सातेवाडी पोटनिवडणुकीचा "पुन्हा राजकीय स्वयंवर"! हे ११ "वर" तैयार.!

             
अकोले (प्रतिनिधी) :-
                 येत्या १० दिवसांच्या आत "सातेवाडी" गटाची "पोटनिवडणुक" जाहिर होण्याची शक्यता आहे. या गटात ४८ गावांत "उताविळ" असणाऱ्या १५ उमेदवारांची "लगीनघाई" सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. यात तब्बल "मतदार" म्हणून ३२ हजार "वऱ्हाडी" निवडणुकीच्या 'मंडपात' उभे राहुन आपला "जावई" निवडणार आहेत. त्यामुळे, आपण "इतरांपेक्षा वेगळे व पात्र" कसे आहोत. हे सिद्ध करण्यासाठी अनेकांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. यात सतिश भांगरे, केशव बुळे,  सिताराम बांडे, जे. देशमुख, सुशिल चिखले, श्री. मेटकर, पोपट चौधरी, केशव दिघे, रासपचे भगवान करवर, मारुती मेंगाळ, अमित भांगरे यांच्यासह अन्य व्यक्ती निवडणुकीच्या "रिंगणात उतरणार" असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. आता यात "तुल्यबळ उमेदवार" कोण ? आणि "सातेवाडीकर" कोणाच्या गळ्यात "विजयाची माळ" घालतात. हे पाहणे महत्वाचे आहे. पण, काहीही झाले. तरी ही लढत "भाजप" वर्सेस "राष्ट्रवादी" अशी दिसत असली. तरी, 'विधानसभेला' अनेक "मित्रपक्षांनी" दोन्ही प्रस्तापित पक्षांना "सखोल मदत" केलेली आहे. त्यामुळे, रासप, रिपाई, "माकप" यांचा देखील येथे विचार करावा लागणार आहे. त्यामुळे, "सातेवाडी स्वयंवरात" कोणता "गुलाल" उधळून कोणीची "वरात" निघते. हे पाहणे देखील "उत्सुकतेचे" ठरणार आहे.

सुत्रधार एक

         जेव्हा बॉक्स आॅफिसवर "सैराट" चित्रपट आला होता. तेव्हा "परशा" आणि "आर्ची" ही अनोळखी चेहरे सिने विश्वात रातोरात हिऱ्या प्रमाणे चकाकून गेले. तेव्हापासून मुला-मुलींनी एक सपाटाच लावला होता. आपण कसेही दिसो.! पण, नटून थटून कॉलेजात, बाजारात आणि कार्यक्रमांत जायचं. त्याचे कारणही तितकेच हटके होते. की, त्यांना वाटायचं. कोण जाणे.! कोठून नागराज मंजुळे येतील आणि आपले लक उजडून जाईल. तेव्हापासून कर्म सोडून नशिब या गोष्टीवर लोकांचा प्रचंड विश्वास बसला. म्हणून तर, विनोद निकोले, डॉ. किरण लहामटे यांच्यासारखे सामान्य जनतेतील लोक आमदार होऊ शकतात. हे एक प्रकारचे "लक"च म्हणायचे. अन्यथा भांगरे साहेबांचे स्ट्रगल म्हणजे एक तपच आपल्या डोळ्यासमोर आहे. आता हाच अजेंडा सातेवाडी गटात पुढे येऊ लागला आहे. मिरिट असा वा नसो.! आपल्याला उभे रहायचे आहे. तिकीट मिळो वा न मिळो, आपल्याला लढायचे आहे.! मते पडो वा न पडो, आपल्याला जिंकण्याचा प्रयत्न करायचा आहे. कोण जाणे.! उद्या सगळ्यांचे अर्ज बाद होऊन आपलाच अर्ज राहु शकतो. कोण जाणे, भाजप किंवा राष्ट्रवादी आपल्याला सपोर्ट करु शकते.! कोणाचे नशिब कोठे उजडू शकते.! वेळेचे काही एक सांगता येत नाही. त्यामुळे, आजकाल लोक कर्मावर कमी आणि नशिबावर जास्त जोर देऊ लागले आहेत.

सुत्रधार दोन

         
आता ३२ हजार मतदान असलेल्या या गटात हरिश्चंद्र गडाचा जो पट्टा आहे. त्यांची बाजारपेठ ओतूर आणि कोतूळ आहे. तर, मवेशी पट्ट्याची बाजारपेठ राजूर आहे. त्यामुळे, भौगोलिक दृष्टीकोणातून व्यापक असणारा हा गट पुर्वीच विभागला गेलेला आहे. सरासरी १६ हजार लोकसंख्या पहिल्या पट्ट्यात तर १६ हजार लोकसंख्या दुसऱ्या पट्ट्यात आहे. त्यामुळे, येथील नागरिकांना स्थानिक उमेदवाराची अपेक्षा आहे. तर, दोन्ही पट्ट्यातून वेगवेगळी नावे पुढे येऊ लागली आहेत. यावर्षी विधानसभेला चांगलीच रंगत आल्यामुळे, लोक निवडणुकांसाठी प्रचंड  इच्छूक आहेत.  तर, मुंबई-पुण्यात राहणारे तरुण व रिटायर व्यक्ती देखील कष्टाने कमविलेला पैसा, निवडणुकीत उधळण्यास तयार आहेत. त्यामुळे, यावेळी सातेवाडी रंगत धरु लागली आहे. यात चार नावे टफ फाईट देतील अशी आहेत. मात्र, राजकारणात कधी काय होईल याचा काहीही एक नियम नाही. मात्र, वैभव पिचड, डॉ. किरण लहामटे, अशोक भांगरे, सुनिता भांगरे व डॉ. अजित नवले यांच्या भुमिका येथे महत्वाच्या ठरणार आहे. यात कोण बाजी मारेल.? याचे विश्लेषण आम्ही लवकरच आपल्यासमोर माडू.

सुत्रधार तीन व चार.!


सातेवाडी व राजूर, मवेशी या विभागाची संपुर्ण माहिती असणाऱ्या व्यक्तीला "रोखठोक सार्वभौम" प्रतिनिधी म्हणून नेमणे आहे. तो व्यक्ती "ढ" असला तरी चालेल. पण, कोणत्याही पक्षाचा गुलाम नसावा, पत्रकारीतेची आवड असावी, निर्भिड, धैर्यशिल व चिकित्सक असावा.
(संपर्क ८८८८७८२०१० या व्हाटस्अॅप नंबरवर वैयक्तीक माहिती पाठवावी. No Call Please)
- सागर शिंदे
=============
                 "सार्वभाैम संपादक"
                 
               सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                -------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" १५० दिवसात २५० लेखांचे १६ लाख १० हजार वाचक)