विखेंना "नगरचे तिकीट" मिळाले नाही, म्हणून त्यांनी माझा "शिर्डीत पराभव" केला - आठवले

                    
अकोले (प्रतिनिधी) :-
                     मला जेव्हा शिर्डी लोकसभेचे तिकीट मिळाले. तेव्हा, विखे यांना त्यांच्यासाठी नगर दक्षिणेची जागा हवी होती. त्यांनी प्रचंड प्रयत्न केले. पण, त्यांना अपयश आले. जोवर तिकीटाचा प्रश्न सुरु होता. तोवर त्यांनी मला सपोर्ट केला. नंतर, तिकीट नाकारले तेव्हा त्यांनी माझ्या पाठींब्याचा हात काढून घेतला. त्यामुळेच माझा पराभव झाला. असा आरोप केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला. रिपाईचे राज्यसचिव विजय वाकचौरे यांच्या घरी घेण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.
               
आठवले त्यांच्या मिश्किन शैलीत म्हणाले की, विजय यांचे नाव विजय असले. तरी, मला शिर्डीत पराभव स्विकारावा लागला. मला वाटत होते. शिर्डीत मागासवर्गिय लोक जास्त आहेत. त्यामुळे, किमान ७ ते ८ लाख मते मला पडतील. पण, माझा पराभव झाला. त्यास दुसरे तिसरे कोणी जबाबदार नसून काँग्रेसच जाबाबदार आहे. यावेळी त्यांनी सक्रिय कार्यकर्ते म्हणून विजय वाकचौरे यांची पहिली सदस्य नोंदणी केली. यावेळी, काकासाहेब खंबाळकर, श्रीकांत भालेराव, विजय वाकचौरे, सुरेंद्र थोरात, सुनिल साळवे, राजाभाऊ कापसे, दिपक गायकवाड, शांताराम संगारे, रमेश शिरकांडे, संदिप घोलप, विनोद घोलप, माणिकराव यादव यांच्यासह अन्य चळवळीचे नेते उपस्थित होते.
              
    संगमनेर (प्रतिनिधी) :- सीएए कायदा समजून घेणे गरजेचे आहे. यात सहा धर्माचे लोक आहे. त्यांना नागरिकत्व देण्याचा कायदा आहे. केवळ नव्याने मुस्लिम समाजा येतात त्यांचे त्यात नाव नाही. देशात जे मुस्लिम लोक आहेत. त्यांच्या नागरिकत्वावर कोणतीही गदा येणार नाही. मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे, त्याचा फायदा घेण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी त्यांना विरोध करत आहे. जम्मु कश्मिर येथील ३७० कलम हटविला आहे. तो चांगला आहे. तेथील विकास करता येणार आहे. पाकव्याप्त कश्मिर येथे जे आतंकवादी घुसखोर आहेत. त्यांना जरब बसविता येणार आहे. आतंकवाद थांबवयचे असेल तर पाकव्याप्त कश्मिर ताब्यात घ्यावा लागणार आहे. पाक सोबत युद्ध करण्याची आमची मानसिकता नाही.
        मनसेचा झेंडा बदलून उपयोग नाही. धोरणे बदली पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेऊन जनतेच्या मनात स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पण, रंग बदलून काही होत नाही. भाजपने मनसेसोबत युती करु नये. त्याचा तोटा भाजपलाच होणार आहे.
          भिमा कोरेगाव प्रकरणात चौकशी झालीच पाहिजे. अनिल देशमुख यांनी घोषणा केली. त्यांना अधिकार आहेत. ते करु शकतात. प्रकाश आंबेडकर यांनी जो बंद पुकारला होता. त्यात रिपाईचे कार्यकर्ते अग्रभागी होते. म्हणून तो बंद यशस्वी झाली. समाज्याच्या हितासाठी आम्ही एक आहोत.
       राज्यात जो अतिवृष्टीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्या संदर्भात अहवाल केंद्राकडे येत आहे. त्याची माहिती घेऊन राज्यासाठी चांगला निधी मिळावा. यासाठी मी पाठपुरावा करणार आहे. असे मत केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

- सुशांत पावसे
- सागर शिंदे