकोले तालुक्यासाठी जो रेशनिंग तांदुळ येत होता. त्या सहाशे पोत्यांना मध्येच कातरी लावल्याचा प्रकार समोर आला आहे. नशिब त्या आदिवासी व अकोल्यातील गोरगरिब जनतेचे जे संगमनेर पोलिसांनी हा प्रकार उघड केला. अन्यथा कसले महसुल आणि कसले पुढारी.! यांच्या भरवशावर राहले तर जनता चिताड उपाशी मरेल. विशेष म्हणजे, लोकांनी डॉ. किरण लहामटे यांना किती आशेने निवडून दिले होते. साहेब.! तुमच्याकडून मत देताना कोणतीही अपेक्षा केली नाही. फक्त आज दोन वेळचे अन्न त्यांना पाहिजे होते. पण झाले काय? अकोल्यात येणार्या रेशनचे 600 पोते म्हणचे 30 ते 40 टणाच्या मालाचा गफला होण्याचा प्रयत्न झाला ते धान्य संगमनेरच्या तहसिल कार्यालयात सडत पडले आहे. म्हणजे काही लोक त्यांची गोदाम भरु पहात आहेत. तर आदिवासी भागात लोक पोट भरण्यासाठी किडकं का होईना पण रेशन मागत आहे. खरोखर हे उद्धवा.! अजब तुझे सरकार.!
होय.! बातमी वाचल्यानंतर थोड वाईट वाटेल. पण, अकोले तालुक्यातील दुर्गम गाव विहीर, कोहणे, आंबेवंगण अशा काही ठिकाणांहुन अगदी सामान्य मानसांचे फोन आले. त्यांनी विनंती केली. तुम्ही फार दानशूर लोकांच्या बातम्या करतात. राजूर भागात का कोणी वाड्या वस्त्यांवर येत नाही. त्यावर विचारणा झाली की, तुमच्याकडे रेशन येत नाही का, त्यावर विहीर सारख्या ठिकाणी रेशन दुकानदार म्हणतो, तुम्हाला फुकट वाटत बसायला मला वेळ नाही. वाटायचं मी आणि खायचं तुम्ही.! धान्य पाहिजे असेल तर पैसे मोजावे लागतील. त्यामुळे, करणार काय? हाताला काम नाही, जवळ पैसा नाही, धान्य घ्यायला रक्कम नाही. हि 1972 पेक्षा फार मोठी दुष्काळाची वेळ आमच्यावर दैवाने आणली आहे. अर्थात या नागरिकांनी तोडक्या मोडक्या अक्षरात अर्ज देखील पाठविला आहे. हे शब्द ऐकल्यानंतर मनाला प्रचंड वेदना होतात. कोठे आहेत जिल्हाधिकार्यांचे नियोजन? कोठे आहे प्रांताधिकार्यांची तळमळ, कोठे काम करतेय नेमके तहसिलदारां चे पथक, काय उपयोग तरी अन्न औषध पुरवठा विभागाचा आणि कामाचा अवढंबर आणणार्या प्रशासकीय यंत्रणेचा?
खरंतर डॉक्टर साहेबांची फेसबुक पोेष्ट पाहिल्यानंतर एक नाव पहिले पुढे येते. ते म्हणजे "आशेचा एक किरण.!" पण, जेव्हा अकोल्यासाठी जिल्हा पुरवठा विभागातून 40 टनाच्या तांदुळाची गाडी समनापुर सारख्या ठिकाणी थांबून त्यातील अन्नधान्य काढून घेतले जाते आणि ते पकडल्यानंतर महसुल प्रशासनाच्या निष्काळजीमुळे सडत पडू लागतात. तर दुसरीकडे दुर्गम भागातून अन्नधान्य नाही म्हणून लोक धाय मोकलुन रडतात. तेव्हा डोळ्यापुढे सर्वत्र अंध:कार दिसू लागतो. असे म्हणतात साहेब फार आत्मियता असणारे माणूस आहे. पण, साहेब.! तुम्ही कालही जनतेत होता. आजही आहेत. पण, प्रशासन तुमच्या ताब्यात नाही असे वाटू लागले आहे. आज तिन दिवस झाले. अकोल्याच्या जनतेच्या मुखी जाणारे तांदुळ संगमनेरला धुळ खात पडले आहे. याहुन महत्वाचे म्हणजे. हा सर्व प्रकार काही दिवसांपुर्वी पत्रकारांनी आमदार साहेबांना बोलून दाखविला होता. राजूरमध्ये धान्याची तस्करी करणारा एक मोठा डिलर कोण आहे. याचा शोध घेतला असता तर आज ही वेळ आली नसती. तर आमदार साहेब म्हणाले होते. त्या वासरे वाहणाऱ्यावर कायदेशीर गुन्हा दाखल होईलच. हे मीडियात आले पण ते कागदावर आले का ? नाही ना? मग हे प्ररशासन तुम्हाला इतके सहज का घेतय.? साहेब.! पवारांसारखे नेते तुम्हाला जीव लावतात, आदर करतात मग प्ररशासन का दखल घेत नाही ? ते ही कायदेशीर मागणी असतांना. हे प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडले आहेत.
![]() |
PI Abhay parmar |
सखोल चौकशी झाली तरच....
अशा कठीण परिस्थितीत जर धान्याची तस्कारी होत असेल तर याची सखोल चौकशी झाली पाहिजे. एखाद्या सक्षम अधिकार्याकडे या गुन्ह्याचा तपास देऊन नगर, संगमनेर, अकोले ते राजूर हे कसे रॉकटे आहे. याची उकल होईल. यात काही अधिकार्यांचा देखील सामावेश असल्याचे बोलले जाते. त्यामुळे, जर या घटनेचे मुळ आज शोधले तरच उद्या गोरगरिबांच्या ताटातील हा किडा ठेचला जाऊ शकतो. अन्यथा येरे माझ्या मागल्या.! हेच सुरू राहील. मात्र, जर कोणी आदिवासी आणि गोरगरिबांचा कैवारी म्हणून मिरवत असेल तर ते त्याने आत्मचिंतन करुन आपली नैतिकता तपासली पाहिजे.
अद्याप गुन्हा दाखल नाही.!
संगमनेर तालुका म्हणजे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला आहे. तेथे आज मितीस होमक्वारंटाईन केलेल्यांची भयानक हाल असून लोक अपुर्या सुविधांच्या आभावी बाहेर पडू लागले आहेत. तर याच तालुक्यात आदिवासी विभागात जाणार्या अन्नधान्याची तस्कारी होते. इतकेच काय! तर तीन दिवस उलटून देखील त्यावर कोणताही गुन्हा दाखल होत नाही. ते 600 पोते तांदुळ तहसिलला पडून आहेत. याच्याइतके दुर्दैव काय असू शकते. यातून थोडाफार मुद्देमाल म्हणून सॅम्पल घेऊन ते धान्य वापरात आणले तर देव पावल्यासारखे होईल. पण हे करणार कोण? ते देवाला माहित....
============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे २३ लाख वाचक)