"महाराज" फक्त "फेटा" खाली ठेऊ नका.! उभा "महाराष्ट्र" तुमच्या "पाठीशी" उभा आहे.!

अकोले :-
आपल्या देशात एक खास "संवैधानिक" व आम्ही "पुरोगामी" असा "झेंडा" घेऊन मिरविणाऱ्यांची संख्या फार झाली आहे. चार-दोन महिने गप्प बसायचे आणि एखादा "बडा माणूस" शोधून त्याच्यामागे ससेमिरे लावायचे. "पत्रकबाजी" आणि "स्टंण्ट" करुन पुन्हा आपले बिज रुजवायचे. हाच धंदा "सामाजिक बाजारपेठेत" सद्या जोरदार सुरु आहे. आता हेच पहा ना.! निवृत्ती महाराज इंदोरीकर "फुल फॉर्ममध्ये" असणारे "बुवा महाराज", पण अशा एका "कचाट्यात" सापडले आणि कालवर ज्या कोणत्या संघटना अगदी निखाऱ्यासारख्या निश्चिंत पहुडल्या होत्या, त्यांना एक "ठिणगी" सापडली आणि त्यांनी दोन वाक्यांचा अक्षरश: "वनवा" पेटवून दिला. स्पष्टच सांगायचे ठरले तर, आमच्या "तृप्ती" ताई.! "शनिचौथरा" संपला "दर्गा" धरला, आता पुढे काय ! तर अवघे दोन वर्षे काहीच नाही. अखेर काय ? तर, आहे महाराज,! नाचवायंच-नाचवायचं आणि "पिल्लू" सोडून द्यायचं.! त्यांना अ. नगरच्या "अष्टेकर" या महिलेने कसे "प्रतिउत्तर" दिले. हे "सोशल मीडियावर" फिरतेच आहे. आता त्या त्यांच्या पाठीमागे किती "हात धुवून" लागतात. हे कळेलच तुम्हाला. कसलं काय आलय.! "नंगे को खुदा डरता है".! और "सज्जनको सजा" होती हैं.! हिच 'रित' आहे दुनियेची. आता पाठोपाठ "अंधश्रद्धा" निर्मुलनचे काम किती "मंदावले" हे नव्याने सांगायला नको. पण, त्यांनी देखील महाराजांना फार "मनावर घेतले" आहे. आता काही दिवसांपुर्वी "नरेंद्र दाभोळकरांचे" विचार सांगणारे महाराज आज दाभोळकरांच्या चौकटीत "आरोपी" म्हणून उभे राहिले आहे. त्यामुळे, "माफी" मागून किंवा "गेलं एखादं वाक्य" असे "कबुल करुन" देखील इतकी "ताणायची" गरज का.? याबाबत अनेकजन "अनभिज्ञ" आहेत.
ह.ब.प निवृत्ती महाराज देशमुख यानी "अक्षपहार्य" वक्तव्य केले होते की,”सम" तिथीला स्त्री "संग" केला तर "मुलगा" होतो आणि "विषम" तिथीला "स्त्री" संग केल्यास "मुलगी" होते ” असे वक्तव्य केलं होते. यावर "अक्षेप" घेत काही संघटनांना कायद्याचा नव्हे स्टण्टबाजीचा "पुळका" आला आणि ते म्हणाले. की, इंदुरीकर महाराजांनी केलेले वक्तव्य हे "गर्भलिंग निदान" निवडीची जाहिरात आहे. हे "वक्तव्य" म्हणजे "गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्यानुसार कलम २२ चे उल्लंघन" असल्याचा आरोप अनेकांनी केला. आता मुळत: त्यांनी जे काही मांडले. ते त्यांच्या "मनाचे" नसून ते "साहित्यग्रंथांचे प्रमाण" घेऊन मांडले. दुसरी गोष्ट म्हणजे, या "वक्तव्याचा अर्थ" कोण्या "मनुस्मृती" किंवा "अधश्रद्धेच्या" बाड बिस्तारात असेल नसेल. पण, हा उल्लेख खुद्द "गुरुचरित्रात" दिलेल्या ३७ व्या अध्यायात संदर्भाने "ओवी" क्रमांक ५१ स्पष्ट दिलेला आहे. हो.! मी त्या शब्दांचे समर्थ करणार नाही. ज्यांनी स्रीयांचा अपमान झाला असेल. पण, इंदुरीकरांचे किर्तन म्हणजे काय असते. हे तुम्हाला नव्याने सांगायला नको. त्यांनी आजवर ग्रामीण शब्दांच्या जोरावर विदेशात देशाचे व देशात महाराष्ट्राचे नाव प्रज्वलित केले आहे. खरतर ते आजही तितकेच ठाम आहे. की "सम" आणि "विषम" तारखेचे "शास्र" हे माझे गणित नसून असे शास्र सांगते. मग, जर तक्रार करणाऱ्यांना महाराज चुकीचे वाटतात. तर पहिले ज्या संग्रहात हे नमुद केले आहे. त्यावर ही लोकं आक्षेप का घेत नाहीत.? त्यांच्यावर का पीसीपीएनडीटी कायद्याची तलवार उचलत नाही ? डॉ. बाबासाहेबांनी "मनुस्मृती" जाळली. व्यक्तीविरोध नाही केला. येथे काय चाललय हे जनतेला दिसतय. म्हणून तर महाराजांच्या समर्थनार्थ जनता मैदानात उतरली आहे.

एक गोष्ट प्रकर्षाने सांगाविशी वाटते. की, महाराजांनी काय जगाच्या वेगळे "संशोधन" केले नाही. त्यांनी फक्त ग्रंथांचा आधार जनतेसमोर मांडला आहे. तो किती "सत्य" व किती "निराधार" आहे. यावर "मीडियाने" त्याचा "चोथा" केला हे आपण पाहिच. पण, वास्तवत: त्यांनी कोणतीही "अंधश्रद्धा" पसरविल्याचे दिसून येत नाही. कारण, संदर्भ साहित्य असे सांगत असले. तरी, त्यांनी असे कोठे म्हटले नाही की, तुम्ही मुलींना जन्म देऊ नका, किंवा मुलांना जन्म देऊ नका. काय हवे आहे. काय नको, हे तुमच्या मनावर, पण, शास्रग्रंथ असे सांगते. हेच त्यांनी मांडले. त्यामुळे, काही संघटनांनी जो काही अतातईपणा मांडला आहे. तो निव्वळ प्रसिद्धी झोतासाठी असल्याचे लक्षात येते. गर्भ लिंगनिदान या कायद्याचा मुळ गाभाच तर मुलींच्या जन्मा उद्धार आहे. आता समग्र जनता साक्ष आहे. ज्यांनी कोणी हा कायदा डोक्यावर घेतलाय त्यांनी मुलींच्या जन्मासाठी काय दिवे लावले.? कोठे शिबिर घेतले की २४ जनगागृती मोहिमा राबविल्या आहेत. कोठे समुपदेशन केंद्र उभारलेत की बेटी बचाव अभियानात स्वत:ला झोकून दिले आहे. अर्थात असे काही नाही. तहान लागली की विहीर खोदायची आणि कोणी कचाट्यात सापडलं की तडजोड करायची. वास्तवत: जसा माहिती अधिकाराच दुरउपयोग जसा गगणाला भिडला आहे. तसा हा कायदा देखील मागे राहिला नाही. अनेक महाशय डॉक्टरांनी धमकावून धनबलाढ्या झालेत तर कोणी सलगी करुन आपण कायदेतज्ञ कसे आहोत. हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात.

याउलट जर निवृत्ती महाराजांची किर्तने तुम्ही एकली असेल. तर, त्यांनी आजवर नेहमीच स्री जन्माच्या उद्धाराचा पुरस्कार केला आहे. "बेटी बचाव, बेटी पढाव" यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. मुला पेक्षा मुलगी सरस कशी.! हे त्यांनी आपल्या खास शैलीतून मांडले आहे. कुटुंब संस्कृती, भारतीय परंपरेचा वारसा, जगण्याची कला, प्रॅक्टीकल ज्ञान, व्यक्तीमत्व विकास, थोरा-मोठ्यांचा आदर, शिक्षण, आरोग्य, राष्ट्रिय एकात्मता, पर्यावरण संवर्धन, स्री-पुरुष समानता, देशातील महत्वाच्या प्रश्नांचे विश्लेषण, अध्यत्म, संस्कार, चांगल्या रुढी-परंपरा यांच्यासह अनेक विषय अवघ्या दोन तासात समजून सांगणारे ते एकमेव "प्रबोधनकार" आहेत. हेच "त्रिवार सत्य" आहे. पण, दुर्दैव असे की, मोठ्या झालेल्या मानसाकडून उपेक्षित छोट्या गोष्टी मोठ्या करुन घेण्यापेक्षा मोठ्यालाच छोटं करण्याची परंपरा सुरु झाली आहे. हे जे कोणी संविधान किंवा समाज सुधारनेचा अवडंब घेऊन थुै-थुै नाचत आहेत. त्यांच्यापेक्षा कैक पटिने महाराजांनी संविधानाची मुल्य जनमानसांमध्ये रुजविली आहेत. महाराजांच्या एका किर्तनाने अनेकांची संपलेली आयुष्य उभी राहिली आहेत. मोडून पडलेला संसार पुन्हा साकारला आहे. अनेक कट्टर बेवड्यांनी टाळ, मृदुंग, पेटी, पखवाद हाती घेतले आहेत. अनेकांच्या सासू त्यांनी वठणीवर आणल्या. तर, बेरोजगार हिंडणाऱ्या तरुणांना त्यांनी नोकरीस प्रवृत्त केले आहे. कशाला हवा तुम्हाला वंशाला दिवा.! लेकीला जीव लावा.!! हे त्यांचेचे वाक्य.! संसारात आईचा हस्तक्षेप कशाला हवा.? करुदेना लेकीला संसार.! हे वाक्य त्यांचेच. अशी कित्तेक उदा. सांगता येतील. पण, दुर्दैव असे की, चांगल्याला चांगलं म्हणणं आणि चालत्या गाडीची कानखिळ काढणं हे जमो तर यांनाच.!
खरंतर, महाराजांना मोठं होताना शासनाने काही शिष्यवृत्ती किंवा सवलत दिली नाही. तर, ते स्वत:च्या मिरिटवर उभे राहिले. आता ज्याच्याकडे स्वत:ला सिद्ध करण्याची ताकद आहे. त्याच्या कपाळी संघर्ष हा अटळ आहे आणि जेथे मोठेपण आहे तेथे यातना तर होणारच. त्यामुळे, महाराजांनी अनेक किर्तनकारांचे बाजार ऊठविले आहेत. त्यामुळे, प्रांजळ किर्तनकार वगळले तर अन्य किर्तनकार आता त्यांच्या विरोधात "बंड" पुकारुन उठले आहेत. म्हणून तर त्यानी वारकरी सांप्रदायाला काळींबा फासला वैगरे-वैगरे शब्दप्रयोग करुन काही ठिकाणी त्याचे प्रतिकात्मक पुतळे जाळले गेले. तर, कोणी कमिट्या स्थापन करुन कारवाई करा अशी मागणी धरत आहेत. पण, यामागे कोणाची राजकीय किर्तनकारी सुरु आहे. यावरील पडदा बाजुला सारणे गरजेचे आहे. महाराजांच्या समर्थनार्थ अनेकांनी रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे. अन्यथा, हि व्यवस्था चांगल्या मानसाचे खच्चीकरण केल्यानंतर शांत बसेल. इतकी मोठी ही विघातक वृत्ती आहे. पहा ना.! किती मोठा विरोधाभास आहे. जे आरोग्य खातं सांगतं तुम्ही जितके मनमोकळे हसाल तितके तुमचे आरोग्य उत्तम राहिल आणि तेच आरोग्य खातं आज जो लोकांचे आरोग्य उत्तम ठेवतो, त्यांच्यावर कारवाई करायला निघाले आहे. वा रे.! उद्धवा, अजब तुझे सरकार. या सगळ्या परिघात एक मात्र नक्की, कालपर्यंत लोकांची "व्हिकेट" घेणारे महाराज आत स्वत: "क्लिन बोल्ड" झाल्याचे दिसत आहे.आता काय करायचे ते जनतेच्या हाती आहे. गेली २६ वर्षे जनतेला मानुसकी, धर्म, सांप्रदाय, संस्कार, अध्यात्म व वास्तवाची जाणिव करुण देणाऱ्या महाराजांच्या विरोधात ऊभे रहायचे की समर्थनार्थ.! हे तुमच्या हातात आहे. सोशल मीडियावर सपोर्ट करण्यापेक्षा प्रत्यक्ष रस्त्यावर उतरुन "लोकमान्य" किर्तनकारास बळ दिले पाहिजे. जे महाराजांना विरोध करतात, त्यांना त्यांच्या किर्तनात तासभर बसविले तरी हसण्याची किंमत आणि वास्तवाचा शोध काय असतो. याची प्रचिती येईल. पण, महाराजांच्या हजारो चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन एक शुल्लक गोष्टीला घेऊन ज्यांनी इतका मोठे अवडंबर ऊभा केला. हे फार अविचारी वाटते. तुम्ही विज्ञान जितके शिकले. तितके अज्ञानात सुख मानलं की काय.! असे वाटू लागले. पण काहीही झाले. तरी आम्ही "संविधानाचा आदर" करतो, त्याचे "मुल्य" जपतो, "पावित्र्य" राखतो, चुक असेल तेथे मोठ्या मनाने "क्षमा" मागतो. पण, हे जे काही कुभांड रचले जात आहे. ते सरासर चुक आहे. महाराज तुम्ही कालही योग्य होते, आजही आहे, उद्याही राहतील. फक्त फेटा खाली ठेऊ नका. बस इतकीच तुम्हाला विनंती आहे. बाकी हा सगळा सजग महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे.
सागर शिंदे
============