आ. "रोहीत पवारांच्या" अकोले दौऱ्यात "राजकीय धुरळा".! भाजपची "तरफड" अन् राष्ट्रवादीच "घुसमट".!
अकोले (प्रतिनिधी) :-
काल पत्रकार संघाच्या एका गटाने राष्ट्रवादीचे तरुण तडफदार आमदार रोहित पवार यांचे व्याख्यान अकोल्यात आयोजित केले होते. पण, याबाबत अकोल्यातील राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या अपरोक्त या कार्यक्रमाची "रुपरेषा" आखली गेली. त्यामुळे, सहाजिकच स्थानिकांची "पोटदुखी" सुरु झाली. दादांची तारीख मिळाली खरी. पण, पत्रीकेत स्थानिक आमदारांचे नाव कोठेही नमुद करण्यात आले नाही. ही सल कार्यकर्त्यांच्या मनात "रिस" धरुन गेली. मग काय.! नकळत दादांशी संपर्क होऊ लागले. पण, बारामतीने "शब्द" दिला तो पाळला नाही. तर, तो पवार "वारसा" कसला ? त्यामुळे, नियोजनात प्रचंड बदल झाला आणि ना भाजपच्या नगरसेवकांचा सत्कार ना प्रचारकांचे जेवण. दादा थेट अकोल्यातून उपोसपोटी चालते झाले. या सगळ्यात रोहीत दादांची प्रचंड द्विधा मनस्थिती झाल्याचे पहायला मिळाले. कोण काय सांगते तर कोण काय सांगतय.! त्यामुळे, धरलं तर चावतय आणि सोडलं तर पळतय अशा धावपळीत त्यांनी "अकोले दौरा" पुर्ण केला. या दरम्यान कधी नव्हे असा "राजकीय धुरळा" पहायला मिळालाच. पण, त्या बरोबरच भाजपच्या लोकप्रतिनिधींची "तडफड" व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची "घुसमट" देखील नजरेतून "अदखलपात्र" होऊ शकली नाही.
काहीही असो.! अकोल्याच्या पत्रकारांनी जो कार्यक्रम घेतला. त्याला पहिला सलाम.! कारण, नावे ठेवण्याचा वृत्ती सगळ्यांमध्ये असते. पण, करुन दाखविण्याची दानत धडपड्या व खरोखर पत्रकार म्हणून मिरविणाऱ्यांमध्येच असते. हे प्रखर सत्य आहे. नाहीतर, स्वत:ला पत्रकार म्हणत संघटना चालविणाऱ्या संस्था आपल्याकडे काही कमी नाहीत. अर्थात अकोल्यात देखील यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. परंतु, पत्रकारांच्या या कार्यक्रमाला नकळत राजकीय वळण लाभले गेले. अर्थात का न लागावे ? यात काही पत्रकार व्यक्तीपरत्व पिचड साहेबांचे समर्थक होते. त्यांनी डॉ. लहामटेंचे नाव जाणीवपुर्वक टाळले. अशी चर्चा सुरु होती. पण, वास्तवात हा पत्रकार दिनाचा कार्यक्रम होता. ना पिचड ना भांगरे ना लहामटे या कोणत्याही व्यक्तीसमर्थनाचा नव्हता. त्यामुळे, फक्त गेस्ट म्हणून रोहित पवारांचे नाव होते. आता याची दुसरी बाजू अशी. की, तालुक्यात जे अन्य पत्रकार होते. त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पीन टोचली. तुम्हाला मुद्दाम डावलले गेले आहे. त्यामुळे, नकळत कार्यक्रमाच्या विरोधी वातावरण तयार होत गेले. त्यामुळे, ५ वाजताचा कार्यक्रम असताना हॉलमध्ये केवळ २० ते २५ लोक उपस्थित होते. मात्र, पत्रकारांच्या प्रयत्नांना फळ आले व ७ वाजता का होईना संपुर्ण हॉल तुडूंब भरुन गेला.
आता काल रोहित पवार अकोल्यात येण्यापुर्वीच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांची वाट संगमनेरातच आडविली. जे काही सांगायचे, बोलायचे, ते मनमुराद बोलणे झाले, त्यानंतर त्यांनी एका "फुड्स प्रोसेस प्रोजेक्टला" भेट दिली. तेथे दादांना माहित नसेल. पण, बहुतांशी नेते व पत्रकार देखील पिचड सांहेबांचे समर्थक होते. म्हणजे या कार्यक्रमाच्या काही अंशी विरोधक. त्यात तेथे डॉ. लहामटे यांना दिर्घकाळ बसावे लागले. तेव्हा बाकी अनेक भाजपवाल्यांची तडफड व घुसमट पहायला मिळाली. पण, करणार काय ? ना आमदार ना भाजप नेते. कोणालाच स्टेज सोडता येईना. सायंकाळी दादांनी तालुक्यातील काही वाड्या वस्त्यांना भेटी दिल्या. यात फार विदारक चित्र त्यांना पहायला मिळाले. याचा खेद देखील त्यांनी व्यक्त करुन दाखविला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दादांना तिकडेच इतके रमविले. की, इकडे कार्यक्रमाचा वेळ कुठच्या कोठे निघून गेला. पण, तिकडच्या प्रोजेक्टहुन काढता पाय घेत ते अकोल्यात दाखल झाले. ते पत्रकार कार्यक्रमाला जाण्यापुर्वीच सोशल मीडियात संदेश फिरले. कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. रोहित पवार यांची पहिले मिरवणुक होणार आहे. जंगी सत्कार होणार आहे. या संदेशामुळे, कार्यक्रमासाठी आलेल्यांची द्विधा परिस्थिती होऊन दानाफान झाली. इतकेच काय ! महात्मा फुले चौकात फटाक्यांची लड लावण्यात आली, अचानक डिजे अवतरला, पोलीस बंदोबस्त वाढला. साहेब पहिले राष्ट्रवादी कार्यालयास भेट देणार, कट्टर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा सत्कार स्विकारणार. मग पुढे काय असेल ते. त्यामुळे, ठराविक व्यक्तींनी कार्यक्रम हायजॅक केला की काय.! असे अनेकांना वाटू लागले होते. पण, अचानक गाड्यांचा ताफा पुढे न जाता हॉलकडे वळला आणि आयोजकांचा जीव भांड्यात पडला.

संगमनेर-पुणे बायपास, अगदी पहिलाच कॉर्नर |
आता यात चर्चा अशी रंगली की.! दादांचा सत्कार जो कोण करणार, तो राष्ट्रवादीचा लोकप्रतिनि असला. तरी, सद्या पिचड प्रणित आहे. इतकेच काय.! असे बोलले गेले. की, शरद पवार साहेब अकोल्यात आले. तेव्हा याच महाशयांनी त्यांना भाजपचे झेंडे दाखविले होते आणि आता तेच दादांचा सत्कार करणार का ? आणि दादा घेणार का ? असा प्रश्न थेट कर्जत-जामखेडला पोहचविण्यात आला. याबाबत संबंधित व्यक्तीची चौकशी करण्यात आली आणि नकळत कोणत्याही क्लबचा सत्कार त्यांनी स्विकारला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे दादांनी जेवण देखील कोठे केले नाही. त्याला देखील काही धागेदोरे आहेत. मात्र, येथील खारट राजकारणाची चव त्यांनी घेतली आणि दादा स्वत: म्हणाले. अहमदनगर शब्द जितका साधा व सरळ आहे.! तितके येथील राजकारण सोपे नाही. असे म्हणत त्यांनी अकोल्यातून काढता पाय घेतला.
आता काल रोहित पवार अकोल्यात येण्यापुर्वीच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांची वाट संगमनेरातच आडविली. जे काही सांगायचे, बोलायचे, ते मनमुराद बोलणे झाले, त्यानंतर त्यांनी एका "फुड्स प्रोसेस प्रोजेक्टला" भेट दिली. तेथे दादांना माहित नसेल. पण, बहुतांशी नेते व पत्रकार देखील पिचड सांहेबांचे समर्थक होते. म्हणजे या कार्यक्रमाच्या काही अंशी विरोधक. त्यात तेथे डॉ. लहामटे यांना दिर्घकाळ बसावे लागले. तेव्हा बाकी अनेक भाजपवाल्यांची तडफड व घुसमट पहायला मिळाली. पण, करणार काय ? ना आमदार ना भाजप नेते. कोणालाच स्टेज सोडता येईना. सायंकाळी दादांनी तालुक्यातील काही वाड्या वस्त्यांना भेटी दिल्या. यात फार विदारक चित्र त्यांना पहायला मिळाले. याचा खेद देखील त्यांनी व्यक्त करुन दाखविला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दादांना तिकडेच इतके रमविले. की, इकडे कार्यक्रमाचा वेळ कुठच्या कोठे निघून गेला. पण, तिकडच्या प्रोजेक्टहुन काढता पाय घेत ते अकोल्यात दाखल झाले. ते पत्रकार कार्यक्रमाला जाण्यापुर्वीच सोशल मीडियात संदेश फिरले. कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. रोहित पवार यांची पहिले मिरवणुक होणार आहे. जंगी सत्कार होणार आहे. या संदेशामुळे, कार्यक्रमासाठी आलेल्यांची द्विधा परिस्थिती होऊन दानाफान झाली. इतकेच काय ! महात्मा फुले चौकात फटाक्यांची लड लावण्यात आली, अचानक डिजे अवतरला, पोलीस बंदोबस्त वाढला. साहेब पहिले राष्ट्रवादी कार्यालयास भेट देणार, कट्टर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा सत्कार स्विकारणार. मग पुढे काय असेल ते. त्यामुळे, ठराविक व्यक्तींनी कार्यक्रम हायजॅक केला की काय.! असे अनेकांना वाटू लागले होते. पण, अचानक गाड्यांचा ताफा पुढे न जाता हॉलकडे वळला आणि आयोजकांचा जीव भांड्यात पडला.
कार्यक्रम सुरु झाला तेव्हा स्टेजवर अवघ्या तीन खुर्च्या होत्या. त्यामुळे, अनेकांच्या मनात बहुतांशी प्रश्न घोळत होते. पण, त्या ताफ्यात फक्त एकच आमदार होते. जेव्हा कार्यक्रम सुरु झाला. तेव्हा राष्ट्रवादीचे फारसे कार्यकर्ते तेथे दिसून आले नाही. अगदी इतके की, नंतर स्थानिक आमदार आल्यानंतर साहेब तुम आगे बढो.! या आरोळीनंतर हम तुम्हारे साथ है.! हे म्हणणारा एकही कट्टर समर्थक तेथे नव्हता. हे त्यावेळी सगळ्यांच्या लक्षात आले. एक वेळ अशी परिस्थिती पहायला मिळाली. की, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेत्यांना चौथ्या रांगेत बसलेले पाहुन देखील कोणी विचारपुस किंवा सन्मान दिला नाही. एकीकडे अजित दादा पवार म्हणतात, जुन्या व निष्ठावंतांना पहिले पदांचे वाटप करा. मग नंतर दुसऱ्यांना. पण, येथे ते चित्र पहायला मिळाले नाही. अखेर राष्ट्रवादीच्या तरुणांनी ज्येष्ठांना मागच्या रांगेतून उठवून पुढे आणत खुर्ची देऊन सन्मान दिला. कार्यक्रमात पत्रकारांनी सर्वांना अगदी योग्य सन्मान दिला. कोठे व्यक्ती किंवा पक्षभेद दिसला नाही. कार्यक्रम संपल्यानंतर आयोजकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आणि दादांच्या पुढील दौऱ्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ताबा घेतला.एकंदर यात नियोजन ते समारोप यात प्रचंड राजकारण झालेले पहायला मिळाले. या सगळ्या उठाठेवित पाहुण्या नेत्याचे किती हाल होतात. हे पहिल्यांदा इतके जवळून पहायला मिळाले. पण, तरी देखील कार्यक्रम, मार्गदर्शन अतिशय छान झाले. ते पाहणे आणि एकण्याचे भाग ना राष्ट्रवादीचे कट्टर तरुण कार्यकर्ते घेऊ शकले. ना भाजपचे. आणि हा कार्यक्रम तरुणांसाठी ठेवण्यात आला होता. शेवटी रोहित पवारांचे ते वाक्य वास्तवाच्या तोंडात मारुन गेले. की, राजकारणात तरुण बरबाद होत आहे. राजकीय व्यक्तींनी तरुणांना वापरुन घेतले व निवडणूक संपल्यानंतर सोडून दिले. आता त्यांच्या आयुष्याचे काय ?