दारं लावून बसलेल्या लोकप्रतिनिधींना बाहेर काढा.!, जनता आक्रमक, प्रशासनाचे आभार.!



जनता गेली खाड्डयात, खुर्ची द्या फक्त.!

अकोले (प्रतिनिधी) :-राज्यात कोरोनाने थैमान घातलेले असताना काही ठिकाणचे आमदार, खासदार व नगरसेवक कोठे दडून बसलेत हे कळायला तयार नाही. निवडणुकीच्या काळात सामान्य जनतेचे उंबरे झिजविणारे लोकप्रतिनिधी आता स्वत:च्या हवेलीचे दरवाजे बंद करुन घरात बसले आहेत. निवडून द्या असे म्हणत हे समाजद्रोही लाखो रुपयांची उधळपट्टी करतात. आपल्या शाळकरी मुलांच्या घशात दारु ढोसतात. पण, आज सामान्य जनता दोन वेळच्या अन्नासाठी त्रस्त झाली असून त्यांच्यासाठी मास्क कोणी द्यायला तयार नाहीत.

 पोटाची खळगी भरविण्यासाठी कोणी शिळ्या भाकरीचा तुकडा टाकायला तयार नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल.! पण, यांच्या दारात बांधलेल्या कुत्र्याची यांना आत्मियतेने काळजी वाटते पण वार्ड आणि प्रभागात अन्नावाचून तडफडणारे झोपडीतले नागरिक यांना दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे, नागरिकांना.! लक्षात ठेवा हे स्वार्थी लोकं, जे निवडणुकीच्या काळात पुन्हा तुमच्या वाडी वस्तीवर तोंड घेऊन येणार आहेत.

हम सलामत तो इलेक्शन पचास.!

 तेव्हा, आज पोलिसांच्या हातातील काठ्या उद्या तुमच्या हातात ठेवाव्या लागणार आहे. तर तुम्ही कोरोनाच्या काळात आमच्यासाठी काय केले ? याचे उत्तर त्यांच्याकडे नसेल तर त्यावेळी पायातल्या चपला त्यांच्या तोंडात मारायला विसरु नका. कारण, लोकप्रतिनिधी हे पांढरे कपडे घालून फिरण्यासाठी नसतो तर वेळप्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालतो व जनतेच्या विश्वासास पत्र ठरतो. तो खरा जनसेवक. अन्यथा हे बगळे काय कामाचे ? अर्थात राज्यासह संगमनेर व अकोल्यात लोकप्रतिनिधींच्या बेजबाबदार पणाचा कळस कमी नाही. संगमनेर तालुक्यात ना. थोरात साहेबांनी नको ती लोकं अगदी नको तशी पोसून ठेवली आहेत. मालमत्ता पाहिली तर सात पिढ्या बसून खातील. पण, दोन रुपयांचे मदत किंवा दान करायची दानत त्यांच्यात नाही. पण काही नगरसेवक मात्र सामाजिक भान ठेऊन ते पुढे आलेत आहेत. त्यांचे तर कौतुकच आहे. पण जे दारं खिडक्या लावून बसले आहेत, त्यांना जनतेने लक्षात ठेवावं. सद्या इतकेच.! अकोले तालुक्यात तर फार भयानक परिस्थिती आहे. नगरसेवक म्हणून अनेकजण मिरवतात खरे पण कर्तुत्व मात्र शुन्य आहे. नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांची शासकीय जबाबदारी वगळली तर नगरसेवकांचे काम काय ? असा प्रश्न विचारला तर नागरिक तोंडात बोटे घालून भुवया वर करतील. नामदेव पिचड, बाळासाहेब वडजे व परसराम शेळके हेच व्यक्ती मोठ्या कसोशीने रस्त्यावर फिरतात. जणू सगळ्या नगरपंचायतीची जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर आहे. त्यांनी पळायचं तरी किती? बाकीचे नाही नगरसेवक देखील जनतेत जातात, काही सामाजिक भान ठेऊन उपक्रम राबवितात. पण, काही लोकप्रतिनिधी सावकारी धंद्यातून रग्गड पैसा कमवून केवळ आपण एक समाजसेवक आहोत असा आव आणतात. झालं, नगराध्यक्ष तर कोठे दिसेनासे झाले आहेत. त्यांची भेट आमच्यासारख्या पत्रकारांना अगदी दुर्मिळ झाली असून सामान्य जनतेचा तर प्रश्नच उरत नाही. तेव्हा जनतेचे आरोग्य व आजच्या पडत्या काळातील गरजू व्यक्तींच्या भेटीगाठी घेणे म्हणजे वाळवंटात पाण्याचा थेंब सापडल्यासारखे आहे.




दोन हाणा पण पुढारी म्हणा.!

अकोले तालुक्याच्या पंचायत समितीत देखील असे व्यक्ती बसविले आहेत की, त्यांनाच कळत नाही की आपण येथे येऊन काय करतोय. अधिकारी हे जनतेचे सेवक असतात, त्यांच्याकडून काम करुन घ्यायचे असते, आपण देखील लोकशाहीने बहाल केलेल्या खुर्चीत बसायचे असते. लोकांच्या समस्या सोडवायच्या असतात. त्यांच्यासाठी उपलब्ध व्हायचे असते. याचा त्यांना विसरच पडला आहे. त्यामुळे, आज अकोल्याच्या सजग नागरिकांनी जनतेला प्रथमत: विनंती केली आहे. की, ज्यांना समाजाविषयी आत्मियता असेल. त्यांचा वेळ समाजासाठी देण्याची मानसिकता असेल अशाच अभ्यासू व्यक्तींना आपण येणाऱ्या काळाल निवडून द्या. अन्यथा, हा खुर्चीला भार कशासाठी? असे मत आज जनतेतील सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.





या कर्तुत्वापुढे कोरोनाही झुकला.!
खरंतर तालुक्याचे तहसिलदार मुकेश कांबळे साहेब व पोलीस निरिक्षक आरविंद जोंधळे साहेब यांचे मानावे तितके आभार कमीच आहे. यांनी दिवरात्र मेहनत करुन तालुक्याला कोरोना विरहित आरोग्य बहाल केले आहे. म्हणून अकोलेकर सुरक्षित आहेत. अन्यथा, या नगरपंचायतीच्या भरवशावर कोरोनाशी युद्धा.! बाप रे.! कल्पना करण्यापुर्वीच श्वास थांबून जातो. खरंतर एक सजग नगरसेविका म्हणून स्वातीताई शेणकर यांनी सर्व प्रशासनाचे आभार मानले. पण, कोणाची हिंमत झाली नाही कौतूक करण्याची. किती मोठे दुर्दैव आहेे हे.


एक गोष्ट तुम्हाला आश्चर्याची वाटेल. की, एक सामाजिक भान म्हणून संदिप शेणकर व नितीन नाईकवाडी हे दोघे एकमेकांचे राजकीय कट्टर प्रतिस्पर्धी. पण, तालुक्यातील जनतेच्या हितासाठी एकत्र आले आहेत. रोज १० ते १२ गावे ते स्वखर्चाने व स्वत:च्या गाडीने फिरत आहेत. जे पदाला व खुर्चीला कवटाळून बसले आहेत. त्यांनी जीवाची भिती आहे व ज्यांच्या पदरी जनतेने पराभव टाकला ते स्वत:ची जीव धोक्यात घालून गोवोगावी फिरत आहेत. किती मोठे उदात्त अंत:करण व निष्फळ अपेक्षेने केलेली समाजसेवा म्हणायची ही. असे अनेक लोक आज कोरोनाला तालुक्यात येण्यापासून परावृत्त करीत आहेत. त्या सर्व समाजसेवकांना रोखठोक सार्वभौमचा मानाचा मुजरा व ज्यांनी तोतया समाजसेवेचे बुरखे परिधान केले आहेत. त्यांच्यासाठी वाचा भाग २.!!


सागर शिंदे

============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे १९ लाख वाचक)