खाकी वर्दी घालून शिक्षकांचे कोरोनाशी दांड्याने युद्ध!, आरएसपी संकल्पनेत अकोले व संगमनेर अग्रेसर

भाऊ कुठे बिनकामाचे चाललात?

विशेष लेख :-

                    जेव्हा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे! हे वाक्य तुम्हाला आता नवे नाही. त्यामुळे पहिली एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. क्षेत्र कोणतेही असो, दुसर्‍यांना नावे ठेवताना आपण हजारदा विचार केला पाहिजे. भारत माझा देश आहे. असे आपण गर्वाने म्हणतो. पण त्या देशासाठी आपण काय केले हे विचारले तर त्याचे उत्तर सापडता सापडत नाही. म्हणून हे मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी सन 1983 साली सातारा जिल्ह्यातून आर.एस.पी (वाहतुक सुरक्षा व नागरी संरक्षण) ही संकल्पना शिक्षकी पेशातून पुढे आली. आज तुम्हाला आश्चर्य वाटेल! की कोरोना रोगाच्या भितीपोटी भलेभले अधिकारी घरात दडून बसलेले आहेत. मात्र, अशा परिस्थितीत अकोले सारख्या दुर्गम भागात काही शिक्षक अंगावर खाकी वर्दी चढवून रस्त्यावर उभे आहेत. केवळ एक सामाजिक भान व पोलीस दलाला सहाय्य म्हणून. तुम्हाला ओळखू देखील येणार नाही. पण संगमनेर व अकोल्यात तब्बल 25 शिक्षक तळहातवर जीव घेवून व खांद्यावर थ्री स्टार लावून देशाच्या सेवेत उभे आहेत. अशा शिक्षकांना एक सॉल्युट.! 

          आजवर आपले आयुष्य पोलिसांना नावे ठेवण्यात गेले आहे. मात्र, एक सजग नागरिक म्हणून तुम्ही तुमची जबाबदारी किती पार पाडली? असा प्रश्न केला की चांगल्या-चांगल्या विचारवंतांची बोलती बंद होते. पण, तुम्हाला एक गोष्ट कौतुकाने सांगाविशी वाटते की, जे शिक्षक देशाचे सुज्ञ नागरिक घडवितात तेच शिक्षक आज आर.एस.पीच्या माध्यमातून पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उभे आहेत. कोरोनाशी युद्ध सुरू असताना पोलिसांना रोज जगण्यासाठी सामना करावा लागत आहे. पहिले दोन दिवस जनतेला समजून सांगून त्यांना गोडी गुलामीची भाषा कोणाला समजली नाही. त्यामुळे, त्यांच्यातील देव जागा झाला आणि त्यांनी प्रसाद देणे सुरू केले. 
          जनतेत त्यांचे कौतुक झाले तर कोठे त्यांच्यावर टिकांचा वर्षाव झाला. पण हे सर्व कशासाठी व कोणासाठी चालु आहे, याचे भान कोणाला राहिले नाही. पण, हे एका बाजुचे वास्तव असले तरी दुसर्‍या बाजुचे चित्र पाहिले तर लक्षात आले की, काही निवडक व तरुण पोलिसांच्या अंगातील रग थेट निष्पाप नागरिकांच्या मांड्या-पोटर्‍यांवर निघाली. काही ठिकाणी टिकटॉक व्हिडिओसाठी स्टण्टबाजी झाली तर काही ठिकाणी सोशल मीडियावर हिरो होण्यासाठी काठ्या अमानुषपणे उठल्या गेल्या. पण, समोरचे मानसे आहेत. हे वर्दीतील नवाट गडी विसरुन गेले. अर्थातच अगदी बोटावर मोजण्याइतक्या पोलिसांमुळे आख्खी खाकी बदनाम होऊन टिकेचा धनी ठरली. अखेर पोलीस अधिक्षक सागर पाटील यांना तत्काळ वायरलेस करावा लागला. या सर्व परिस्थितीत जिल्ह्यातील आर.एस.पी पोलीस मात्र फार संवेदनशिलपणे काम करतांना दिसून आले. वाहनांची तपासणी, नागरिकांची विचारपूस, समजून सांगणे असे सुंदर नियोजन व समन्वय त्यांच्यात पहावयास मिळाला.

कोठून आलात! कोठे निघालात?

  तसेतर नगर जिल्ह्याला चार महिन्यांपासून पोलीस अधिक्षक नाहीत. अशा परिस्थितीत अप्पर पोलीस अधिक्षक सागर पाटील यांनी अद्याप कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिला नाही. पोलीस बळ कोठे कमी पडायला नको त्यासाठी स्वयंसेवी व्यक्तींना त्यांनी पुढाकार दिला.
पोलीस उपअधिक्षक रोशन पंडीत व सहायक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी यांनी आर.एस.पी सारख्या दलास पाचारण करुन त्यांना प्रशिक्षित केले. त्यामुळे जिल्ह्याला 25 पोलीस अधिकरी आर.एस.पीच्या रुपाने मिळाले. आमचे जीवन सेवेसाठी हे ब्रीद अंगी बाळगून हे स्वयंसेवक अंगावर खाकी चढवून आज रस्त्यावर उतरले आहेत. त्यात संजराज बोतले. कौलास कानवडे, बी.के.वैद्य, आर. एस कासार, डी.बी. घुले, एस. एल. साळुके यांच्यासह प्रत्येक खाकीतल्या शिक्षकांना व खर्‍या पो जिद्दीला व देशसेवेला मनस्वी रोखठोक सार्वभौमचा मानाचा मुजरा.


मॅडम, आम्ही देखील माणूसच आहोत ना!
केंद्रीय मंत्री निर्मला सितारमन यांनी कोरोना संदर्भात निधी जाहिर केला आहे. त्यात आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांचा पगार व 50 लाख रुपयांचा सरसकट विमा काढला आहे. अर्थात हे निर्णयाचे कौतुकच आहे. मात्र, पोलीस यंत्रणा देखील 24 तास रस्त्यावर उभी आहे. त्यांना देखील हा नियम का लागू करु नये. ते माणूस नाहीत का? त्यामुळे, शासनाने या मागणीकडे संवेदनशील भावनेने हताळले पाहिजे. अन्यथा करुन सवरुन नाव ना उपकार अशीच कैफीयत पोलिसांची होत आहे. अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

त्यांची देशसेवा आमच्या बरोबरीने..!
एकीकडे पोलीस समाज हितासाठी रस्त्यावर उतरत आहे. तर दुसरीकडे काही नागरिक स्वयंप्रेरणेने आम्हाला मदत म्हणून रस्त्यावर उतरत आहे. आर.एस.पी ही त्यातलीच एक संकल्पना आहे. पोलीस अधिक्षक सागर पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक काळे, पोलीस उपअधिक्षक रोशन पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात शिक्षकी पेशातील 30 अधिकारी खात्याशी संलग्न करण्यात आले आहे. हे प्रशिक्षित व्यक्ती असून प्रतिष्ठीत आहेत. त्यांना पोलीस खाते व वाहतुक नियमांची माहिती व्हावी व त्याचा विनियोग विद्यार्थ्यांना व्हावा ही महत्वाची संकल्पाना आहे. मात्र, हे शिक्षक देशावर कोरानाचे जीवघेणे संकट असून देखील आम्हा पोलिसांच्या बरोबरीने देशसेवा करीत आहेत. त्याचे करावे तितके कौतुक कमीच आहे.
             - पप्पू कादरी (सहायक पोलीस निरीक्षक)

सागर शिंदे

8888782010
============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे १९ लाख वाचक)