आठ दिवसात आरोपी पाहिजेच.! चित्रा वाघ यांचा पोलिसांना अल्टिमेट.!
अकोले (प्रतिनिधी) :-
अकोले तालुक्यात घडलेली घटना अतीशय मन सुन्न करणारी आहे. एकीकडे देश महिलांचा सन्मान करीत असतांना दुसरीकडे अकोल्यात अशा प्रकारच्या निघृण घटना घडत आहे. हे किती दुर्दैव आहे. याला पुरोगामी म्हणता येईल का ? एखादी स्री उभे राहण्याचा प्रयत्न करीत असतांना ती कर्जासाठी बँकेत जाते व तिच्याकडे शरिर सुखाची मागणी करतात. हे एकायला देखील किती भयानक वाटते. राज्याचे मुख्यमंत्री महिला सबलिकणाचा विषय काढतात, रॉली काढतात पण वास्तव काय आहे.? हे त्यांनी पहावं. अकोल्यात जी घटना घडली त्याची कृरता मुख्यमंत्र्यांना नाही का ? तालुक्यात किती गुन्हे दडपले जाणार आहेत ? यापुर्वी वेदांत देशमुख प्रकरण अनडिटेक्ट राहिले. त्याचा उलगडा झाला पाहिजे.
मुख्यमंत्री म्हणतात महिला सुरक्षेसाठी आम्ही ठोस पाऊले उचलणार आहोत. पण कधी ? अणखी किती महिलांचे जीव घ्यायचे आहे.? गाव पातळीवर अवैध धंद्यांना उत आला आहे. सातारा, नदीकाठ या परिसरात येथे राजरोस दारु, गांजा पितात. त्यावर उपाय काय करणार आहे ? यांनीच हा प्रकार केला तर नसावा ना ? त्यामुळे प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. तालुक्यात आदिवासी महिलांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत आहे. त्यावर प्रतिबंध घातला पाहिजे. या प्रकरणात सखोल तपास व्हावा, आरोपींना तत्काळ अटक करा, हा गुन्हा फास्ट्रॅक न्यायालयात चालवा. असे न झाल्यास अकोले तालुक्यात वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायासाठी मोठा संघर्ष उभा केला जाईल असे मत चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
दरम्यान ताईंनी पीडित मुलीच्या कुटुंबाला भेट दिली. पोलीस उपअधिक्षक पंडीत, एलसीबी पीआय दिलीप पवार, स्थानिक पीआय आदविंद जोंधळे यांच्याशी त्यांनी तपासा बाबत चर्चा केली.
यावेळी माजी आ. वैभव पिचड, जालिंदर वाकचौरे, शिवाजी धुमाळ, यशवंतराव आभाळे, गिरजाजी जाधव, सोनालीताई नाईकवाडी, चेतन नाईकवाडी, बाळासाहेब वडजे, परसराम शेळके, राहुल देशमुख, संगितताई शेटे, सिताराम भांगरे, भाऊसाहेब वाकचौरे, आबासाहेब मंडलिक यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.