होमक्वारंटाईन बहाद्दरांचा सामजसेवक व महिला सरपंचावर हल्ला, 12 जणांवर गुन्हे दाखल.! घराबाहेर निघू दिले नाही म्हणून केला राडा.!


अकोले (प्रतिनिधी) : अकोले तालुक्यातील मुथाळणे येथे काही होमक्वारंटाईन असणार्‍या बहाद्दरांनी एक समाजसेवक त्यांची पत्नीवर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यात बाळु पुंजा सदगीर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पत्नीस देखील मारहाण करण्यात आली आहे. एक विशेष म्हणजे चूक इतकीच की, आरोपी हे बाहेरगावाहुन आले होत. ते होमक्वारंटाईन असताना देखील ते गावभर फिरत असल्यामुळे त्यांना घरात बसण्याची विनंती केली होती. त्याचा राग येऊन हा हल्ला झाला आहे. त्यामुळे, अशा घटनेत आरोग्य विभाग, तहसिलदार व पोलीस खात्याने विशेष लक्ष घालणे गरजेचे आहे. कारण, एक सजग नागरिक म्हणून प्रशासनाने आवाहन केले होते. जर कोणी असे संशयीत बाहेर फिरत असेल तर त्यांना घरात बसण्याची विनंती करा. आता ही विनंती किती अंगलट आली आहे. त्यामुळे, किमान अशा हल्लेखोरांवर तरी तत्काळ कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. अन्यथा प्रशासनाच्या आवाहनांवर कोणी विश्वास ठेवणार नाही व कितीही मोठे संकट आले तरी सहकार्य करणार नाही. त्यामुळे. त्यांच्याकडून तत्काळ कारवाईची अपेक्षा सजग नागरिकांनी ठेवली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.5 एप्रिल रोजी अकोले पंचायत समिती आरोग्य अधिकारी यांनी बाहेरगाववरून मुथाळणे (ता.अकोले) येथे आलेले दत्तु  कचरू  सदगीर व देवराम कचरू सदगीर (रा. मुथाळणे) अशा दोघांना होमकोरोन्टाइन केले होते. मात्र, हे महाशय दोघे खुलेआम फाट्यावर फिरत  होते. त्यामुळे समाजसेवक बाळु पुंजा सदगीर यांनी त्या दोघांनाही समजून सांगण्याचा प्रयत्न केला. देश भयानक परिस्थितीतून जात आहे. हा आजार आपल्या शेजारी तालुक्यात झाला आहे. त्यामुळे तुम्ही त्यास सहज घेऊ नका. तुम्हा दोघांनाही होमकोरांटाइन केले आहे. त्यामुळे तुम्ही बाहेर फिरू नका. असे समजावुन सांगितल्याचा त्यांना राग आला.

                         त्याचवेळी त्या दोघांनी घराकडे जाऊन घरातील कचरू सखाराम  सदगीर, भोराबाई कचरू सदगीर, बाळु कचरू सदगीर, ऋषीकेश देवराम सदगीर, आदीत्य बाळु  सदगीर, सखुबाई बाळु सदगीर, पुष्पा देवराम सदगीर, देवराम कचरू सदगीर, बाळु कचरू सदगीर, दत्तु कचरू सदगीर यांच्यासह अन्य चार यांना बोलावून आणले.  ते काठ्या  दगड घेवुन आल्यानंतर त्यांनी गलिच्छ भाषेत शिवीगाळ करून  लाथाबुक्यांनी मारहाण सुरू केली. तर आरोपी बाळु कचरू सदगीर व आदीत्य बाळु  सदगीर या दोघांनी या समाजसेवकास काठ्यांनी मारहाण केली. तर इतर लोकांनी  दगड फेकुन मारले. 
                          जर आमच्या नादाला लागाल तर जीवे मारुन टाकू अशी धमकी दिली. हा प्रकार गावातील पोलीस पाटील किसन कारभारी सदगीर शंकर दगडु सदगीर, बाळु रामकृष्ण सदगीर, सुदाम रामभाऊ सदगीर व समाजसेवकाची पत्नी अनिता बाळु  सदगीर यांना समजताच हे सर्वजण हा वाद सोडविण्यासाठी पुढे सरसावले. यात अनिता बाळु  सदगीर आरोपी ऋषीकेष देवराम सदगीर, बाळु कचरू सदगीर व पुष्पा  देवराम सदगीर यांनी अनिता (माजी सरपंच, मुथाळणे) हीस काठी व लाथाबुक्यांने मारहाण केली. या दरम्यान अनिता यांचे गळ्यातील अर्धा तोळा वजनाचे मंगळसुत्र मारहाणीत तुटुन गहाळ झाले आहे. या घटनेनंतर गावातील सुज्ञ लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेताच आरोपींनी तेथून पळ काढला. या घटनेत समाजसेवक सदगीर हे रक्तभंबाळ झशले होतेे. त्यांच्या डोक्याला, हाताला गंभीर दुखापत झाली असून शरीरास मुक्का  मार लागला आहे.

वेळेला कोणी मदतीला येत नाही.!
  होय.! वाचायला व एकायला थोडं वाईट वाटेल. पण, सदगीर जे काम करीत होते. ते एक प्रकारे सामाजिकच होते. गावाच्या आणि तालुक्याच्या हितासाठी त्यांनी होमक्वारंटाईन असलेल्यांना समजून सांगितले. त्यात गैर काय होते. विशेष म्हणजे हे या हिंडफिर्‍यांबाबत या समाजसेवकाने प्रशासनालला माहिती दिली होती. मात्र, प्रशासकीय यंत्रणेने त्याकडे शुन्यटक्के लक्ष दिले. अखेर झाले काय? आज या सदगीर यांचा जीव गेला असता. कोणाचे काय गेले असते? त्यामुळे, प्रशासनाने खरच या गोष्टीला गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. विशेषत: एसपी साहेब, डिवायएसपी, अकोले तहसिलदार किंवा पीआय साहेबांनी सदसद विवेकाने विचार करावा. अन्यथा अकोल्यात महात्मा फुले चौकात रोज काही समाजसेवक रात्ररात्र तालुक्याचे रक्षण करतात. त्यांच्यावर काही बला आली तरी देखील प्रशासन असेच हात वर करेल का? त्यामुळे, एका सजग नागरिकाला त्याच्या सजगतेची ही शिक्षा मिळत असेल तर शासनाच्या आवाहनाला किती गांभिर्याने घ्यायचे. यावर नागरिक विचार करतील.