"मित्राचा "घात" केला, मदत करणाऱ्याचा "जीव" गेला, अन् घुलेवाडीचा "मास्टरमाईंड जेरबंद" झाला. ही "सिने स्टाईल" स्टोरी घडली संगमनेरात.!

             
संगमनेर :-
              पैशाच्या हव्यासापोटी कोण कोणत्या थराला जाईल हे काही सांगता येत नाही. याचा प्रत्येय पुन्हा संगमनेरात आला. काल-परवा दुसऱ्यांदा लुटलेल्या ज्ञानेश्वर चिंतामणी यांचा मित्र गणेश गायकवाड याने चक्क पैशापोटी, आपण ज्या दुकानात बसतो, ज्याची मदत घेतो, जो आपल्या कामासाठी धावून येतो, पडत्या काळात साथ देतो अशा मित्राला लुटण्याची विकृत योजना आखली. त्यास मदत म्हणून ज्याच्यावर राज्यभर नऊ गुन्हे दाखल आहेत. अशा अविनाश मारकेला सामिल करुन प्लॅन सक्सेस करतो. हा सर्व प्रकार म्हणजे गुन्हेगारीतील सराईत बेधुंदशाही असल्याचे दिसून येते. आता या सगळ्यात दरोडेखोरांचा खेळ झाला आणि निष्पाप शर्माचा जीव गेला. हेच सगळ्यांच्या जिवाला चटका लावून जाते. त्यामुळे, एखाद्या अडल्या-नडलेल्याला  मदत करणे याचे फळ जर अंत असेल.! तर, या निर्ढावलेल्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. कारण, लाखभर चांदीपाई या आरोपींनी सोन्यासारख्या तरुण मुलाचा जीव घेतला या असल्या गुन्हेगारीला थारा नसावा. असेच वाटू लागले आहे.  अन्यथा जगण्यातून मानुसकी संपून जाईल.....
               
   त्याचे झाले असे की; चिंतामणी यांची यत्किंचिंतही चिंता नसलेला मित्र म्हणजे गणेश. फिर्यादीचे नाव ज्ञानेश्वर आणि आरोपीचे नाव गणेश आहे. या देवासारख्या नावांमध्ये अविनाश.! म्हणजे ज्याचा कधीही "विनाश" होऊ शकत नाही. त्याचा "अचानक अंत" झाला. किती दुर्दैव आहे. हेच नितीमत्तेचे "समाधान" आहे का ? काहीच कळायला तयार नाही. खरंतर निंदकाचे घर असावे शेजारी हे आपण ऐकले असेल, पण घातकाचे घर असावे शेजारी हे कानाला एकायला जड वाटेल. पण, मारकेच्या घरात हा प्लॅन झिजावा आणि त्याची आठ दिवसांपासून रंगित तालीम सुरु व्हावी. या पैशाच्या हव्यासापोटी मदतगार निरापराधाचा बळी जावा. या घटनेईतकी दुर्दैवी घटना नाही. खरंतर ही संकल्पना गणेशची आणि यातील मास्टरमाईंड मारके, तर अंमलबजावणी करणारे परके मित्र. कट शिजला पण, हजम झाला नाही. होणार तरी कसा ?
            ज्या नगर जिल्ह्यात चार एसपींना सलामी देऊन चारशेपेक्षा जास्त सराईत गुन्हेगारांना पाणी पाजणारे दिलीप पवार अद्याप एलसीबीत ठाण मांडून असतांना बिशाद कोणाची.! हाणून-मारुन, लुटून पळ काढायची.? त्यामुळे, त्यांनी अवघ्या चार दिवसात आरोपी एसपींच्या दालनात आडवे पाडले. आता सराफाला त्याचा मुद्देमाल परत मिळेल, आरोपींना कालातराने जामिनही पण अविनाश परत येऊ शकणार नाही. यासाठीच प्रतिबंधात्मक कारवाया, पोलीस पेट्रोलिंग, नाकाबंदी, बीट मार्शल, वेगवेगळ्या गस्त आवश्यक आहेत. पण, दुर्दैव असे की, अप्पर पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांची बदली झाली आणि त्यानंतर जिल्ह्याला नाकाबंदी व सेक्टर पेट्रोलिंग हा प्रकार नामशेष व केवळ कागदावर राहिला. अन्यथा असे प्रॉपर काम झाले असते. तर, कशाला निष्पाप मुलाचा बळी गेला नसता.
               
      आपण लहानपणी चोर पोलिसांचा खेळ खेळलोय आणि चित्रपटात पाहिलाय. चोर नक्कीच चलाख असतात. पण, पोलीसांच्या बुद्धीमत्तेपुढे कमीच.! दुर्दैव इतकेच की, घटना घडून जाते आणि मग पोलीस तेथे पोहचतात, वेळ निघून जाते आणि मग ते नोटीसा बजावतात. हे आजकाल नवे राहिले नाही.  या घटनेत देखील चिंतामणी यांच्यावर किती पाळत ठेवण्यात आली. ते दुकानात कधी येतात, ते घरी कधी जातात हे इतीवृत्त लुटारुंना माहित आहे. एक मित्र म्हणून गणेश त्यांच्याकडे जातो काय.! दुकान बंद कधी करणार हे विचारतो काय.! त्यानंतर सराफ दुकान बंद करतो काय आणि घराकडे निघतो काय.! त्यांचे लोकेशन सहआरोपींना देतो काय आणि त्यास लुटतात काय.! हे किती सहज आणि सोपे आहे. ते फक्त एकण्यासाठी आणि सराईतांसाठी. बाकी, ज्या पोलीसांनी दिवसरात्र एक करुन संशयीतांच्या अगदी तिळ-तिळ हलचाली टिपून या घटनेची उकल केली. त्यांना याची किंमत अगदी काहीही चुकवावी लागली असती. पण, तरी जीवावर उदार होऊन ते आरोपींवर फासे टाकतात.
          या सर्वांमध्ये एक गोष्ट अनदेखी करुन चालणार नाही. कारण, दिपक कोळेकर, भरत पाटील, समाधान गोडसे यांनी स्वार्थापोटी दरोड्याचा चंग बांधला खरा. पण, जेव्हा सराफाचा पाटलाग सुरु केला तेव्हा ते अगदी घरापर्यंत पोहचले. सराफाची गाडी थांबली आणि चौघांनी थेट रॉडने काचेवर वार केला. सराफाला लोटून देत चांदीची बॅग घेतली. तेथीन पळ काढणार तोच सराफाच्या मदतीस धावलेल्या तिघांवर अविनाश मारके याने गोळी झाडली. ती मांडीतून थेट लिव्हरपर्यंत गेली आणि दुचाकी उलटी-पालटी पडली. गोळीबाराच्या आवाजाने अन्य दोघांना पळता भुई थोडी झाली. पण, अविच्या गोळीने अविचाच जीव घेतला. सराफ वाचले, दरोडेखोरांचे फावले पण एका तरुणाचा हकनाक जीव गेला. खरंतर पोलीसांनी त्यांच्याकडे अगदी काही एक पुरावा नसताना केवळ काही तात्रिक पुराव्यांच्या आधारावर घटनेचा उलगडा केला. नंतर, लुटलेल्या मालाची वाटप होण्याच्या पुर्वीच गोळ्या घालणाऱ्या हातांमध्ये बेड्या ठोकल्या गेल्या. आता हेच समाधान.!
          
   ही कारवाई प्रभारी पोलीस अधिक्षक सागर पाटील यांचे मार्गगदर्शनाखाली एलसीबीचे पो.नि.दिलीप पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि संदीप पाटील, शिशिरकुमार देशमुख, पोहेकाँ मनोज गोसावी, दत्तात्रय हिंगडे, पोना सुनील चव्हाण, शंकर चौधरी, आण्णा पवार, संतोष लोंढे, सचिन अडबल, संदिप कर्डीले, विशाल दळवी, दीपक शिंदे, रवी सोनटक्के, विनोद मासाळकर, मेघराज कोल्हे, संदीप घोडके, ज्ञानेश्वर शिंदे, राहुल सोळुंके, चापोना बबन बेरड, चापोकाँ सचिन कोळेकर, संभाजी कोतकर, बाळासाहेब भोपळे आदिंच्या पथकाने केली.
 प्रिय वाचक मित्रांनो.!
       "रोखठोक सार्वभौम" हे चार महिन्यापुर्वीचे "पोर्टल" आपल्या लोकप्रियतेमुळे १७ लाख १० हजार "व्हिवर्स" पर्यंत जाऊन पोहचले आहे. आता आपण उभ्या केलेल्या या रोपट्याचे रुपांतर "वटवृक्षात" होऊ पाहत आहे. कारण, येणाऱ्या काळात "रोखठोक सार्वभौम" हे "सायंदैनिक" अकोले व संगमनेरकरांच्या सेवेसाठी लवकरच उपलब्ध होणार आहे. आपले प्रेम आमच्यावर कायम राहो हिच श्रींच्या चरणी प्रार्थना.🙏🏻
घारगाव, बोटा, धांदरफळ, संगमनेर, तळेगाव, साकूर, मंगळापूर, समनापूर, अकोले, देवठाण, समशेरपूर, राजूर, कोतूळ अशा अन्य ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहे
 
   संपर्क करा
सुशांत पावसे
8308139547
८८८८७८२०१०
============
                 "सार्वभाैम संपादक"
                 
               सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे १७ लाख ५० हजार वाचक)

- सागर शिंदे

(क्राईम रिपोर्टर)