कैलास वाकचौरे यांची "राष्ट्रवादीतून" हकालपट्टी करा.! अशी "शिवसेनेच्या" मारुती मेंगाळांची मागणी.!
अकोले (प्रतिनिधी) :-
जिल्हा परिषद अहमदनगर बांधकाम समितीचे माजी सभापती माजी मंत्री मधुकर पिचड व माजी आमदार श्री वैभव पिचड यांचे खंदे समर्थक समजले जाणारे श्री कैलास वाकचौरे हे तिन वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मधून निवडून आले मात्र विधान सभेला माजी मंत्री पिचड आणि माजी आमदार श्री वैभव पिचड यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांचे सर्व सहकार्यांनी देखिल भाजपचा झेंडा हाती घेतला मात्र कैलास वाकचौरे घड्याळ या चिन्हावर निवडून आल्यामुळे आपला बचाव करण्यासाठी पक्ष कारवाई पासून जपण्यासाठी खुल्या पद्धतीने निवडणूक प्रचारात समोर आले नाही मात्र श्री वैभव पिचड यांच्या निवडणूकीची धुरा पडद्यामागून सांभाळत होते विधान सभेला माजी आमदार श्री वैभव पिचड यांचा पराभव झाला तर तालुक्यातील पिचड समर्थकांनी सावध पवित्रा घेतला आणि संधी मिळेल त्याठिकाणी गवगवा करत बसले की आम्ही राष्ट्रवादी मध्येच आहोत ! विधानसभा निवडणुकी नंतर जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी पार पडल्या या निवडणुकांमध्ये श्री कैलास वाकचौरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस च्या गटनेतेपदी निवड झाली मात्र औपचारिकता म्हणून या निवडी सोबत राहिले मात्र अकोले पंचायत समितीच्या सभापती उपसभापती निवडीमध्ये खुल्या माजी मंत्री मधुकर पिचड यांना पूरक ठरेल असे काम केल्याने सभापती उसभापती निवडीमध्ये पिचड यांना यश आले.
श्री कैलास वाकचौरे हे माजी मंत्री पिचड यांचे खंदे समर्थक आहे ते सांगतील ती पूर्व दिशा असे जगजाहीर असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी कोणत्या बेस वर वाकचौरे यांची गटनेतेपदी नियुक्ती केली हा संभ्रम सर्वत्र निर्माण झाला असून कैलास वाकचौरे यांच्या जिल्यात राष्ट्रवादी आणि तालुक्यात भाजप या नौटंकी राजकारणामुळे शिवसेना , राष्ट्रवादी, काँग्रेस महाआघाडीला जिल्हा परिषदेच्या समित्या निवडी मध्ये तसेच तालुक्यात पंचायत समितीच्या सभापती उसभापती निवणुकीत परभवांना सामोरे जावं लागल्याने कैलास वाकचौरे यांनी राष्ट्रवादी की भाजप ही भूमिका जाहीर करावी नाहीतर पक्ष नेतृत्वाने वाकचौरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी माजी उपसभापती श्री मेंगाळ यांनी केली आहे.
वरील प्रेसनोट मारुती मेंगाळ यांनी काढली आहे.
=====================
रोखठोक सार्वभौमचे विश्लेषण
तुम्हाला आठवत असेल. आमरावतीच्या खा. नवनित राणा कौर यांना राष्ट्रवादीने सपोर्ट केला. म्हणून पती रवी राणा आमदार तर पत्नी खासदार होऊ शकली. अशात सत्तेचे वातावरण पाहुन कौर यांनी भाजपला सपोर्ट केला. जेव्हा महाराष्ट्राचे राजकारण गढूळ होते. तेव्हा नवनित कौर यांनी शरद पवार यांनी सुचना केल्या होत्या. पवारांनी भाजपसोबत युती करायला हवी. त्यावर पवार साहेब कडाडले. कोण ही कौर ? हिने आम्हाला शिकवायचे का ? आम्ही कोणाशी युती करायची ! भाजपत गेल्या तर भाजपचाच विचार करावा. राष्ट्रवादीच्या राजकारणात डोकं खुपसू नये.!अर्थात यातून काय प्रतित होते ? हे तुम्हाला नव्याने सांगायला नको.! पण, तरी थोडक्यात सांगायचे ठरले. तर, राष्ट्रवादीच्या राजकारणात शिवसेनेच्या नेत्यांनी तोंड खुपसणे कितपत योग्य आहे. कारण, जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सात (वि.प सह) आमदार आहेत. अकोल्यात धडाधीचे आमदार आहेत. जुने जाणते ज्येष्ठ नेते आहेत. तरुणांची मोठी फळी आहे. असे असतांना राष्ट्रवादीचे वकीलपत्र शिवसेनेच्या हाती देणे, कितपत योग्य आहे.?खरंतर एक दुर्दैवाची गोष्ट म्हणायची. की, वाकचौरे यांना विरोध करण्याची धाडस राष्ट्रवादीच्या एकाही नेत्यांत झाली नाही. ती मेंगाळ यांनी करुन दाखविली आहे. अर्थात अकोल्यात "साडेतीन शाहण्यांचा" कारभार सुरु आहे. ज्यांना पक्षाच्या संघटनाशी काही घेणेदेणे नाही. अशीच लोकं राष्ट्रवादीचा घंटा वाजू लागले आहेत. त्यामुळे, पक्षाचे प्रतिनिधीत्व त्रयस्त व्यक्तीना करण्याची वेळ येऊ लागली आहे. वास्तव पाहता राष्ट्रवादीत अनेक मतभेद पहायला मिळत आहे. मात्र, सगळा तोंड दावून बुक्यांचा मारा सोसण्याची वेळ निष्ठावंतांवर आली आहे. सद्या वाकचौरे यांच्या दुटप्पी धोरणामुळे तालुक्यातील राजकारणाला आग लागली आहे. पण, वाकचौरे हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेले आहेत. त्यामुळे,कोणी कितीही आदळआपट केली तरी ते राष्ट्रवादी सोडणार नाही. कारण, आता सभापतीपत तर गेलेच. पण, हातचे सदस्यत्व कोण सोडू शकेल.? त्यामुळे कोणी पिचड समर्थक म्हणा किंवा बंडखोर.! पण, सद्या ते राष्ट्रवादीतच स्टेबल राहणार आहे आणि त्याहुन महत्वाचे म्हणजे. राष्ट्रवादीच्या जिल्हा व राज्य नेतृत्वाने त्यांची भुमिका स्विकारली आहे. तर, शिवसेनेच्या नेत्यांचे बोल ते कितपत विचारात घेतील.? ही देखील एक महत्वाची बाजू आहे. त्यामुळे, सद्यातरी पिचड साहेबांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी पुन्हा.! चा नारा दिला आहे. त्याला नो चॅलेंज...!!