थोरातांच्या संगठण कौशल्य मुलाखतीत रोहित पास, आदित्य नापास.! साहेबांच्या गणिमी काव्यावर शिवसैनिकांचा उद्रेख.!
संगमनेर (प्रतिनिधी) :-
राज्यात "ठाकरे सरकार" आल्यानंतर "शिवसैनिकांना" प्रचंड बळ मिळाले अशी "धारणा" झाली होती. पण, अगदी पहिल्यापासूनच त्यांनी कौटुंबिक हितसंबंधांना महत्व दिले. एकीकडे "लोक काय म्हणतील" आणि अन्य लोकांना संधी मिळावी म्हणून पवारांनी रोहित पवार यांच्यासारख्या लोकप्रिय व्यक्तीला मंत्रीपदापासून दूर ठेवले. तर दुसरीकडे ठाकरे साहेबांनी निष्ठावंत आमदारांना मंत्री पदापासून दूर ठेवत राजकुमारांना कॅबिनेट दर्जाचे मंत्री पद दिले. अर्थात हे साहजिक होते. पण, त्यांनी आता "लहानपण" सोडून अंगी "मोठेपण" बाळगले पाहिजे. असे तळागाळातील कट्टर व "बुजुर्ग शिवसैनिकांना" वाटू लागले आहे. याचे कारण, स्पष्टच सांगायचे झाले. तर, काल (शुक्र दि.१७) आदित्य ठाकरे साहेब मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच संगमनेरात आले होते. त्यामुळे, त्यांचे "जंगी स्वागत" करण्याची तयारी जिल्हा शिवसैनिकांनी केली होती. पण, दुर्दैव असे की, "साहेब डोळ्यादेखत आलेपण आणि डोळ्यादेखत गेलेपण". शिवसैनिक बिचारे हातात हार-तुरे घेऊन त्यांच्या स्वागतासाठी आयबीवर ताटकळत उभे होते. त्यांची जरा देखील "विचारपूस" किंवा "आदर-सत्कार" घेण्याची तसदी "छोटे सरकारांनी" घेतली नाही. या पलिकडे रोहित पवारांनी अगदी धावपळ असताना देखील कार्यकर्त्यांना वेळ दिला. त्यांच्याशी "संवाद" साधला. एका हॉटेलवर कार्यक्रम घेतला. त्यांना "बळ" दिले. त्यामुळे, थोरात साहेबांच्या "संघटन कौशल्य" मुलाखतीत पवार साहेब "पास" तर ठाकरे साहेब "नापास" झाल्याचे बोलले जात होेते. तसेही, थोरात साहेब जाणून आहेत. की, उद्याच्या काळात शिवसेना हाच आपला "प्रबळ विरोधक" आहे. हे लक्षात घेऊन त्यांनी स्थानिक "भगव्याला बळ" मिळू नये. यासाठी ठाकरे यांना "हायजॅक" करुन स्थानिक शिवसैनिकांच्या "डोळ्यात धूळ" फेकण्यात साहेबांना यश आले. तर, मातोश्रीच्या नावावर "उड्या मारणाऱ्यांसाठी" ही एक सर्वात मोठी "चपराख" असून थोरात साहेबांच्या "ताकदीची प्रचिती" या निमित्ताने प्रतित झाल्याचे पहायला मिळाले आहे.
थोरातांच्या विरोधातील जूना एल्गार.! |
आजकाल जशी महाविकास आघाडी झाली आहे. तेव्हापासून राज्यकर्त्यांना कार्यकर्त्यांची ना चिंता पडते ना काळजी. कालचे कट्टर विरोधक आज मन मारुन गळ्यात हात घालून फिरत आहे. तर, अनिल राठोड व विजय औटी यांच्यासारख्या बड्या नेत्यांची कोंडी झाली आहे. तर, सामान्य शिवसैनिकांचे काय.? पण, अशा परिस्थितीत देखील जबाबदार नेत्यांनी ग्रामीण भागातील शिवसैनिकांना बळ देणे आवश्यक होते. पण, चक्क आदित्य ठाकरे यांनीच काल अक्षरश: शिवसैनिकांचे पंख छाटल्यासारखे झाले होते. ते संगनेरात येणार म्हणून जिल्ह्यात भगवे आशेचे किरण दिसू लागले होेते. पण, सगळा मूड आॅफ करुन छोटे सरकार चालते झाले. कॉलेजचे ठिकाण व स्टेडिअम वगळता त्यांनी सैनिकांना रामराम ठोकला. अर्थात राज्यात त्रिशंकू सरकार आहे. त्यात थोरात साहेबांची भुमिका "सिंहाच्या वाट्यासारखी" आहे. अशात संगमनेरातील शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात कागाळी केली. किंवा स्थानिक सत्तेत वाटा मागितला. तर, यांच्या नादात राज्यातील सत्तेत असणारा शिवसेनेचा वाटा निघून जायचा. त्यापेक्षा घुस्ताखी नको आणि घुसखोरी देखील नको. त्यामुळे, काना डोळा करुन छोटे सरकार "टपोर संगमनेरातून" टापोटाप चालते झाले.अर्थात, तुम्ही सर्व मुलाखती पाहिल्या असतील. तर, छोटे सरकार वारंवार आपल्या आई वडिल व अजोबांची आठवण व शिकवण सांगताना दिसत होते. पण, जेथे अतिथी देवो म्हणून गेले. तेथील सामान्य शिवसैनकांचा सत्कार व सन्मान घ्यायचा नाही किंवा त्यांना बळ द्यायचे नाही. हा धडा गिरवायचा ते विसरुन गेले की काय.! देव जाणे.! मुलाखतीत त्यांना जे वस्तूनिष्ठ प्रश्न विचारले गेले. त्यांचे देखील विसृत उत्तर देताना बोलण्यातील पटाईतपणा व प्रासंगिक हजरजबाबीपणा त्यांनी अगदी कोठेही मिस होऊ दिला नाही. मग त्यांनी तळागाळातील शिवसैनिकांना कसे मिस केले.! याबाबत सगळेच अनभिज्ञ आहे. या प्रकारामुळे, एक गोष्ट स्पष्ट दिसून आली. की, साहेबांनी आजवर कोणाची दुष्मणी जुमानी नाही. ना कोणी येथे कट्टर विरोधक आहे, असे मनात धरले. आता काही शिवसैनिकांना हे जिव्हारी लागले असेल. पण, ज्यांना कायम थोरात साहेबांची आतून "रसद" पुरते. त्यांना ठाकरे साहेब आले काय, गेले काय व सत्कार घेतला काय व नाही घेतला काय.! सारखेच. फक्त भगवे घालून मिरवायचे आणि सुरात सुर मिसळवायचा. पण, कट्टर शिवसैनिकांनी थोरत साहेबांचा निषेध करत आदित्य ठाकरे साहेबांना हायजॅक केल्याचा आरोप केला आहे.
पवारांचे कार्यकर्त्यांप्रती प्रेम.! |
मात्र दुसरीकडे आ. रोहीत पवार यांनी इतकी घाई गडबड असतांना देखील संगमनेर व अकोल्याच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. वेळेआभावी अनेकांची गाऱ्हाणी त्यांना एकता आली नाही. पण, तरी नाराज होऊ नका. "मी पुन्हा येईल" असे म्हणत त्यांनी संगमनेरसाठी येत्या २५ तारखेला "चाय पे चर्चा" या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यावेळी कार्यकर्त्यांशी मनमोकळ्या गप्पा मारू असे आश्वासन देखील त्यांनी दिले. अर्थात, सत्ता असो वा नसो. कार्यकर्ता हा पक्षाचा श्वास व कणा असतो. तो कणा ताठ ठेवण्यासाठी त्यांच्याकडे पवार कुटुंब कधीही दुर्लक्ष करीत नाही. हिच त्यांची खासियत आहे. त्यामुळे, आदित्य ठाकरे साहेब मुलाखतीत म्हणाले. मला अजित दादा पवार आयडॉल वाटतात. त्यामुळे, त्यांच्याकडून कार्यकर्ते संभाळण्याचा एक गुण जरी छोट्या सरकारांनी घेतला. तर, ते उद्याचे मोठे सरकार देखील होऊ शकतात. अन्यथा अवघड आहे..!!!!