अकोले व संगमनेर तालुक्यात 16 हजार 728 संशयीत होमक्वारंटाईन


अकोले/संगमनेर

जगात कोरोना विषाणुने थौमान घातले असतांना महाराष्ट्रात त्याची लस पसरली असून रुग्णांची संख्या 185 च्या पुढे गेली आहे. त्यात दुदैवाने नगर जिल्ह्यात पाच नागरिकांना याची लागण झाली असून सुदैवाने अकोले व संगमनेर हे दोन्ही तालुके प्रशासनाच्या सतर्कतेमुळे सेफ असल्याचे दिसत आहे. असे असले तरी स्थानिक अधिकार्‍यांनी महाभयंकर युद्धाला तोंड देताना कोठेही कुचराई केल्याचे दिसत नाही. दोन्ही तालुक्यात अद्याप एक देखील रुग्ण आढळून आला नसला तरी परदेशी वारी केलेल्या 79 नागरिकांवर आरोग्य अधिकार्‍यांचे बारीक लक्ष असल्याचे दिसते आहे. तर, दोन्ही तालुक्यात देशी, परदेशी व जिल्हा बदलून आलेल्या 16 हजार 728 संशयीतांना प्रशासनाने होमक्वारंटाईनमध्ये ठेवले आहे. मात्र, तालुक्यातील जनतेने घाबरण्याचे कोणतेही कारण नसून प्रत्येकाने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संगमनेर तालुका आर्थिक दृष्ट्या सदन असल्यामुळे तेथून बहुतांशी नागरिक व विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी परराज्यात गेल्याचे लक्षात येते. मात्र, जसे कोरोनाचे संकट उभे राहिले तसे या स्थानिकांना आपापल्या गावाकडे पळ काढला. हे तालुक्यात दाखल झाले आणि यांच्यामागे प्रशासनाचे ससेमीरे लागले. असे 65 संशयीत नागरिक प्रशासनाने प्रथम अजेंड्यावर घेतले आहेत. तर संगमनेरला दोन जिल्ह्यांच्या सिमारेषा असल्यामुळे तेथून बाहेर जाणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अशा 4 हजार 736 नागरिकांवर प्रशासनाचा सीसीटिव्ही लागला आहे.
               इतकेच काय! कोरोनाला घाबरुन जावई, मामा, भाचे, काका, मामा यांनी गाव सोडून सेफ जागेचा शोध घेतला असे 133 अन्य नागरिकांना देखील होमक्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. सद्या तालुक्यात कोणतीही भयानक स्थिती नाही. तरी देखील एक खबरदारी म्हणून 65 व्यक्तींना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. मात्र, त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. अर्थात संगमनेर तालुक्यात एकूण 5 हजार 148 नागरिकांना होमक्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकार्‍यांनी दिली आहे.
तर अकोले तालुक्यात बाहेरुन आलेल्या 11 हजार 580 नागरिकांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. या तालुक्यात 14 व्यक्ती परदेशी वारी करुन आले असून 35 व्यक्ती राज्याबाहेरुन आलेल्या आहेत. सद्या 2 हजार 751 जणांवर होमक्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला आहे. तर उरलेल्या 8 हजार 829 नागरिकांच्या हातावर शिक्के मारणे बाकी आहे. तालुक्यातून जे 14 व्यक्ती बाहेरुन आले होते. त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. मात्र, त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. 
                  या संकटाशी लढण्यासाठी प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, पोलीस उपाधिक्षक रोशन पंडीत, तहसिलदार मुकेश कांबळे, अमोल निकम, मुख्याधिकारी सचिनकुमार पटेल, सचिन बांगर, आरोग्य अधिकारी, डॉ. भवर, डॉ. संदिप कचोरीया, डॉ. सुरेश घोलप, डॉ. इंद्रजित गंभीरे, डॉ. म्हस्के, पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे, अभय परमार, पप्पू कादरी, नितीन पाटील यांच्यासह अन्य पोलीस यंत्रणा सक्षमपणे कार्यरत असून काही सामाजिक संघटना कार्यरत आहे. त्यांच्या रोखठोक सार्वभौमकडून आभार.


तर आता गुन्हा दाखल करु...!
अकोले व संगमनेर तालुक्यात आरोग्य यंत्रणा सक्षम पद्धतीने काम करीत आहे. होमक्वारंटाईन असलेल्या व्यक्तीना दिवसातून दोन ते तीन वेळा तपासले जाते. काही अधिकार ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. कृपया अनेकदा काही अफवा पसरतात. त्यामुळे समाज वेठीस धरला जातो. त्यामुळे कोणी अफवांवर विश्वास ठेऊ नका. स्वत:ची काळजी घ्या. ज्यांना होमक्वारंटाईन करुन हातावर शिक्के मारले आहेत. त्यांनी घरात बसण्याचे सहकार्य करावे. अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल.

सुशांत पावसे
 सागर शिंदे
============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे १९ लाख वाचक)