लोकवर्गनीतून निवडून आलेल्या डॉ. लहामटेंनी दिला चक्क 2 लाख 32 हजारांचा निधी, अकोल्याच्या आरोग्यासाठी ५० लाखांची मागणी
अकोल (प्रतिनिधी) :
कोविड-19 हा संसर्ग महाराष्ट्रात थैमान घालत असताना महाराष्ट्रातून अनेक दानशुरांनी मदतीचे हात पुढे केले आहेत. या मदतीसाठी अकोले तालुक्याचे आमदार डॉ.किरण लहामटे हे देखील पुढे सरसावले असून त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी दोन लाख बत्तीस हजाराचा चेक त्यांच्या खात्यावर जमा केला आहे. तर, अकोले तालुक्यात वैद्यकिय उपचारासाठी बहुतांशी गोष्टींचा तुटवडा पडत आहे. त्या गोष्टींची पुर्तता करण्यासाठी आमदार डॉ.किरण लहामटे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पन्नास लाख रुपये निधी मागितला आहे. त्यामुळे, काल लोकवर्गनीतून निवडून गेलेल्या डॉक्टरांनी इतके उदात्त अंत:करण दाखविल्यामुळे त्यांचे तालुकाभर कौतुक होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंञी अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करण्याचे अवाहन केले होते. वैद्यकीय व्यवस्था व जनसामान्य माणसाला मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार बांधील आहे. महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात कोरोना या रोगास आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशिल आहे. या कामासाठी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला मोठ्या निधीची गरज भासणार आहे. या कठीण परिस्थितीत सामान्य माणसापर्यंत मदत पोहचली पाहिजे असे धोरण सरकारने आखले आहे. त्यामुळे एक लोकप्रतिनिधीचे नैतिक कर्तव्य म्हणून आमदार डॉ. किरण लहामटे यांनी आपल्या आमदार निधीतुन वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करण्याचे पत्र काल जिल्हाअधीकारी राहुल द्विवेदी यांच्या दिले आहे. या पत्रात आमदार डॉ.किरण लहामटे यांनी म्हटल आहे की, कोविड -19 या विषाणुमुळे उद्भवणार्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्याची गरज आमदार निधी अंतर्गत तत्काळ करण्यात यावी. यामध्ये अनेक कोविड 19 च्या प्रथामिक प्रतिबंधक चाचण्याचे साहित्य, यंत्रसामुग्री व इतर साहित्य असून अकोले तालुक्यातील केंद्र व उपक्रेंद्रांना, प्राथमिक आरोग्यकेंद्र यांना भेटी दिल्या होत्या. त्यातुन ही बाब सातत्याने समोर येत होती तसेच तसेच अकोले ग्रामिण रूग्णालयास ही भेट देत डॉ. घोगरे, डॉ. म्हेत्रे व स्टाफशी चर्चा केली होती. यावेळी वैद्यकिय उपचारासाठी लागणार्या व तुटवडा असणार्या गोष्टींची चर्चा समोर आल्या आहेत. त्याची पुर्तता करण्यात यावी. त्यासाठी अकोले तालुक्याचे आमदार डॉ.किरण लहामटे यांनी या साहीत्य व यंत्रसामुग्री साठी तत्काळ पाठपुरावा उपलब्ध करत पन्नास लाख रुपये निधीची मागणी केली आहे. यापुढे अकोले तालुक्यात आपण उपजिल्हा रूग्णालय आणणार आहोत त्यासाठी मी प्रयत्नशिल असल्याच डॉ.किरण लहामटे यांनी म्हटले आहे.
डॉ.किरण लहामटे अभिनंदन
आमदार डॉ.किरण लहामटे हे आपली निवडणुक सामन्य जनतेकडून एक रुपयाची मदत ते दहा, विस हजारांची मदत घेऊन निवडणुक लढले होते. माञ आज ही ते दोन लाख बत्तीस हजार मदत मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केल्याने कोविड-19 च्या संकटात जनतेशी बांधील असल्याच दिसुन आल आहे. मदतीच्या बाबतीत पुढे आल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अभिनंदन केले आहे.महेश जेजुरकर
अकोल (प्रतिनिधी)
============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे १९ लाख वाचक)