संमगमनेरचे 15 संशयीतांपैकी 2 कोरोना बाधित, आणखी 40 जणांना ताब्यात घेणार.! अकोल्याच्या वेशीवर कोरोनाचे सावट, प्रशासन सज्ज


अहमदनगर (प्रतिनिधी):-
                                     मुस्लिम धर्माच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणार्‍या 14 जणांच्या संपर्कात आलेल्या संगमनेरच्या 15 जणांपैकी दोघांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी सांगितली आहे. त्यात दोन विदेशी, दोन संगमनेर व दोन मुकुंदनगर असे सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले असून आता जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या 14 वर जाऊन पोहचली आहे. यात एक विशेष बाब म्हणजे ही रुग्ण 6 ते 17 वयोगटातील असून एक 68 वयाचा आहे. ही लागण पसरत चालली असून नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घ्यावी. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हा आजार संमगनेरमध्ये येऊन पोहचल्यामुळे अकोले प्रशासनाने चांगलीच खबरदारी घेतली आहे.  अकोल्यात सद्या 11 हजार 580 जणांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांना प्रशासनाने सक्त ताकीद दिली असून त्यांनी बाहेर पडू नये अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येईल असे सांगण्यात आले आाहे. तर 11 हजार 500 जणांच्या हातावर शिक्के मारुन झाले असून उद्यापासून काही संशयीतांची शोध मोहिम सुरू करणार आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर जिल्ह्यातील मुकुंदनगर परिसरात गेल्या काही दिवसांपुर्वी आशिया खंडातील आयवरी कोष्टी, इरान, टांझानिय व मुंबई आणि दिल्ली अशा विविध ठिकाणांहुन 14 जण आले होते. त्यापैकी परदेशातून आलेल्या दोघांना कोरानाचा संसर्ग झाल्याचे लक्षात आले होते. दरम्यान त्यांच्या संपर्कात आलेल्या 49 जणांना आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाने ताब्यात घेऊन कोरोना तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. त्यापैकी 31 जणांचे अहवाल आले असून त्यापैकी तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आले असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू करण्यात आले आहेत.
दरम्यान या परदेशी नागरिकांच्या संपर्कात संगमनेर शहरातील 15 नागरिक आले होते. त्यांना (दि.30) प्रशासनाने ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. आज त्याचा रिपोर्ट आला असून त्यात जमातीच्या सपर्कात आलेल्या दोघांचे आवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यापुर्वी परदेशातून आलेल्या 11 जणांना ताब्यात घेतले होते. त्यांतील दोघांना कोरोनाची लागण झाली असून मुकुंदनगर येथे राहणार्‍या दोघांना ही लागण झाली आहे. मात्र, ही दोघे परदेशातून आलेले नसून ते भोपाळ व राजस्थानचे असून विदेशी लोकांसोबत भाषांतर करणारे होते. अशी माहिती मिळाली आहे.
दरम्यान संगमनेरमध्ये या आजाराचा फैलाव झाला असता प्रशासनाने चांगलीच कंबर कसली आहे. या अहवालानंतर आरोग्य प्रशसनाने या लोकांच्या सपर्कात असणार्‍यां 40 जणांची यादी तयार केली आहे. त्यांच्याशी संकर्प करण्याची काम सुरू असून त्यांना ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात पाठविणार असल्याची आरोग्य अधिकार्‍यांनी माहिती दिली आहे.
सागर शिंदे
============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे १९ लाख वाचक)