संगमनेरात एक "पिस्तुल" चक्क ३८ "जिवंत काडतुसे"! पोलीस व लुटारुंमध्ये "चित्तथरारक" चकमक.! तिघांना अटक

                  
संगमनेर (प्रतिनिधी) :-
                         संगमनेर शहरात सराफाला लुटताना दरोडेखोरांच्या गोळीबारात अविनाश शर्मा यांचा बळी जाऊन आठवडा उलटला. अर्थात हा प्रकार रोड रॉबरी सारखा असला तरी त्यात एका निष्पापाचा बळी गेला. हेच शल्य डोक्यात धरुन पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाया व संशयीत आरोपींना पुन्हा रडारवर घेतले होते. त्यांच्यामागे चौकशीचे ससेमीरे लावून त्यांना सळू की पळू करु पाहिले. या दरम्यान पोलीस निरीक्षक अभय परमार यांना गोपनिय सुत्रांनी माहिती दिली की, नाशिक-पुणे महामार्गावरुन काही तरुण गावठी कट्टे घेऊन जाणार आहेत. ही माहिती मिळताच परमार यांनी पीएसआय कवडे यांच्यासह एक टिम तयार केली. रायतेवाडी परिसरात असणाऱ्या टोलनाक्यावर काही साध्या वेशात पोलीस उभे केले. त्या पोलिसांनी टोलनाक्यावर कामगार असणाऱ्यांसारखे वागत काही संशयीत वाहनांची तपासणी केली. बराच वेळ गेल्यानंतर आरोपींची गाडी आल्याची समजले असता पोलिसांनी गाडीतील तिघांवर धाड टाकली असता क्षणभरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी गाडीला घेरले खरे. त्यांच्यावर पिस्तुल रोखला. मात्र, त्यांच्याकडे देखील पिस्तुल होता. हे माहित होते तरी देखील या विशेष पथकाने स्वत:चा जीव धोक्यात घालून तिघांना बेड्या ठोकण्याचे धाडस केले. दयानंद तेलंग, दिपक खाडे, बाबासाहेब मुंजाळ (रा. शिरुर) अशी आरोपींची नावे आहेत.

         दरम्यान, सर्व काही माहित असतांना पोलीसांनी ही जीवघेणी धाडस केली तरी कशी ? याबाबत समजले की, या आरोपींकडे पिस्तुल होते. त्यांनी जर पुण्याकडे जाताना कोणाला अडविले असते. तर या पिस्तुलाचा दुरुपयोग केला असता. अनपेक्षीत एखाद्याचा जीवही गेला असता. आठवडाभरापुर्वी घडलेल्या घटनेची पुनरावृती संगमनेरच काय.! राज्यात कोठेही होऊ नये. त्यामुळे, यांच्या मुसक्या आवळणे गरजेचे होते. वेळप्रसंगी पुण्यापर्यंत पाटलाग करण्याची वेळ आली असती. तरी पोलीसांनी मागेपुढे पाहिले नसते. अशी प्रतिक्रिया आली. दरम्यान पोलीसांनी तिघांना बेड्या कोठताना तेथील चित्तथरारक प्रसंग पाहण्याचे भाग्य काही प्रवाशांना लाभले. मात्र, आरोपींनी जेव्हा पोलिसांना प्रतिकार केला. तेव्हा अनेकांनी श्वास रोखून धरला होता. मात्र, टिमच्या योग्य नियोजनामुळे आरोपींनी पुढे काही करण्याच्या आत त्यांच्या मुसक्या आवळल्या.
            ही कारवाई पीआय अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संजय कवडे, श्री. साबळे, पो.ना विजय पवार, पो. कॉ सुभाष बोडके, पो. कॉ. अमृता आढाव पो. कॉ. प्रमोद गाडेकर पो. कॉ. साईनाथ तळेकर यांनी केली. यात एक गावठी कट्टा, ३८ राऊंड व एक स्कॉर्पिओ गाडी असा लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
प्रिय वाचक मित्रांनो.!
       "रोखठोक सार्वभौम" हे चार महिन्यापुर्वीचे "पोर्टल" आपल्या लोकप्रियतेमुळे १७ लाख ४० हजार "व्हिवर्स" पर्यंत जाऊन पोहचले आहे. आता आपण उभ्या केलेल्या या रोपट्याचे रुपांतर "वटवृक्षात" होऊ पाहत आहे. कारण, येणाऱ्या काळात "रोखठोक सार्वभौम" हे "सायंदैनिक" अकोले व संगमनेरकरांच्या सेवेसाठी लवकरच उपलब्ध होणार आहे. आपले प्रेम आमच्यावर कायम राहो हिच श्रींच्या चरणी प्रार्थना.🙏🏻
संगमनेर शहर, घारगाव, बोटा, धांदरफळ, संगमनेर, तळेगाव, साकूर, समनापूर, चंदनापूरी, मंगळापूर, समनापूर, अकोले, कळस, देवठाण, समशेरपूर, राजूर, कोतूळ, शेंडी, भंडारदरा, सातेवाडी अशा अन्य ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहे
     संपर्क करा
सुशांत पावसे
8308139547
८८८८७८२०१०
============
                 "सार्वभाैम संपादक"
                 
               सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे १७ लाख ५० हजार वाचक)