संगमनेरच्या एका "महाविद्यालयात" पुढाऱ्याच्या मुलीसमोर "मुक्त"अंगणात "अश्लिलचाळे"!
संगमनेर (प्रतिनिधी) : -
संगमनेरच्या एका महाविद्यालयात एका माथेफिरुने "मुक्त"अंगणात बसलेल्या एका विद्यार्थीनिच्या समोर "अश्लिलचाळे" केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, ही विद्यार्थीनी सत्ताधारी पक्षातील मोठ्या पदाधिकाऱ्याची मुलगी आहे. त्यामुळे, या प्रकरणाची सद्या शहरात जोरदार चर्चा सुरु आहे. याहुन महत्वाचे म्हणजे या विद्यार्थिनीचे नातेवाईक " राज्याचे प्रतिनिधीत्व करणारे महोदय" असल्याचे बोलले जाते. त्यामुळे, कॉलेज प्रशासनाच्या या "भोंगळ" कारभारावर "वाभाडे" ओढत विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते व नातेवाईक आक्रमक झाले आहेत. एकीकडे महाविद्यालयात "छेडछाडीचे प्रकार" घडत असताना दुसरीकडे याच ठिकाणी शिक्षकांना आदर्शतेचा पुरस्कार मिळतो काय, आणि सर्व स्टाफ "झिंग-झिंग झिंगाटवर" ताल धरुन "सैराट" होतो काय.! या प्रकारामुळे, पालकांमध्ये "असंतोषाचे" वातावरण निर्माण झाले आहे. या छेडछाड प्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात प्राथमिक नोंद घेण्यात आली आहे. दरम्यान विद्यार्थीनिच्या पालकांनी यावर सावध पवित्रा घेत, योग्य व्यक्तीला शिक्षा व्हावी यासाठी चांगली खबरदारी घेतली. कारण, प्रशासन व काही विद्यार्थ्यांनी एका संशयीतास पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मात्र, तो परप्रांतीय व्यक्ती छेडछाड करणारा नाहीच. यावर पालक ठाम राहिले. अखेर सीसीटीव्ही पाहता झालेही तसेच. त्यामुळे, पालकांनी दाखविलेल्या संवेदनशिल व संयमीपणाचे कौतूक सुज्ञ व्यक्तींकडून केले जात आहे.
गेल्या महिन्यात एका होमगार्ड कर्मचाऱ्याने एका विद्यार्थ्यास भर बस स्थानकावर छेडछाड केल्याच्या आरोपाखाली "उठावशा" काढायला लावल्या होत्या. हा प्रकार चर्चेतून जातो कोठे, नाहीतर लगेच संगमनेरात भर महाविद्यालयात एक माथेफिरु विद्यार्थीनिसमोर अश्लिल चाळे करतो. एखाद्या सार्वजानिक ठिकाणी असे प्रकार होणे सहाजिक आहे. पण, कॉलेजच्या "मुक्त" अगणात असे प्रकार व्हावेत. ही किती मोठी शोकांतीका आहे. त्यामुळे, शहरात तर सोडाच.! पण, शाळेंमध्ये देखील विद्यार्थिनी सुरक्षित नाहीत. असेच चित्र समोर येऊ लागले आहे. काल परवा या महाविद्यालयात "पारंपारिक दिवस" म्हणून मुले-मुली "नटून-थटून" आले होते. अर्थात हेच वय असते, स्वत:ची ओळख व मनाचे लाड पुरविण्याचे. म्हणून मुले शाळेत मुक्तछंदासारखे वागतात. पण, अशा महाविद्यालयात एक माथेफिरु नाईट पँन्टवर येतो काय,! विद्यार्थीनिंना एकटे पाहुन अश्लिल चाळे करतो काय आणि सर्वांच्या नजरा चुकवून जातो काय.! हे किती मोठे दुर्दैव आहे. त्याचे हुलीया, त्याचे राहणीमान, त्याचे ओळखपत्र, त्याचे प्रवेश याबाबत सेक्युरिटी किंवा विद्यालयाचे प्रशासन काय करत होते.? त्याचे वर्णन पाहिले तर तो कोणत्याही दृष्टीने विद्यार्थी वाटत नाही. त्यामुळे, अशा व्यक्तीचा प्रवेश प्रांगणात झालाच कसा ? एरव्ही प्रत्येकाचे ओळखपत्र पाहुनच आत प्रवेश दिला जातो. मग, या विद्यार्थ्याला कोणाचे अभय मिळाले.? हे न समजण्यापलिकडचे आहे.
दरम्यान, या प्रकरणात काही विद्यार्थ्यांनी एका परप्रांतीय मुलास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मात्र, तो हा मुलगा नसल्याचे प्रथमदर्शी वाटले. अर्थात संशयीत व सीसीटीव्हीत असणारा व्यक्ती यांच्यात साम्य आढळत नाही. त्यामुळे, विद्यार्थीनिच्या पालकांनी जी भुमिका घेतली ती अत्यंत महत्वाची ठरली आहे. अन्यथा "साप समजून भुई बडविणे" आणि "चोर सोडून सन्याशाला फाशी देणे" हे आपल्या व्यवस्थेला नवे नाही. मात्र, पोलिसांनी आलेल्या तक्रारीची योग्य दखल घेत कारवाई सुरु केली आहे. फक्त फिर्याद देणे बाकी आहे. आता महत्वाचा प्रश्न म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण ? म्हणजे, या घटनेत फिर्यादी होणार कोण ? येथून प्रश्न सुरु झाले आहेत. फिर्याद होऊन कॉलेजची बदनामी होऊ नये ही प्रशासनाची इच्छा.! तर, चुकीचे वर्तन करणाऱ्याला शिक्षा व्हावी ही पालकांची इच्छा.! त्यामुळे, गेली तीन दिवस हे विनयभंग (कलम ३५४) प्रकरण भिजत घोंगड्यासारखे पडले आहे. याप्रकरणी उद्या संघटनात्मक पातळीवर अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. आता १२ तास फक्त वेट & वॉच...!!कोणी फिर्याद देता का ?
विद्यार्थीनिची छेडछाड झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार एका संशयीतास पोलीस ठाण्यात आणले होते. परंतु, फिर्याद कोणी दिली नाही. अशा प्रकरणात पोलीस फार संवेदनशिल असतात. आरोपींना कधीही पाठिशी घालत नाहीत. आरोपी जो कोणी असेल. त्याचा कधीही शोध घेऊन त्यास शासन करता येईल. पण, यात फिर्याद देण्यासाठी कोणीतरी पुढे आले पाहिजे. पोलीस अशा घटनांमध्ये कधीही टाळाटाळ करु शकत नाही. उलट असे प्रकार घडत असतील तर पोलिसांशी संपर्क साधावा.
- पो. नि अभय परमार
(संगमनेर पोलीस ठाणे)
- सागर शिंदे
(क्राईम रिपोर्टर)
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" १५० दिवसात २५० लेखांचे १६ लाख २५ हजार वाचक)