बलात्कार करणाऱ्यास बांधून ठार मारले, अकोल्यातील शिरपुंजे येथील खळबळजनक घटना; तिघांना अटक
अकोले :-
रानात गुरे चारणाऱ्या महिलेवर बालात्कार करुन पसार झालेल्या आरोपीस पकडून त्यास बांधूव ठार मारल्याची खळबळजनक घटना अकोले तालुक्यातील शिरपुंजे बु या गावात घडली. याप्रकरणी मयत राजू गणपत सोनवणे यांच्यावर राजूर पोलीस ठाण्याच अत्याचार (३७६) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, राजू यास तिघांनी बांधून मारल्यानंतर तो ठार झाला. त्यानंतर विजय तपासे, अक्षय तपासे व लालु उर्फ महेंद्र तपासे या तिघांवर (३०२) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, एक ५५ वर्षाची महिला शिरपुंजे परिसरात गुरे चारण्यासाठी गेली होती. या दरम्यान राजू देखील बकऱ्या चारण्यासाठी तेथे गेला होता. बुधवार दि.५ रोजी दुपारी दोघे रानात असतांना राजूने पीडित महिलेशी लगट केली. तिने विरोध केला, मात्र, बळजबरी करीत आरोपीने महिलेवर अत्याचार केला. त्यानंतर हा प्रकार एका व्यक्तीने पाहिला असता त्याची वाच्चता झाली. त्यानंतर घडलेला सर्व प्रकार पीडितेने नातेवाईकांना कथन केला. त्यानंतर रागाच्या भरात त्यांनी राजूचा शोध सुरु केला. मात्र, त्याने थेट जंगलात पळ काढला. दरम्यान त्यास पकडून एका बाकड्याला बांधून उपरोक्त आरोपींनी बेदम मारहाण केली. राजू जायबंदी झाल्यानंतर तिघांनी त्यास राजूर पोलीस ठाण्यात आणले. मात्र, पोलिसांनी राजूची बिकट परिस्थिती पाहता पहिले दवाखाण्यात उपचारासाठी पाठविले. याच वेळी राजूने सांगितले की, या तिघांनी मला बेदम मारहाण केली आहे. त्यामुळे, पोलिसांनी त्याचा कायदेशीर अदखलपात्र गुन्हा दाखल केला. राजुला रुग्णालयात दाखल केले असता त्याची प्रकृती चिंताजनक वाटली. त्यामुळे, स्थानिक डॉक्टरांनी त्यास नाशिकला रवाणा केले. मात्र, अकोले क्रॉर करेपर्यंत त्याने अखेरचा श्वास घेतला होता. त्यामुळे, पोलिसांनी महिलेच्या सांगण्याहुन राजुवर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. तर, ज्यांनी राजुस मारहाण केली. त्यांच्यावर ३०२ कलमान्वे गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित प्रकार राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक नितीन पाटील यांना समजला असता त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तत्काळ ३०२ मधील आरोपींना बेड्या ठोकल्या. त्यांना पुढील तपासासाठी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. सरकारी पक्षाचा युक्तीवाद व पाटील यांचे म्हणणे ग्राह्य धरुन न्यायलयाने तिघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान ही घटना पोलीस अधिक्षक सागर पाटील यांना समजताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. कोठे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी स्वत: लक्ष घालत तपासी अधिकाऱ्यांना सुचना व मार्गदर्शन केले. इतकी मोठी घटना घडल्यानंतर ती स्थानिक पोलिसांनी अगदी सुस्थितीत हताळल्यामुळे राजूर परिसरात कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही.
- सागर शिंदे
(क्राईम रिपोर्टर)