अकोल्यातील नागरिकांना दारू पाहिजे? फोन करा, घरपोच सेवा.! फक्त खिशात नोट अन तोंडावर बोट.!
घरपोहच डिलेवरी, वढ पचची.! |
अकोले (प्रतिनिधी) :-
जगात कोरानाचे जीवघेणे संकट उभे असतांना देश त्यावर मात करण्यासाठी झुंजत आहे. राज्यात हा आकडा दोनशेच्या जवळ गेला असून आपल्या जिल्ह्यात सहा जणांना या विषाणुने बाधित केले आहे. अशा परिस्थितीत काही सामाजकंठक लोक पैसा कमविण्याच्या नादात देशाला विकू पहात आहेत. त्यांचे हे कृत्य अक्षम्य असून देशातील नागरिक संकटात असतांना अकोल्यात देशी विदेशी दारुसह बनावट दारु व गांजा विक्रि जोरात सुरू असल्याचे दिसत आहेे. तुम्हाला आश्चर्य वाटेल.! पण, हे काही बार, दुकाने व हातभट्ट्यांवाले ग्राहकांकडून अवाजवी रक्कम घेऊन घरपोच दारु पोहच करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
अकोले तालुक्यात सद्या 11 हजार 580 नागरिक होमक्वारंटाईन आहेत. त्यांच्यावर शासनाची कडी नजर असल्याचे बोलले जाते. मात्र, मुंबई पुण्याहुन गावाकडे आलेले हौशे-नौशे-गौशे हे घरात बसतील ती शिष्ट कसले. त्यांना मासे, मटनं आणि दारुशीवाय करमेल तरी कसे! आणि हो.! त्यांनाच काय नाव ठेवता, तालुक्यातील चांगले-चांगले पुढारलेले लोक सकाळ-दुपार आणि संध्याकाळ चांगलेच तरर्र हाताना दिसत आहे.आता तुम्हाला सहज प्रश्न पडला असेल. सगळा देश बंद आहे आणि हे दारु कोठून आणत असतील? पण, अकोले तालुका तुम्हाला वाटतो तितका सोपा नाही. येथील काही निवडक लोकांना बार बालक कामाला ठेवले आहेत. तुम्हाला त्यांच्याकडे पाहुन जरा देखील कल्पना येणार नाही. की, यांच्याकडे दारुचा साठा आहे आणि ते डिलेवरी घरपोच करण्यासाठी निघाले आहेत. अर्थात स्थानिक पोलिसांकडून फाच चांगला बंदोबस्त तालुक्यात आहे. मात्र, जुनी ओळख असल्याने साहेबांना सहज हात करायचा आणि पुढे निघायचे. बिचारे पोलीस 24 तास उभे राहून थकून गेले आहेत. मात्र, राज्य उत्पादन शुल्क कोणत्या लढाईवर गेले आहे. याचा शोध घेणा गरजेचे आहे.
गेल्या दोन दिवसांपुर्वी एक वृत्तवाहीनिवर दारु संदर्भात रेटची पोलखोल करण्यात आली होती. मात्र, त्यावर प्रशासनाने काय दखल घेतली देव जाणे. काल 125 रुपयांची दारुबाटली आज 400 रुपयांनी जाते किंवा 400 रुपयांचा दारू खंबा चक्क 1200 शे रुपयांनी विकला जातो. ही किती मोठी लुट म्हणायची. एकीकडे आदिवासी भागात दोन वेळचे अन्न खाण्याची पंचायत आदिवासी समाजास पडली आहे. घरात तोडके पैसे असून ते दारुपाई खर्च केले जात होता. अशी भयानक परिस्थिती असताना राजुरमधील एकमेव डिलर असणार्या शर्मनाक प्रकारावर राजूर पोलिसांनी प्रकाश टाकला आणि मोठा साठा जप्त करून उत्तम कामगिरी केली. अशाच प्रकारच्या कारवाया सद्या अपेक्षीत आहे.
मानसाला तर्रर करणारी अत्यावश्यक सेवा.! |
सागर शिंदे
============
"सार्वभाैम संपादक"
सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे १९ लाख वाचक)