मधुकर पिचड व ना. बाळासाहेब थोरात यांची मंत्रालयात बैठक.! चर्चेला उधान, खलबते सुरु ?

              
मुंबई (प्रतिनिधी) :-
               माजी मंत्री मधुकर पिचड व महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांची काल मंत्रालयात भेट झाली. तब्बत १५ ते २० मिनिटे चाललेल्या या बैठकीत काय हलचाली झाल्या ह्या अद्याप गुलदस्त्यात आहेत. परंतु, भाजपमध्ये अस्वस्थ असलेले हे कुटुंब लवकरच वेगळा निर्णय घेतील असे अनेकांना वाटते आहे. अशा परिस्थितीत त्यांनी काँग्रेसचे बडे नेते थोरात साहेबांची भेट घेतल्याने तालुक्यात वेगळी चर्चा सुरु असल्याचे बोलले जात आहे. पिचड साहेब हे वैयक्तीक कामासाठी तसेच काही विकासात्मक गोष्टींशी चर्चा करण्यासाठी गेल्याचे बोलले जात असले. तरी, नाराज राष्ट्रवादीला पर्याय म्हणून ते घरवापसी करत पुन्हा काँग्रेसच्या पाऊलावर पाऊल तर ठेवणार नाही ना ? अशी गुप्त चर्चा सद्या सुरु आहे.
         
          सन १९९० पुर्वी व १९८० साली मधुकर पिचड यांनी काँग्रेसचा तिकीटावर आमदारकी लढविली होती. त्यात त्यांना यश आले आणि त्यानंतर गेली ३५ वर्षे ते अकोले तालुक्याचे आमदार राहिले. दरम्यानच्या काळात पवार साहेबांनी त्यांच्यावर अतोनात प्रेम केले. कारण, ते विश्वासू व राष्ट्रवादीचे फाऊंडर मेंबर होते. पण, कोण जाणे त्यांना कोठून सुचना आली आणि त्यांनी भाजपची वाट धरली. आता अकोले तालुका हा पुर्वापार पुरोगामी विचार सारणीचा आहे. त्यामुळे, त्यांना भाजपचा विचार मान्य होणे अशक्य आहे. म्हणून वैभव पिचड यांना पराभवाला सामोरे जावे लागले. आता पिचड साहेबांना पराभवात जे मतदान मिळाले. हे त्यांच्या पडत्या काळातील कसोटीचे मतदान होते. अर्थातच ते फिक्स म्हणावे लागेल. साहेब कोठेही जावोत. व्यक्तीश: ५० हजारांची व्होटबँक निच्छित म्हणावी. त्यामुळे,  पठार भागातील ४२ हजार मतदान बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली आहे. त्यामुळे किमान १ लाख मतदान हे उघड-उघड दिसून येते. जर, पिचड साहेब काँग्रेसमध्ये आले  तरी त्यांचा विजय कोणी टाळू शकत नाही. उरला प्रश्न जागेचा. तसे पाहता महाआघाडीत ही जागा शिवसेनेकडे होती. असे असताना ती भाजपला सोडली गेली. त्यामुळे, जरी पवार साहेब पिचड कुटुंबावर नाराज असले. तरी ते सुडाचे राजकारणी नाहीत. अर्थात त्यांचे राजकारण न समजण्यापलिकडचे असले, तरी पिचड कुटुंबाबात त्यांचा आकस नाही. त्यामुळे, एकेकाळी अकोले तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. तो किल्ला पुन्हा उभा करण्याची संधी काँग्रेसकडे आली असल्याचे बोलले जात आहे.

साहेब.! जाऊद्या, झालं गेलं विसरुन जा.!

          अर्थात हे केवळ तर्क वितर्क आहे. परंतु, रोखठोक सार्वभौमचे तर्क कधीही फेल गेलेले नाही. एक गोष्ट स्पष्टच सांगायचे ठरले. तर, ऊद्याच्या काळात भाजपचे उमेदवार पिचड कुटूंबातून नसेल. तर, पुरोगामी विचारसारणी असणाऱ्या पक्षातूनच त्यांना संधी मिळेल व ते यशस्वी होतील हेच वास्तव आहे. त्यामुळे, पिचड साहेबांची भेट एक औपचारिक व वैकसिक मुद्द्यावर असली. तरी, तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधान सुटले आहे.