लॉकडाऊनमुळे बेवडे अस्वस्थ.! मद्यासाठी फोडले दारुचे दुकान, 1 लाख 12 हजारांचा मुद्देमाल चोरला...


संगमनेर (प्रतिनिधी) : 
                                मानसांच्या मुलभूत गरजा आता चार राहिल्या नाही. तर अन्न वस्त्र, निवारा व शिक्षण यांच्यासह दारु देखील जीवनावश्यक बनली आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. कारण, मुंबईत एक सरकारी कर्मचार्‍याने दारुचे दुकान तासभरासाठी उघडे करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे. तर दुसरीकडे संगमनेर सारख्या ठिकाणी मद्यपी दारुचे दुकान फोडून पैशांच्या गल्ल्याला हात न लावता लाखभर रुपयांची दारु चोरून नेली जाते. त्यामुळे, या समाज व्यवस्थेचे डोके ठिकाण्यावर आहे काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर कोरोनाने ग्रासले असताना प्रशासन मात्र या संकटाशी रस्त्यावर उतरून दोन हात केल्याचे पहायला मिळत आहे. एकीकडे कोरना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन दिवस रात्र एक करत आहे. तर दुसरीकडे संधीचा फायदा घेत काही चोरट्यांनी डोके वर काढले आहे. संगमनेर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कसारा दुमाला(कासारवाडी) शिवारात आज्ञात चोरट्याने तब्बल 1 लाख 11 हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून पोबारा केला आहे. या प्रकरणी दुकान मालक संदिप महादू डोंगरे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात चोरांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती कळताच संगमनेर पोलीस उपविभागीय अधिकारी रोशन पंडीत व पो.नि. अभय परमार तसेच सह.पो.नि साबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली आहे. दरम्यान कसारा दुमाला येथे फिर्यादी संदीप महादु डोंगरे वय 35 वर्षे  संगमनेर यांचे मालकीचे शासन मान्य देशी दारूचे दुकान आहे. देशात संपुर्ण लॉकडाऊन असल्या कारणाने दुकान दि.19 मार्च 2020 रोजी सायंकाळी 06 वाजता बंद करण्यात आले. पुढील शासन आदेश प्राप्त होईपर्यंत हे दुकान बंद अवस्थेत होते मात्र,
           दरम्यानच्या या काळात दि. 6 एप्रिल रोजी 12:30 वा. दुकानाकडे फेर-फटका मारण्यासाठी गेले असता त्यांच्या असे निदर्शनास आले की, दुकानाच्या शेटरचे कुलुप काही अज्ञात व्यक्तींनी तोडून टाकलेल्या अवस्थेत पहायला मिळाले. दुकानात आत प्रवेश केल्यानंतर मालाकडे पाहिले असता त्यांचे दुकानातील बॉबी, संत्रा, टँगो व्होल्का या कंपनीचे देशी दारूचे एक लाख आकरा हजार आठशे रुपये किमतीचे 48 बॉक्स गायब झाल्याचे निदर्शनास आले. हे लक्षात येताच. त्यांनी संगमनेर शहरात तीन दिवसीय संपूर्ण लॉकडाऊन असल्याने दि.07. एप्रिल 2020 रोजी उशीराने संगमनेर शहर पो.स्टेशन ला भा.द.वि. कलम 454,457 आणी 380 प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास स, पो,नि. साबळे करीत आहेत.
सुशांत पावसे

============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे 22 लाख वाचक)